Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ३ मुलाच्या आईचे दोन तरुणावर प्रेम अन घडले ते धक्कादायक !
    क्राईम

    ३ मुलाच्या आईचे दोन तरुणावर प्रेम अन घडले ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskFebruary 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    प्रेम म्हणजे कुठलीही सीमा नसलेले असते. जे कधी कुणावर होईल हे कधीच सांगता येत नाही अशीच एक थक्क करणारी घटना घडली आहे. गुजरातमध्ये चमेली नावाच्या एका महिलेचं दोन तरुणांवर प्रेम जडलं होतं. या दोघांनाही तिने लग्नाची गळ घालत पिच्छा करायला सुरुवात केली होती. ही महिला विवाहीत होती आणि तिला 3 मुले आहेत.

    चमेलीचं पहिले अजय यादव नावाच्या तरुणावर प्रेम जडलं होतं. मात्र त्याचं गावाला लग्न ठरल्याने तो गावाला निघून गेला होता. यामुळे चमेली भडकली होती. अजय गावाला गेल्यानंतर चमेलीची ओळख अजयचा मित्र असलेल्या उदय शुक्लाशी झाली. चमेलीचं उदय शुक्लावरही प्रेम जडलं. उदयलाही चमेली आवडायला लागली आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले.

    उदय आपल्या प्रेमात पडल्याची खात्री झाल्यानंतर चमेलीने त्याच्याही मागे लग्न कर म्हणून धोशा लावला होता. उदय यामुळे कंटाळला होता. त्याने ही बाब अजय यादवला सांगितली होती. चमेली अजयच्याही पाठी लागली होती, ज्यामुळे या दोघांनी चमेलीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला चमेलीला बोलावून तिला ठार मारण्याचा कट रचला होता. उदयने चमेलीला बाईकवरून पदमला गावातील नदीकिनारी आणलं होतं, अजय तिथे आधीपासूनच पोहोचला होता. दोघांनी मिळून चमेलीचा गळा आवळला. दोघांनी मिळून चमेलीचा मृतदेह पुलावरून खाली फेकून दिला आणि दोघे पळून गेले. पोलिसांनी सखोल तपासाअंती या सगळ्या कटाचा उलगडा केला आणि अजय आणि उदयला अटक केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.