जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वावडदा येथील रहिवासी, प्रगतशील शेतकरी दिनकर दयाराम पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार” नुकताच अल्पबचत भवन जळगाव येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेंद्र काबरा,डॉ.केतकी पाटील,माजी सैनिक सुरेश पाटील,जळगाव दूध फेडरेशन चे संचालक आप्पासाहेब रमेश पाटील,राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ मॅडम,मीनाक्षी पाटील जळगाव,युवराज पाटील,खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील आदी उपस्थित होते.सदर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिनकर पाटील यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटींची डील झाली आहे. गेल्या सहा महिन्या न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाहीये. ही डील आहे. हा सौदा आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. https://twitter.com/rautsanjay61/status/1627157588545777664?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1627157588545777664%7Ctwgr%5Ed26ccc5c958ffde31e941f364324f7642fffd9fe%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fmumbai%2F2-thousand-crore-deal-between-shinde-camp-and-election-commission-sanjay-raut-allegation-au29-874246.html संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हा गंभीर आरोप केला. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी दोन हजार कोटीचा व्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे लवकरच येतील.…
बुलढाणा : वृत्तसंस्था बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाने होणाऱ्या बायकोचा खून केल्याची धक्कादायक घटना मंठा तालुक्यातील बेलोरा तांडा येथे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सपना संदीप जाधव असे मयत मुलीचे नाव आहे. खून करून संशयित सुशील पवार हा फरार झाला असून, १५ दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित मुलाच्या वडिलासह भावाला ग्रामस्थांनी गावातील एका खोलीत कोंडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बेलोरा तांडा येथील कल्पना संदीप जाधव हिचा विवाह बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरूड येथील सुशील पवार या तरुणासोबत १७ मार्च रोजी ठरला होता. १५ दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडाही झाला होता. मुलाचा बस्ता खरेदी करण्यासाठी शनिवारी मुलाकडील व मुलीकडील…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील ३८ वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पैलाड भागामध्ये एका ३८ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह रहायला आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नरेंद्र हिम्मतराव अहिरराव रा. तांबेपुरा ता. अमळनेर याने शाळेतून खिचडीचे सामान चोरत असताना महिलेने बघितले. याचा जाब विचारला असता त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तर तिच्यासोबत असलेल्या एका बाईच्या कानशिलात मारून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलांनी…
पाचोरा : प्रतिनिधी तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. कर्ज भरले नाही तर जादा व्याज लागेल, असा मोबाइलवर संवाद साधत महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना शनिवार पाचोरा येथे उघडकीस आली. ज्योत्स्ना अशोक अहिरे (४२ रा. आदर्श नगर, पाचोरा) या महिलेला मोबाइलवर एक हिंदी भाषिकाचा फोन आला. त्यावर त्याने तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. तुमच्या कर्जाचा हप्ता व व्याज वाढेल. तेव्हा एक अॅप डाऊनलोड करा व त्यात माहिती भरा असे सांगून एका भामट्याने महिलेला अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.या महिलेने अॅप डाऊनलोड करून माहिती भरली. यानंतर या महिलेच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातून ७८ हजार ९०० रुपये…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बक्षीपूर येथील एक महिला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या बंद घरातून पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. दुसरीकडे सिहोर येथे रूद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या घरमालकांकडेही चोरी झाली. घरी कुणीच नसल्याने किती ऐवज लंपास झाला हे समजू शकले नाही. मिळालेली माहिती अशी कि, बक्षीपूर येथील अंगणवाडी सेविका चंद्रभागा यशवंत माळी यांचे वडील तुकाराम हरी महाजन यांचे नुकतेच निधन झाले. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या रावेर येथे आल्या होत्या. त्यामुळे बक्षीपूर येथील घराला कुलूप होते. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील १ लाखांची रोकड व ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस…
पुणे : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकरणावर युक्तिवाद सुरु होता. अखेर या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय जाहीर केलाय. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिला आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नवी पेठ मधील पत्रकार भवन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन पदाधिकाऱ्यांत धक्काबुक्की झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आले. पुण्यात शिवसेनेचे चिन्ह आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात शनिवारी दुपारी आंदोलन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी नवी पेठेतील पत्रकार भवन परिसरात एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले. याचवेळी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात खळबळ उडवून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेलमध्ये बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हि घटना पनवेलमधील विचुंबे भागामध्ये घडली आहे. यामध्ये एका सावत्र बापाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित मुलगी इयत्ता नववीत शिकत असून काही महिन्यांपूर्वी या पीडित मुलीवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केले होते. त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली होती. मागच्या आठवड्यात या पीडित मुलीला त्रास…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौर्यात केवळ घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक, युवावर्ग, बेरोजगार यांच्याबाबत कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही. दौर्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हावासियांच्या तोंडाला केवळ पाने पुसल्याचा आरोप ठाकरे गटातर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौर्यानंतर ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडीप्रमुख गायत्री सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेतली. पुढे गुलाबराव वाघ म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकर्यांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी भोकर येथे गेलो होतो. तसे पत्रही आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले होते. मात्र त्याठिकाणी निवेदन देता येणार नाही असे सांगून आम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता, त्यानंतर पुन्हा आता जोरदार धक्का बसण्याची चिन्हे दिसू लागली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानंतर पुन्हा ठाकरे गटाला मोठ्या धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र इथेही ठाकरे गटाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने दावा केला…

