अमळनेर : प्रतिनिधी शहरातील भांडारकर गल्लीत गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गटांत दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी लागलीच पोलिस पोहचल्याने शांतता झाली. एका फलकावरून दोन गटांत वाद निर्माण झाले. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने तणाव निर्माण झाला होता. दोन गटांतील काही इसम एकमेकांवर विटा, दगड फेकत असल्याने मध्ये जाण्यास कोणी धजावत नव्हते. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी जमावावर ताबा मिळवून काही मिनिटांत शांतता प्रस्थापित केली. दोन्ही गटांकडून कोणाचीच तक्रार आली…
Author: editor desk
अमळनेर :- प्रतिनिधी येथुन जवळच असलेल्या धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवरील खान्देश गंगा, सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावर दक्षिण तीरावर हजारो वर्षांची परंपरा असलेले पुरातनकालीन, जागृत व नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपींडी “श्री क्षेत्र कपिलेश्वर ” महादेवाच्या खान्देशातील मोठा पंधरा दिवसीय यात्रोत्सवला दिनांक १८ फेब्रुवारी महाशिवरात्रीपासुन सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात पहिले अखिल भारतीय संत संमेलन श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांनी भरविल्यापासुन, विविध धार्मिक विधीला येथे मान्यता मिळाली. तेव्हापासून खान्देशसह परप्रांतातून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रोत्सवकाळात येऊन पितृशांतीसह विविध विधी व शांती करतांना. परिसरातील निरंकारी भजनी मंडळाकडून शिवरात्रीचा जागर महाशिवरात्री पर्वा निमित्त करतात. दुसऱ्या दिवशी आमावस्या असल्याने मांत्रिक-…
यावल : प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आला. एवढेच नाही तर या तरुणाने पीडित मुलीच्या वडिलांना मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करीत होता. दरम्यान, गुरुवारी शाळेतून घरी येत असताना त्याने मुलीस मोबाइल क्रमांक मागितला. मुलीने घरी येऊन हा प्रकार सांगितला. बसस्थानकासमोर हा तरुण दिसला. मुलीने लागलीच वडिलांना माहिती दिली. तेव्हा वडिलांनी तरुणास जाब विचारला असता त्याने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली व त्याची दुचाकी सोडून पळून गेला होता. याप्रकरणी यावल पोलिसात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. त्यावरुन आज कणकवली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट तसेच नारायण राणेंवरही घणाघाती टीका केली. संजय राऊत म्हणाले कि, पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून कुत्रा मालक होत नाही आणि मालक भिकारी होत नाही, तर रावणाला धनुष्यबाण पेलवणार नाही. ते धनुष्यबाण रावणाच्या छाताडावर पडेल. शिंदे गटाचे आमदार हे आमिषाला बळी पडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष त्यांच्या मालकीचा कसा? निवडणूक आयोगाचा हा निर्णय सर्व कायदे पायदळी तुडवून दिला आहे. याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब…
जळगाव : प्रतिनिधी सिहोर येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष उत्सवादरम्यान शुक्रवारी एका तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील जळगाव येथून पालक मुलासह कुबेरेश्वर धामला पोहोचले होते. दरम्यान, आणखी एका महिलेचाही जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दोन दिवसांत दोन महिलांसह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 73 जण आजारी पडले आहेत. गुरुवारी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी परिस्थिती अनियंत्रित झाली होती. शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. यानंतर देशभरातून रुद्राक्ष खरेदीसाठी आलेले लोक रिकाम्या हाताने परतायला लागले. निवेदक पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह…
अमळनेर : जितेश चव्हाण मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात अनेक राज्यातून भाविक लाखोच्या संख्येने येत आहे. तर पहिल्याच दिवशी एका महिलेचा मृत्यू याठिकाणी झाला होता तर दुसऱ्या दिवशी खान्देशातील दोन महिलेचा मृत्यूची बातमी समोर येत नाही तोच आज पहाटेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील एका गावातील दोन भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात पहिल्या दिवशी गुरुवारी रुद्राक्ष घेण्यासाठी तब्बल २० लाख लोकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती उद्भवली. याच गर्दीत भोवळ येऊन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील ५० वर्षीय महिलेचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू…
जळगाव : प्रतिनिधी निमखेडी येथील विवाहितेचा माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या पतीविरोधात बुधवार, 15 फेब्रुवारी रोजी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. निमखेडी येथील माहेर व वढोदा येथील सासर असललेया मनिषा संदीप जाधव यांचा पती संदीप आनंदा जाधव याने माहेरुन दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ केला व मागणी पूर्ण न झाल्याने पती संदीप याने मनिषा हिस वेळोवेळी शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच शारीरीक व मानसिक छळ केला. हा त्रास असह्य झाल्याने मनिषा जाधव हिने याप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर बुधवारी संदीप जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. ते आज रत्नागिरीमधील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रत्नागिरीमध्ये पोहचले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले कि, तुरुंगात मला मारण्याचा प्रयत्न झाला. सध्या देशात आणीबाणीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. न्यायालये, उद्योगपती, माध्यमे तुमच्या खिशात आहेत. लोकशाहीच्या सर्व स्तंभाची मालखी तुमच्या ताब्यात आहे. निवडणूक आयोग तुमचे ऐकते, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. आडवे येणाऱ्याचे असे खून करणे सुरू आहे. मात्र, किती खून करणार. मला ही जवळजवळ मारण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला माणसे संपवण्यासाठी सत्तेवर आणले आहे का,…
देशातील सर्वात विश्वसनीय सरकारी संस्थांपैकी एक पोस्ट ऑफिस हे आहे. देशातील कोट्यवधी लोक बचत करण्यासाठी पोस्ट ऑफिसवर अवलंबून आहेत. पोस्ट ऑफिसचे जाळेही देशभर पसरलेय. परंतु अजूनही अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे कनेक्टिव्हिटी तितकीशी चांगली नाही. आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी, इंडियन पोस्टने काही काळापूर्वी फ्रँचायझी सेवा सुरू केली होती. यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी सहज घेऊ शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या परिसरात पोस्ट ऑफिसची सुविधाही देऊ शकता. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल… पोस्ट ऑफिसमध्ये फ्रँचायझी योजना पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, पोस्ट ऑफिस फ्रँचायझीचे दोन प्रकार आहेत. प्रथम आउटलेट फ्रेंचाइजी आणि फ्रेंचाइजी पोस्टल एजंट. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतीही फ्रँचायझी योजना निवडू शकता. कोण अर्ज…
पारोळा : प्रतिनिधी शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा सुरु असतांना याठीकाणी चोरट्यांचा चांगलाच हात साफ करायचे पाहायला मिळाळे आहे. एका शेतकरी खिश्यातून हजारो रुपये लंपास झाल्याची घटना घडल्यानंतर पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असल्याने पारोळा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारोळा तालुक्यासह शहरातील अनेक नागरिक या सभेत उपस्थित झाले होते. यावेळी तुफान गर्दी पाहून चोरट्यांनी आलेल्या लोकांचे खिश्यातून चांगलीच लुट केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालक्यातील देवगाव येथील रहिवासी सुनील युवराज पाटील (वय ३६) हे दि १६ रोजी मुख्यमंत्री…

