
जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १६ वर्षी अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तींनी दिनांक ९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पळून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहे को मुकुंद पाटील हे करीत आहे.



