मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे अनेक भागातील शेतकरीचे नियोजन कोसळताना दिसून येत आहे. राज्यातील काही भागात पावसाचे संकेत तर काही भागात उन्हाचा चटका वाढणार असून कमाल तापमानात आणखी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. तसेच, शुक्रवारी (31 मार्च) काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. आजदेखील विदर्भ तसेच, उत्तर महाराष्ट्र व उत्तर कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये वर्धा येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात प्रथमच पारा चाळिशीपार गेला आहे. विदर्भात बहुतांशी ठिकाणी तापमान 38 अंशांच्या पुढे आहे. उर्वरित राज्यात…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील आठवडे बाजार परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील आठवडे बाजार परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्यास आहे. दि ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीने आईला सांगितले कि, आधार कार्डची झेरोक्स घेवून येते असे सांगत गेली असता पुन्हा परत न आल्याने काही वेळ परिवाराने शोधा शोध केली असता मिळून न आल्याने पाचोरा पोलिसात धाव घेत अनोळखी इसमा विरोधात अल्पवयीन मुलगी पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ.कैलास पाटील हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी निमखेडी शिवारातील पटेल नगर येथे पैशांच्या वादातून क्रिष्णवर्धन राजेंद्र पाटील (२२, रा. पटेल नगर) या तरुणाला दोन जणांनी लोखंडी रॉड व कुलप डोक्यात मारून जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरुवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. क्रिष्णवर्धन हा बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घराजवळ उभा होता. त्यावेळी दोन जण त्याच्याजवळ आले व त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी क्रिष्णवर्धन याने याविषयावर सकाळी बोलू असे म्हटल्यावर दोघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. दोघापैकी एका जणाने डोक्यात कुलूप मारले तर दुसऱ्याने डोक्यात रॉड मारून दुखापत केली. त्यानंतर गुरुवारी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद…
अमळनेर : प्रतिनिधी शहरात कसाली भाग व भोईवाड्यात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता घडली होती. यात १६ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री तीन तरुण मोटारसायकलवर जाताना मोठ्याने ओरडत होते. त्यावेळी काही जणांनी दगडफेक केली. त्यात गणेश पाटील व चरणदास यांना दगड लागले. दगडफेकीत मोटारसायकली, पथदिवे फोडण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय शिंदे, एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, हेको. किशोर पाटील, रामकृष्ण कुमावत, प्रमोद पाटील, मिलिंद भामरे, संदेश पाटील, शरद पाटील, रवी पाटील, दीपक…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका तरुणाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ टाकत भावना दुखावल्या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी दुपारी मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा व्हिडीओ गुरुवारी मध्यरात्री काही तरुणांच्या व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर त्यांनी शनिवारी शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, डीवायएसपी संदीप गावीत यांनीसुद्धा शहर पोलिस ठाण्यात येऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातून तरुणाची दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चोपडा तालुक्यातील वरडी येथील दगडू मयाराम कोळी (वय ३५) जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात दि २७ मार्च रोजी दुपारी आले असता. दुचाकी पार्क केलेली असतांना काही अनोळखी चोरट्यांनी या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.बी.४२८० हि सुमारे २० हजार रुपये किमतीची चोरून नेली आहे. या प्रकरणी त्यांनी तत्काळ जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.निलेश भावसार हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात क्रेनने मागून जोरदार धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली येवून महिला चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी रंजना उत्तम येशे (वय ५३) या महिलेचे यामध्ये मयत झाले आहे. त्यांचा मुलगा विकास हा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉंड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पाय जात…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे व शिंदेंच्या नेत्यामध्ये असा एकही संधी दोन्ही गटातील नेते सोडत नाही एकमेकावर टीका करण्यासाठी राज्यातील विरोधी पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत एक भाकीत केल्याने त्याची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे. काय म्हणाले जयंत पाटील? जयंत पाटील यांनी यापू्र्वीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. पाटील म्हणाले की, जर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. त्यात बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली, तर हे आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय कोणताही पर्याय असणार नाही, असा दावा त्यांनी केला. आता जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीबाबत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६९४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ३,०१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १८४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ९८.१४ टक्के इतकं आहे. राज्यात कोरोना, एच१ एन१, एच३ एन२ आणि इन्फ्लूएन्झा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, मास्क वापरा, दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवा, हात सॅनिटायझरने…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर ते शेंदुर्णीच्या दरम्यान आज ३१ मार्च रोजी सकाळी स्कूल बस उलटून झालेल्या अपघातात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. मिळालेली माहिती अशी की, पहाटे सुमारे सात साडेसात वाजेच्या दरम्यान सरस्वती विद्या मंदिर या शाळेची क्रमांक दोनची बस उलटली. पहूर ते शेंदुर्णी दरम्यान घोडेश्वर बाबा जवळ हा अपघात झाला. या बसमध्ये अंदाजित ४० विद्यार्थी आणि काही शिक्षक होते. यातील अंदाजे ३० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि काही शिक्षक जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींपैकी कुणाची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच…

