जळगाव : प्रतिनिधी बँकेतून बोलत असल्याचे सांगून कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल वसंतराव गाढे (२८, रा. आव्हाणे शिवार) यांना २३ लाख २४ हजार ६९२ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे ट्रान्स्फर करून घेऊन संशयितांनी कर्ज न देता त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर सायबर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहिल गाढे हे पाळधी येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहे. सन २०२० मध्ये ते मालवाहू वाहन पुरविण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्या कंपनीतील व्यवस्थापक महेश चव्हाण यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. जुलै २०१२ मध्ये गाढे यांनी चव्हाण यांच्या…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव रोडवर शहरालगत असलेेल्या पाटखडकी जवळ साईनाथ पेट्रोल समोर दोन दुचाकीच्या समोरासमोरा झालेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. हि घटना दि,१५ रोजी दुपारी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती. मिळालेली माहिती अशी की, योगेश आनंदा जाधव(४७) व विजय नारायण सोनजे(६३) दोघे रा.नांदगाव हे दोघे त्यांच्या दुचाकीने चाळीसगाव नांदगाव रोडवरुन नांदगावहुन चाळीसगावकडेे येत असता समोरुन चाळीसगावकडून नांदगावकडे नाना रामचंद्र वाघ(५८) रा.परधाडी, ता.नांदगाव हे देखील दुचाकीने जात असताना, तालुक्यताील पाटखडकी गावाजवळ साईनाथ पेट्रोल पंपाच्या समोर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर जबरदस्त धडक झाली. यात दुचाकीचा पुढील भागाचा अक्षशा;…
जळगाव : प्रतिनिधी पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती प्रमोद पाटील (५५) यांची २१ हजार रुपयांची रोख व मोबाइल ठेवलेली हॅण्ड पर्स गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने लांबविली. ही घटना मंगळवारी दुपारी नवीन बसस्थानक येथे घडली. मिळालेली माहिती अशी कि, पिंपळगाव हरेश्वर येथील स्वाती पाटील या शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी रोजी शहरातील गुलमोहर कॉलनीमध्ये राहणाऱ्या सासूकडे आल्या होत्या. काम आटोपून त्या मंगळवारी १ वाजता पिंपळगाव हरेश्वर जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आल्या. पाचोरा बसमध्ये चढताना त्यांना लक्षात आले की, मोठ्या पर्समधील हॅण्ड पर्स कुणीतरी काढून घेतली. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तमाम शिवप्रेमींसाठी मोठ्या उत्साहाच सन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. याला केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली आहे. आग्र्याच्या लाल किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करणार असल्याचं महाराष्ट्रातील खासगी संस्थेनं जाहीर केलं होतं. पण पुरातत्व विभागानं यावर आक्षेप घेतला होता. यानंतर या संस्थेनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. यानंतर कोर्टानं यावर निर्णय देताना जर राज्य सरकार या संस्थेसोबत सहआयोजक होण्यास तयार असेल तर हा शिवजयंती सोहळा साजरा करण्यास हरकत नाही, असं म्हटलं होतं. यानंतर महाराष्ट्र सरकार यासाठी सहआयोजक होण्यास तयार आहे. त्यामुळं लाल किल्ल्यावर शिवजयंतीचा…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या 13 वर्षांपासून लोकांच्या मनावर कब्जा करणारे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध सिटकॉमने केला आहे. हा शो इतका लोकप्रिय आहे की त्यातील सर्व पात्रांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळते. केवळ जेठालालच नाही तर त्यांचे चाहतेही तारक मेहता मालिकेतील ‘बबिता जी’च्या मागे वेडे झाले आहेत. मुनमुन दत्ता नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते. आता अशीच एक चर्चा होताना दिसत आहे. पुन्हा एकदा या अभिनेत्रीचं नाव टप्पूसोबत जोडलं जात आहे. त्याच्यासोबतचा पिक्चर समोर आला आहे, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसलेली…
औरंगाबाद : वृत्तसंस्था नुकताच जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी आपलं लग्न व्हावे, असे प्रत्येक प्रेमीयुगुलांना वाटत असते. दरम्यान यासाठी अनेक प्रेमीयुगुलांकडून मुद्रांक नोंदणी विभागात नोंदणी केली जाते. तर औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी 150 रुपये प्रमाणे अवघ्या 1 हजार 50 रुपयांत सातही जोडप्यांच्या लग्नाचा बार उडाला. यावेळी नववधू-वरांचे नातेवाईक, मित्र परिवारांची उपस्थिती होती. औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. आनंदात एकमेकांना मिठाई…
मुंबई : वृत्तसंस्था नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच निवडणुकीतील अपक्ष विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी अनेक गौप्यस्फोट केले. तसेच राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यातच थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर आता बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या गटनेते पदाच्या राजीनाम्याबाबत नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. थोरात यांनी राजीनामा दिलं ना पत्र दिलं असं पटोले यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर बसून हा वाद सोडवू असं म्हणत बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्याशी समेटीची तयारी नाना पटोले यांनी दाखवली आहे. एका चर्चेमधून…
जळगाव : प्रतिनिधी शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ठ असून सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली नुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच जळगांव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरीकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते. जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी आमदार राजुमामा भोळे यांचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आज १४ जळगाव शहरासाठी अत्यंत आनंदाची…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील सुकळी येथे ट्रकने दुचाकीला कट मारला. या अपघातात दुचाकीवरील चार वर्षांची मुलगी ठार झाल्याची घटना १४ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मीराबाई भरत विसावे (वय ३५,रा.मांडवे बुद्रुक ता.जामनेर) यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेली माहिती अशी कि, १४ फेब्रुवारीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुकळी गावाच्या रस्त्यावर ट्रक (क्रमांक आरजेजीए.८५०८) वरील चालक गिरधारीलाल मेघवाल (रा.राजस्थान) याने फिर्यादीचा मुलगा विजय हा चालवत असलेल्या दुचाकीला (क्रमांक एमएच-१९.डीझेड.९५५४) कट मारला. त्यात अपघात होऊन फिर्यादीची भाची वेदिका अमोल तायडे (वय ४ वर्षे, रा. नांद्रा हवेली, ता.जामनेर) जिल्हा मागील चाकात येऊन गंभीर जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील नागलवाडी येथे सासू व सुनेचे एकाच दिवशी निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोघींची अंत्ययात्रा १४ तारखेला सायंकाळी पाच वाजता एकाच वेळी काढण्यात आली. दोघींचाही मृत्यु किरकोळ आजाराने झाला. अरुणाबाई यशवंत राजपूत (६५) यांचे किरकोळ आजाराने पहाटे सात वाजून दहा मिनिटांनी चोपडा येथील दवाखान्यात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नागलवाडी येथे घरी आणण्यात आले, त्यांच्या निधनाची वार्ता गावात व नातेवाईकांना सर्वत्र देण्यात आली. दुपारी दोन वाजता अरुणाबाई याच्यावर अंत्यसंस्कार होणार होते मात्र याच वेळी वयोवृद्ध सासुबाई कौसाबाई हुकुमसिंग राजपूत (९३) यांचा देखील वृद्धापकाळाने दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले. सुनेचे अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना…

