एरंडोल : प्रतिनिधी शहरातील मुख्य रस्त्यावरील माऊली ज्वेलर्स दुकानातून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील प्रसाद वाघ यांच्या मालकीचे माऊली ज्वेलर्स ११ मार्च रोजी पहाटे दोन ते सव्वातीन वाजेच्या दरम्यान सोन्या चांदीचे दागिने तयार करण्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप न उघडता शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करीत ऑर्डरसाठी आलेले 50 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याची पॉलिश केलेले दागिने, एक लाख 10 हजार किंमतीच्या सोन्याची पॉलिश केलेल्या…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. मंड्याला पोहोचल्यावर पंतप्रधान रोड शो करत आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे देशाला समर्पित करतील. हा द्रुतगती मार्ग 118 किमी लांबीचा असून तो सुमारे 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. PM मोदींनी मंड्यात रोड शो सुरू करताच लोकांनी फुलांचा वर्षाव करत त्यांचं स्वागत केलं. पीएम मोदींना पाहताच लोकांनी चारही बाजूंनी फुलांचा वर्षाव सुरू केला, त्यामुळं त्यांची गाडी फुलांनी सजलेली दिसत होती. दरम्यान, मोदींनीही जनतेवर पुष्पवृष्टी केली. या द्रुतगती मार्गामुळं बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे 3 तासांवरून 75 मिनिटांवर येईल. प्रकल्प NH-275 च्या बेंगळुरू-निदघट्टा-म्हैसूर विभागाच्या…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड क्षेत्रातून एकामागून एक आघात होणारी बातमी समोर येत आहे. नुकतेच सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीतून दुःखद घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं निधन झालं आहे. त्यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनातून इंडस्ट्री अजूनही सावरलेली नाहीय. दरम्यान आता आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी आज सकाळी अखेरचा श्वास…
जळगाव : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर मुलासोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची तर दुसर्या घटनेत दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून 50 हजारांची मंगलपोत लांबविल्याच्या दोन घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जळगावात घडल्या. दोघ घटनांमध्ये दुचाकीवरुन दोन चोरटे आले आणि त्यांनी मंगलपोत लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जिल्हा उद्योग केंद्रा मागील बाजूस असलेल्या प्रोफेसर कॉलनीत वंदना सुभाष पवार या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि त्यानंतर ते मुलगा आर्यन सोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील बाजूस पायी जात असतांना समोरुन दुचाकीवर दोन इसम तोंडाला काळ्या रंगाचा…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील मोंढाळे येथे गेल्या पंधरा दिवसांपासून या शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अडकला आणि परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. हिवरखेडा शिवारात लागोपाठ दोन दिवस वासरांचा फडशा पाडत असलेल्या बिबट्याच्या शोधात वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी परिसरात ठाण मांडून होते. ट्रॅप कॅमेरा व रात्रीच्या गस्त सुरू होत्या. यातच गेल्या २७ फेब्रुवारीला मंगरूळ परिसरातील एका विहिरीत पडलेला बिबट्या आढळून आला. हा बिबट्याच हिवरखेडा परिसरातील असावा म्हणून सर्वांनी नि:श्वास सोडला. परंतु हिवरखेडा परिसरात ८ रोजी रात्री पुन्हा वासराचा फडशा पाडण्यात आला. वनखात्याचे अधिकारी विवेक होसिंग, उपवनसंरक्षक जळगाव व सहायक वनसंरक्षक एस. के. शिसव यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या २०१९ मध्ये कोरोनाचे रुग्ण चीनमध्ये आढळून आल्यानंतर अख्या जगभर या आजाराने हाहाकार माजविला होता. त्यानंतर देशाने यावर कठोर पावले उचलत निर्णय घेतल्याने भारत काही प्रमाणात कोरोनापासून लवकर दूर झाला होता. त्यानंतर आता चीनमधील काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे चीनमध्ये कोविडचे रूग्ण कमी होत असताना, दुसरीकडे फ्लूच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत. या कारणास्तव, चिनी अधिकारी काही शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करू विचारात आहेू. या निर्णयावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोक म्हणतात की असे केल्याने कोविडच्या काळातील परिस्थिती निर्मान होईल. चीनच्या शिआन शहरात लॉकडाऊनबाबत आपत्कालीन योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एक धककादायक घटना समोर आली आहे २५ वर्षीय विवाहितेचा नवरा कामाला गेला असता व मुलगा घराबाहेर खेळत असतांना गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि १० रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील रहिवाशी देविदास पाटील हे शहरातील हॉटेलमध्ये वेटरचे काम करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. शुक्रवारी सकाळी देविदास पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या कामासाठी घरातून निघाले. त्यांच्या पत्नी दिपाली देविदास पाटील या तीन वर्षांचा अल्पेश आणि १२ महिन्यांच्या चिमुकलीसह घरी होत्या. यावेळी दिपाली देविदास पाटील (वय २५) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लग्न झाल्यावरही अनेकांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. विवाहबाह्य संबंधामध्ये सर्वात जास्त अनैतिक संबंध हे घरातील संबंधित महिलेचे दीर किंवा दुसऱ्या कोणत्यातरी पुरूषासोबत असल्याचं कानावर आलं असेल. काही प्रकरणांमध्ये तर विवाहित पती किंवा पत्नी आपला संसार मोडून दुसऱ्यासोबत निघून जायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये धाकट्या भावाचेच आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस दोघे अंथरूणातच सापडतात त्यानंतर जे होतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. लहान भावाचे त्याच्याच मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असतात. विवाहित महिलेला तीन मुले असतात.…
नाशिक : वृत्तसंस्था सिडकोत एकतर्फी प्रेमातून घरात घुसून कुटूंबियांना जातीवाचक शिवीगाळ करीत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास गजाआड केले आहे. विशाल सुभाष शेलार (२८ रा. एकता चौक,राणेनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम (अॅट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून शेलार गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. एकतर्फी प्रेमातून त्याने गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मुलीचे घर गाठून तिच्याकडे प्रेमाची मागणी केली होती. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे संतप्त युवकाने दुस-या दिवशीही तिचे घर गाठत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील शेतकरीची बँक म्हणून नावाजलेली असलेली जिल्हा बॅकेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी…

