Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॉंग्रेसच्या खासदाराचे भारत जोडो यात्रेत आला मृत्यू !
    राजकारण

    कॉंग्रेसच्या खासदाराचे भारत जोडो यात्रेत आला मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात सुरु असलेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर सध्या हि यात्रा पंजाबमध्ये सुरु असतांना मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन झाले. ते राहुल गांधीसोबत यात्रेत चालत होते. यादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली.ल त्याना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.

    यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली आहे. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना सकाळी घडली. सकाळी 8.45 च्या सुमारास चौधरी संतोख सिंह यांची प्रकृती खालावली. त्यानंतर राहुल गांधीही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. चौधरी संतोख सिंग हे 76 वर्षांचे होते. सकाळी 9 वाजेपर्यंत राहुल गांधींनी फिल्लौरमधील भटियानपर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता. प्रवास टी-ब्रेकसाठी थांबवण्यात आला. टी-ब्रेकसाठी थांबलेले राहुल गांधी काही मिनिटे आत बसल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांसह कारमध्ये निघून गेले. फिल्लौरच्या भटियान येथील नंबरदार प्रभज्योतसिंग यांच्या घराबाहेर ही यात्रा सद्या थांबविण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.