जळगाव जिल्ह्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेदिवस वाढत जात आहे. यात पुन्हा या घटनेची भर पडली आहे. सून व सासऱ्याचे नाते अगदी वडील व मुलगी प्रमाणे असते पण याच नात्याला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात काळिमा फासला गेला आहे. धरणगाव तालुक्यातील १९ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील एका गावात रहिवासास असलेल्या सुनेला सासऱ्याने दि २९ मार्च ते ११ एप्रिल या दरम्यान शेतात व राहत्या घरात वेळो वेळी जबरदस्ती चुकीचे कृत्य केले म्हणून सुनेने पोलिसात धाव घेत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनी.संतोष पवार हे करीत आहेत.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. रात्री नव्हे तर आता भरदिवसा घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी भरदिवसा शहरातील चित्रा चौक आणि मणियार सुपर शॉपीसमोर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी पैशांच्या बॅगा लांबविल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांचा उरलासुरला धाक संपल्याची प्रचीती जळगावकरांना येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील जितेंद्र शालिग्राम भदाणे यांचा गावातच खते व बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास भदाणे हे त्यांचा मित्र गणेश नवल पाटील (रा. वडगाव, ता. जळगाव) यांच्यासोबत (एमएच. १८. बीसी ०२५७) क्रमांकाच्या कारने जामनेर येथे जाण्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी काव्यरत्नावली चौकाकडून आदर्शनगराकडे जात असलेल्या माय- लेकाच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात माय-लेक जखमी झाले असून ही घटना शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरटीओ कार्यालयाजवळ घडली. आदर्श नगरमध्ये वनिता सुरेश अग्रवाल या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवार, दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या मुलगा रौनक याच्यासोबत काव्यरत्नावली चौकाकडून घरी जात होत्या. आरटीओ कार्यालयाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने अग्रवाल यांच्या दुचाकीला समोरून धडक देऊन पसार झाला. अग्रवाल व त्यांचा मुलगा दुचाकीवरून पडून जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने तरुणासाठी पोलीस भरती घेतली होती त्याची मुंबई पोलीस भरतीसाठी कालिना ग्राऊंडवर मैदानी परीक्षा सुरू आहे. भरतीसाठी आलेल्या सचिन कदम या तरुणाचा धावताना कोसळल्याने आज मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील दहिवली येथील रहिवासी असलेले सचिन कदम हे लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते पोलीस भरतीसाठी कालिना मैदानात परीक्षेसाठी आले होते. त्यानुसार 1600 मीटर धावताना ते तिसऱया राऊंडला कोसळले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तापमानाचा पारा वाढलेला असल्यानेच धावताना भरतीसाठी आलेल्या तरुणांना भोवळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. या आधी 17 फेब्रुवारी रोजी वाशीमहून पोलीस…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील एका तालुक्यातील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तीन नराधम तरुणांनी शेतात वारंवार अत्याचार केल्याने त्यातून तरुणी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली. १६ वर्षीय पिडितेच्या तक्रारीनुसार, पारोळा तालुक्यातील ज्या शेत शिवारात ती कामाला जात असे तेथे संशयित शेतात कामाला येत जवळीक वाढून कधी एकाने तर दोघांनी अत्याचार केला शिवाय हा प्रकार सांगितल्यास तुझा आम्ही व्हिडिओ बनवला असून तो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वारंवार अत्याचार करायचे. या प्रकारानंतर फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर 11 एप्रिल रोजी खाजगी रुग्णालयात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यात देखील महिलांचा अत्यचारासह जीव जाण्याचे प्रमाण देखील दिवसेदिवस वाढत आहे. नुकतेच शुल्लक कारणावरुन जावयाने सासूची हत्या केल्याचा प्रकार हिंगोलीमध्ये घडला आहे. जेवण वाढण्याचा वाद इतका टोकाला गेला की जावयाने शेळी बांधायच्या खुंट्याने सासूची निर्घृण हत्या केली आहे. सासूची हत्या केल्यानंतर जावयाने लहानग्या मुलीलासुद्धा मारहाण केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला होता. तपासानंतर पोलिसांनी आरोपी जावयाला कुर्तडी शिवारातून अटक केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. जेवण वाढण्याच्या कारणातून जावयाने सासूला ठार केले आहे. पत्नीसोबत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. केवळ अमित शहा यांच्या सोयीसाठी भरदुपारी कार्यक्रम ठेवण्यात आला, असे दिसत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, भरदुपारी हा कार्यक्रम ठेवण्यात आला. अप्पासाहेबांच्या लाखो अनुयायांची सोय न पाहता कार्यक्रमासाठी अमित शहांच्या सोयीची वेळ पाहीली. संध्याकाळी हा कार्यक्रम घेतला असता तर दुर्घटना टळली असती. सोहळ्यात सर्व व्हीआयपी छत्राखाली तर अनुयायी तळपत्या उन्हाखाली असे चित्र होते. संजय राऊत म्हणाले, या दुर्घटनेवरुन आम्हाला कोणतीही टीका करायची नाही. आम्हीदेखील अप्पासाहेब व त्यांच्या मानवतेच्या सेवेला, कार्याला मानतो. सोहळ्यात उन्हामुळे त्यांच्या अनुयायामुळे जो काही…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 11 वर गेला आहे. तर अजूनही अनेकजण अत्यस्वस्थ आहेत. नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात या श्रीसेवकांवर उपचार सुरू आहेत. कडक उन्हात दोन तास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब सुरू झाल्याने या श्रीसेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यातील 11 जण दगावले. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. उष्माघाताचा तडाखा बसलेल्यांवर नवी मुंबई, कळंबोली, कामोठे, परिसरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 8 जणांना उपचार करून डिशचार्ज देण्यात आला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव…
जळगाव : प्रतिनिधी गणपती नगरातील एका किराणा दुकानाला रविवारी सकाळी ६.३० वाजता आग लागून व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या पथकाने व परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यांग व्यावसायीक राजेंद्र खिवसरा हे गेल्या तीस वर्षांपासून हे दुकान चालवित होते. या दुकानातून मिळणाऱ्या उत्प्नान्नातून खिवसरा आपले व भाचीच पोट भरत होते. सकाळी नेहा किराणा जनरल स्टोर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली.नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन केला. तसेच स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत या आगीत दुकानातील साहित्य जळून…
भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव येथील साकरी फाट्यानजीक दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक सूत्रधार करण संतोष सपकाळे (२४, रा. भुसावळ) यास वरणगावात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर आलेल्या तीन जणांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. गोळीबार प्रकरणातील एक सूत्रधार हा वरणगावात लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बसस्थानक चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी तिथून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले.

