Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार आहे. हे सर्व जण शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेनेत जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व…

Read More

देशात पुन्हा एकदा कोरोनानं पुन्हा डोकं बाहेर काढल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, शनिवारी देशात 2995 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर शुक्रवारी 3,095 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 18,389 आहे. एकूण आकडेवारीच्या 0.04 टक्के आहे. कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत देशात 4,47,22,605 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 4,41,73,335 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  जर तुम्हीही मद्यप्रेमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणात 1 एप्रिलपासून बिअरसह इंग्रजी देशी दारूच्या किमतीत 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय UP सरकारने घेतला असून या निर्णयामुळे आता दारू आणि बिअरच्या सर्व ब्रँडच्या किमती वाढल्या आहेत. जिथे बिअरच्या किमतीत पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर देशी दारू 5 रुपयांनी तर इंग्रजी दारूच्या ब्रँडवर 10 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 45 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित मिळालेल्या माहितीनुसार, योगी सरकारने तयार केलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाला या वर्षी जानेवारीमध्ये कॅबिनेटने मंजुरी दिली होती. या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जगातील सर्वात सुंदर भावना  प्रेम ही आहे, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं लोकांना महागात पडतं. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या झाशीमधून समोर आली आहे.यात एका मुलाने आपल्या प्रेयसीला (मामी) अडकवण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. मात्र, त्याचा हा डाव यशस्वी झाला नाही आणि तो पकडला गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकही थक्क झाले. हे प्रकरण झाशीच्या प्रेम नगर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने काही दिवसांपूर्वी एसएसपी कार्यालयात आपला मुलगा मातादीन याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अपहरणकर्ता 1 लाखांच्या खंडणीसाठी मेसेज करत असल्याचं सांगण्यात आलं. पैसे न दिल्यास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात नंदकिशोर शिंदे यांच्या मालकीच्या किराणा दुकानातून ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री करणाऱ्या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. विशाल शरद पाटील (२१, रा. मेहरूण) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शिंदे यांचे श्री समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. या दुकानातील कामगार विशाल याने ५ लाख ६९ हजार ५३० रुपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्याला पुण्यातून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर फायनान्स कंपनीतील आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु. कोल्हेनगर, जळगाव) या। तरूणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की, ३१ मार्चचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर शहरातील एका फायनान्स कंपनीत असणाऱ्या १०-१२ मित्रांच्या ग्रुपने बांभोरी पुलाजवळ हॉटेल मध्ये जेवणाला जाण्याचे ठरवले होते. अक्षय याने सुरुवातीला नकार दिला होता. परंतू नंतर एका मित्राच्या आग्रहाखातर तो जेवणाला सर्वात उशिरा पोहोचला. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर त्याने सेल्फी काढले. त्यानंतर…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील अट्रावल येथे बारागाड्यांवरून शुक्रवारी सायंकाळी झालेला वाद शनिवारी सकाळी ११ वाजता पुन्हा उफाळून आला. यात दोन गटात हाणामारी व नंतर दगडफेक झाली. यात महिला फौजदारासह १० जण जखमी झाले. १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचे वृत्त कळतात येथील पोलिस पथक घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. अट्रावल येथे शुक्रवारी सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता. त्यावर बसण्यावरून एका तरुणाशी वाद झाला होता. हा वाद शनिवारी सकाळी पुन्हा उफाळून आला. दोन्ही गटाकडून दगडफेक झाली. यात आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यात शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु असतांना राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात विकासकामाचे भूमिपूजन असो वा लोकार्पण असो असे अनेक कार्यक्रम सुरु आहे. तसेच कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विकासाची गंगा गावागावापर्यत पोहचविण्यात व्यस्त आहे. धरणगाव तालुक्यातील भोणे या गावी आज विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण गावातील एका कुटुंबावर शोककळा पसरल्याने हा कार्यक्रम मंत्री पाटील यांनी रद्द केला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामधील भोणे यागावातील जलजीवन मिशन अंतर्गत, अत्याधुनिक फर्निचर, व्यायाम शाळा, कॉक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक, सभा मंडप, यासह विविध विकास कामाचे आज भूमिपूजन असतांना…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  नोएडाच्या सेक्टर-58 मधील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी दोन भावांना अटक केली आहे. दोन्ही भाऊ मुलींचे आवाज काढून लोकांना फसवत होते. पोलिसांनी गुन्हेगारांना मुलीचा आवाज काढण्यास सांगितला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन भाऊ केतन अरोरा आणि चिराग अरोरा यांना अटक केली होती. दोन्ही भाऊ बेरोजगार तरूणांना जिगोलोची नोकरी देण्याच्या नावावर फसवत होते. पोलिसांनी सांगितलं की, व्हायरल व्हिडीओ हा एक सायबर फसवणुकीचा आहे. हे तरूण मुलींचा आवाज काढून लोकांची फसवणूक करत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 5 मार्चला एका पीडितने तक्रार दाखल केली होती की, त्याला एक स्पा सेंटर उघडण्याच्या नावावरून एक लाख 83…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई यांच्या नावाने संजय राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. दरम्यान यासंबधी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा हटवली आहे.…

Read More