Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका अल्पवयीन मुलगी शाळेमध्ये पेपर देण्यासाठी गेली असता ती पुन्हा घरी परत न आल्याने मुलीच्या आईने सावदा पोलिसात धाव घेत पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे  कि, रावेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १८ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास गावातील शाळेत १२ विचा पेपर देण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी पेपरची वेळ होवूनहि घरी परत न आल्याने आईने शाळेसह परिसरात चौकशी केली असता ती दिसून न आल्याने सावदा पोलिसात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील पांडे डेअरी चौकात क्षुल्लक कारणावरून एकाने संदीप दत्तात्रय वाणी (३०, रा. तुकाराम वाडी) या तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, फरशी मारणारा फरार झाला असून जखमीस जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात येऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन त्या तरुणाचा शोध सुरू केला.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरात गुरुवारी सकाळी दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे रूपांतर रात्री दगडफेकीत झाले. रात्री १० च्या सुमारास शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिस जखमी झाले आहेत. शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास भोईवाडा, मण्यार मोहल्ला, कासार गल्ली, दारू मोहल्ला भागात दोन गटात दगडफेक झाली. डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दोन्ही गटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यावर तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शिरसोली रोडवरील महाविद्यालयातून दुचाकीवर मित्रासोबत घरी येत असतांना दोघांनी चाकूचा धाक दाखवित मारहाण करीत तरुणाला लुटल्यााची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरातील श्रीकृष्ण लॉन्स परिसरात घडली होती. सोबत असलेल्या मित्राने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने प्लॅन तयार करुन हा गुन्हा केल्याचे उघड झाले असून एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला लुटणार्‍या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील किसनराव नगरातील अभिषेक जगन्नाथ निंभोरे हा तरुण त्याचा मित्र साहिल विजय कासार याच्योबत मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मोटारसायकलने रायसोनी इंजिनिअरींग कॉलेजकडून जळगावकडे येत होते. मेहरुण तलाव परिसरातील श्रीकृष्ण लॉन्सजवळ रस्यावर उभ्या असलेल्या दोन तरुणांनी दुचाकीस्वार तरुणांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरापासून जवळ असलेल्या महाविद्यालयातून दोन तरूण दुचाकीने घरी परतत असताना त्यांची दुचाकी थांबवत दोन जणांनी त्यांना लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेले दोन तरूण शिरसोली रोडवर असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दि २८ रोजी नेहमीप्रमाणे घरी परतत असतांना शहरातून जवळ असलेल्या कृष्णा लोन्स याठिकाणी दोन अनोळखी तरुणांनी त्यांची दुचाकी थांबवीत त्यांना मारहाण करीत त्यांच्या जवळील १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल व २ हजार रुपये किमतीची गळ्यातील चांदीची चैन घेत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी तरुणांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेत दि…

Read More

पुणे : वृत्तसंस्था न्यूड व्हिडिओ कॉल करून एका 64 वर्षीय नागरिकाला न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि पोलीस असल्याची बतावणी करून चार लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना अज्ञात नंबरवरून त्यांना व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल आला. त्यांना अश्लील व्हिडिओ दाखव नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ युट्युबवर टाकून तो डिलीट करण्यासाठी चार लाख…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा तालुक्यातील एका गावातील आई– वडील आजोबांचे निधन झाल्‍याने अंत्‍ययात्रेस गेले होते. यावेळी त्‍यांचा एकुलता एक मुलगा सुजित दिगंबर पाटील हा घरी एकटाच होता. सकाळी तो शेताकडे शौचास गेला असता त्‍याच्‍यावर मागून बिबट्याने हल्‍ला करत ओढत उसाच्‍या शेतात नेले. सायंकाळी घरी परतलेल्‍या आई– वडीलांनी शोधाशोध केल्‍यानंतर मोबाईल लोकेशनवरून त्‍याचा आज तपास लागला. पाचोरा तालुक्यातील सार्वे परिसरात आज सकाळी सदर घटना उघडकीस आली. सार्वे येथील दिगंबर पाटील हे शेती करून कुटूंबाचा उदरविर्वाह करतात. त्‍यांना सुजित हा एकुलता एक मुलगा तर मोठ्या मुलीचे लग्‍न झाले आहे. दरम्‍यान सुजित याच्‍या आजोबांचे (आईचे वडील) निधन झाल्‍याने आई– वडील हे बुधवारी (२९…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मुक्ताईनगर परिसरातील एसएमआयटी कॉलेजजवळ राहणाऱ्या वकिलाच्या घरी भरदुपारी काही संशयित आरोपींनी दरोडाच्या उद्देशाने येऊन वकिलाच्या १० वर्षाच्या मुलीवर दरवाजा उघडण्यासाठी दबाव टाकला. मात्र संशयित आरोपींना अजिबात न भिता या दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा न उघडून आरोपींना हिमतीने परतवून लावले. याबाबत बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, सचिन देविदास पाटील (वय-४३) यांनी याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची १० वर्षांची मुलगी शृंगी ही घरात एकटी होती. तेव्हा काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने…

Read More

इंदूर : वृत्तसंस्था  रामनवमीच्या दिवशी इंदूरमधून मोठी दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. आज देशभर अनेक ठिकाणी राम नवमीचा उत्सव साजरा होत असतांना अनेक मंदिरामध्ये हजोरो भाविक एकाच वेळी दाखल झाल्याने इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एक विहीरी वरील छत कोसळून त्या विहिरीत अनेक लोक पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकाचा मृत्यू झाला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देवस्कर घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत केसळल्याने सुमारे 50 जण विहिरीत पडले आहेत. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि १०८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. ही घटना…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट नोंदवली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज ३० मार्च रोजी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहेत. तर आज नोएडामध्ये पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले. तर गाझियाबादमध्ये त्याचे दर वाढताना दिसत आहेत. लखनौमध्ये आज तेलाच्या किरकोळ किंमतीतही वाढ झाली आहे. पाहा मुंबईतील पेट्रोलचे दर तर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा…

Read More