Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील २९ वर्षीय महिलेस नोकरीचे आमिष देत वेळोवेळी अत्याचार करी पैसे उकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पिडीत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका परिसरातील २९ वर्षीय रहिवासी महिलेला गेल्या तीन वर्षापासून संशयित आरोपी आसिफ हुसेन खान (४५, चाळीसगाव) याने नोकरीचे आमिष दाखवून महिलेकडून एक लाख रुपये घेवून त्या महिलेवर अत्याचार केला. हा प्रकार २१ जून २०२१ ते २७ मार्च २०२३ या दरम्यान घडला. पिडीत महिलेने मंगळवारी दुपारी शहर पोलीसात याबाबत त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील सिक्कीममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गंगटोक येथे आज दि.४ रोजी हिमस्खलन झाले. यामुळे ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाल्याचे हि समजते. याठिकाणी १५० पेक्षा जास्त पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये ४ पुरुष एक महिला तर एक लहान मुलाचा समावेश आहे. येथे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील नवल भाऊ कृषी महाविद्यालय  येथील बोगस प्राध्यापक व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील जबाबदार सक्षम अधिकारी यांचे वर फौजदारी कारवाई करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे लेखी तक्रार केली आहे. सविस्तर वृत्त असे की दिनांक २९ मे २०१७ पासून प्रा. शिवाजीराव बाबुराव शिंदे यांचे कडे कुठल्याही प्रकारची कृषी शिक्षणाची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण नसताना माननीय अध्यक्ष विजय नवल पाटील नवलभाऊ प्रतिष्ठान नवल नगर व तत्कालीन प्राचार्य डॉ. ई. एन. पाटील यांनी प्राध्यापक शिंदे यांची प्राध्यापक पदावर बेकायदेशीरपणे नियुक्ती नवलभाऊ कृषी महाविद्यालय अमळनेर येथे आपल्या हुकूमशाही व मनमानी पद्धतीने केली. प्राध्यापक शिंदे यांचा सेवाकाळ 16 महिन्याचा आहे . त्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात मार्च महिना संपला असतांना देखील अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात सर्वत्र पाऊस झाला. या पावसात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता एप्रिल महिन्यात पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यासंदर्भातील ट्विट ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी केलेय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे अजूनही पूर्ण झाले नाही. ४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्मिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे.…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, तरुण डॉक्टरने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुणाल भाऊराव चव्हाण (35) रा. स्नेहनगर तकिया वॉर्ड असं या डॉक्टरचं नावं आहे. कुणाला चव्हाण हे नागपूरच्या मेयो रूग्णालयात कर्तव्यावर होते. कुणाल यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी कुणाल यांचं लग्न होतं. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल चव्हाण हे नागपूरच्या मेयो रुग्णालयात कार्यरत होते. आपल्या मुलाला मोठ्या कष्टानं आई-वडिलांनी डॉक्टर बनवलं, मुलगा डॉक्टर झाल्यावर त्याच्या सुखी संसारचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यांनी आपल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थिनीचा फोटो मॉर्फ करून त्याद्वारे अश्लील फोटो तयार करून हॉस्टेल इन्चार्जला पाठवून ‘विद्यार्थिनीला हॉस्टेलमधून काढून टाकले नाही तर सदर फोटो व्हायरल करण्यात येईल’ अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने बदनामी केली म्हणून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थिनी हि महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. २२ मार्च रोजी हॉस्टेल इन्चार्ज यांच्या व्हॉटस्ॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थिनीचा मॉर्फद्वारे तयार केलेला अश्लील फोटो कुणीतरी पाठविला. त्यात विद्यार्थिनीबद्दल बदनामीकारक मजकूरही पाठवून जर विद्यार्थिनीला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  झारखंडमधील गुमला जिल्ह्यात एका 55 वर्षीय व्यक्तीने धारदार शस्त्राने गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे. बसिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाफू गावातील ही घटना आहे. जखमी माधो सिंग यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळच्या उपआरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना गुमला सदर रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. दरम्यान गुमला सदर रुग्णालयातही उपचार होत नसल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना रांचीच्या रिम्समध्ये रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. माथो सिंग असे त्यांचे नाव आहे. यावेळी त्यांचे भाऊ किशोर सिंग म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भावाचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तो विचित्र वागत होता. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  पुन्हा एकदा देशात कोरोनाचा कहर पहायला मिळतोय. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 (COVID-19) चे 3,038 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोविडचे 21,000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोविडमुळं 7 मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुळं 2, उत्तराखंडमध्ये 1, महाराष्ट्रात 1 (Maharashtra), जम्मूमध्ये 1 आणि दिल्लीत 2 मृत्यूची नोंद झाली आहे. आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या 4.47 कोटी (4,47,29,284) वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी 0.05 टक्के आहेत. कोरोना आजारातून बरं झालेल्या रुग्णांची संख्या 44177204 आहे. तर, कोविड रुग्णांचा मृत्यू दर 1.19 नोंदवला गेला आहे. आरोग्य…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  बनावट ट्रक क्रमांकासह बनावट ओळखपत्र वापरून बनवाबनवी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एकाने प्रेयसीला केलेला कॉल त्यांना गजाआड करण्यास पुरेसा ठरला. नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (३१) आणि हारुन रशीद साजिदखान (३८, दोघे रा. जयपूर) अशी या बनवाबनवी करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी जोधपूर येथे विकलेल्या १८ लाख रुपयांच्या ३२५ साबण पेट्या जप्त केल्या आहेत. राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेर येथील कंपनीतून साबणाच्या ५६ लाख रुपये किमतीच्या पेट्या असलेला ट्रक भरला. त्यानंतर तो माल घेऊन गायब झाला होता. या गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्र स्वामी होता. स्वामी याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील छत्रपती शिवाजी बगीचा जवळून एका ४५ वर्षीय महिलेची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर शहरातील समर्थ रेसिडन्सी परीसरातील रहिवासी असलेल्या हेमलता नामदेव शिंपी (वय ४५) या दि २१ फेब्रुवारी रोजीच्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजी बगीचा परिसरात पायी जात असतांना अनोळखी दुचाकीवर दोन चोरटे धूमस्टाईलने येत महिलेच्या गळ्यातील सोन्याची ४ ग्राम वजनाची पोत एकूण किमत १६ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली आहे.या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्य विरोधात गुन्हा…

Read More