जळगाव : प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकार जेव्हापासून आले आहे तेव्हा पासून कामांचा झपाटा लावला आहे. आमच्या कडे असलेल्या या वेळेत आम्ही ट्वेंटी ट्वेंटीच्या मॅच प्रमाणे आम्ही कामांचा जनतेला कामे करण्याचा धडाका सुरू आहे. राज्यातील उद्योजक, जनता आदी क्षेत्रातील समस्या सोडविण्याचा आमचा पारदर्शक कारभार राहणार असणार आहे, असे शाब्दीक टिका ठाकरे सरकारवर यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत जळगाव येथे विकास परिषद कार्यक्रमात त्यांनी केली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यामाने जळगाव जिल्हा विकास परिषद गुरूवारी जळगाव येथील छत्रपती संभाजी राज्य नाट्यगृहात झाली. परिषदेच्या प्रमुख पाहूणे म्हणून रेाज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकार, महाराष्ट्र…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून महिलांचे फोटो टाकून अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका महिलेच्या पतीने सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यानुसार, ५ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत त्यांच्या भाचीच्या नावाने बनावट अकाउंट बनवून एकाने त्यांची पत्नी व मामीचा फोटो अपलोड केले.
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील मेडिकल व्यावसायिकाचा पाठलाग करून त्याची दुचाकी अडवली आणि त्याच्याकडील दोन लाख ६५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. येथील संजय हशमतराम मंदानी (४४) हे शांतीनगरात परिवारासह वास्तव्यास आहेत. मिळालेली माहिती अशी कि, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ते विक्री व उधारीची जमा झालेली २ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम बॅगेत ठेवून मोटारसायकलने घराकडे निघाले. मंदानी हे घरापर्यंत आले असता त्यांचा पाठलाग करत दोन दुचाकी तिथे आल्या. एकाने दुचाकी समोर आडवी लावली. दुसऱ्या दुचाकीवरील दोन जणांनी मंदानी यांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळील बॅग हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी…
भुसावळ : प्रतिनिधी सुरक्षीत तसेच शिस्तबध्द कामकाजासाठी ओळखले जाणार्या रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघकीस आला आहे. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रेल्वे सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी निघालेली नागपूरकडून मुंबईकडे निघालेली 90 कंटेनर असलेली मालगाडी ही चार ते पाच दिवसात जेएनपीटी बंदरात पोहोचणे अपेक्षित होते. पण तेरा दिवसानंतरही ही मालगाडी जेएनपीटी बंदरात पोहोचली नाही. जणू ही गाडी चक्क गायब झाल्या सारखाच प्रकार घडला. FOIS मधून गाडी झाली अदृष्य….. नागपूरकडून मुंबईकडे निघालेली रेल्वे PJT1040201 या क्रमांकाच्या मालगाडीला 90 कंटेनर आहे. यात उच्च प्रतीचा तांदूळ, कागद, प्लास्टिकच्या वस्तू, केमिकल्स आणि इतर…
नाशिक : वृत्तसंस्था लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर तब्बल बारा वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शोएब निसार शेख (३५ रा.मदिना चौक) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात २०११ पासून प्रेमसंबध आहेत. गेल्या बारा वर्षांच्या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या पूर्वीच्या राहत्या घरात तसेच सापूतारा, मुंबई व त्र्यंबकेश्वर आणि शहरातील विविध लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला. लग्नानंतर घर घ्यावे लागेल असा बहाणा करून त्याने पीडितेकडून भाडेतत्वावरील घराच्या डिपॉझिटसाठी तीन लाख रूपये घेतले. तसेच बुलेट आणि अॅक्सेस दुचाकी खरेदीसाठी सुमारे १ लाख ६० हजार…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका २५ वर्षीय तरुणीचा एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासोबत २५ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. गेल्या २०२१ पासून ते आजपर्यत नांद्रे गावातील संशयित आरोपी समाधान पाटील (वय २७) याने तरुणीला तु माझ्याशी लग्न कर असे बोलून त्यास तरुणीने नकार दिल्याने त्याचे वाईट वाटून तरुणीच्या गावात येत तरुणीवर लक्ष ठेवत तरुणी घराबाहेर पडल्यावर तिचा पाठलाग करीत तिला शिवीगाळ व दमदाटी करून तिला धमकी दिली कि माझे जगून फायदा नाही मी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून दुकानाबाहेरून अनोळखी चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील अंजनविहरे या गावातील रविद्र रघुनाथ चव्हाण यांच्या मालकीच्या किराणा दुकानाबाहेरून दि १३ ते १४ फेब्रुवारी रोजी दरम्यान अनोळखी चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.जीजे.१८ सीएस.६०६५ या नंबरची चोरून नेल्याने रविद्र चव्हाण यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोना.राजू पाटील हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी बिअरचे पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाने गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वॉइन शॉपमध्ये गोंधळ घातल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने शॉपमधील व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून ५ हजार रुपये दे, नाहीतर चाकूने भोसकून टाकेन, अशी धमकी देऊन बिअरच्या बाटल्या फेकून मारल्या. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्या नगरातील चिराग विष्णू गारानी हे गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका वाइन शॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती शॉपमध्ये आला. त्याने तीन बिअर आणि एका हाफ व्हिस्कीची मागणी केली. यावेळी आधी पैसे दे, असे…
धरणगाव : प्रतिनिधी धुळे येथील कॅम्ब्रिज स्कूलमध्ये धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे यांची सुपुत्री कु.सर्वज्ञा नितीनकुमार देवरे हिस शालेय फोटोग्राफी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वेशभूषा व पोज यासाठी प्रथम पुरस्कार रुपये अकरा हजाराचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर प्रशस्तीपत्र शाळेचे अध्यक्ष महेंद्र विसपुते,भारतीय धावपटू व धुळे येथील रहिवासी योगेश्वरी मिस्त्री व मान्यवरांच्या हस्ते कु.सर्वज्ञा हिला देण्यात आले.शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त उपस्थित पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.सर्वज्ञा चे कौतुक करण्यासाठी आजोबा राजाराम देवरे,आजी सिंधुबाई देवरे,वडील नितीनकुमार देवरे,आई निकिता देवरे व भाऊ सौनित देवरे हजर होते. सदर पुरस्कारासोबतच सर्वज्ञाला उत्कृष्ट फॅन्सी ड्रेस स्पर्धेत ही द्वितीय पारितोषिक मिळाले या यशासाठी सर्वज्ञाचे सर्वत्र कौतुक…
धरणगाव : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असतांना अनेक पक्षातील शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत (शिंदे गटात) येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. त्यापूर्वीच धरणगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्षांनी गटनेटे पप्पू भावे यांच्या उपस्थिती केला. जळगाव ग्रामीण मतदार संघातील सर्वच पक्षातील शेकडो कार्यकर्ते आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात आज अनेक पक्षांना धक्का बसणार असून काल दि १५ फेब्रुवारी रोजी धरणगावच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संभाजी कंखरे यांनी राष्ट्रवादीला राम राम करून शिंदे गटात प्रवेश केला आहे.

