Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  उत्तर प्रदेशात तीन दशकांपासून दहशत असलेल्या प्रयागराज पश्चिम भागातच अतीक अहमदची भावासह निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना प्रसारमाध्यमांशी बोलतानाच दोघा भावांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून गोळ्या घालण्यात आल्या. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुंड अतिक अहमद हा २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी होता. तसेच अतिक अहमदवर उत्तर प्रदेशमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये खून, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांचा…

Read More

भुसावळ  : प्रतिनिधी  शहरातील साकरी फेकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोनजण जखमी झाले होते. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तीनही आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. साकरी फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास गोळीबाराची ही घटना घडली होती. यात अक्षय रतन सोनवणे (२६) आणि मंगेश अंबादास काळे (२५, दोन्ही रा. भुसावळ) हे दोनजण जखमी झाले आहेत. अक्षयच्या पोटात तर मंगेशच्या छातीत गोळी लागली आहे. या दोघांवर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत भुसावळ तालुका पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ तसेच खडका गावात राहणारे चार जण…

Read More

वरणगाव  : प्रतिनिधी  नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन जणांवर बिअरच्या बाटलीने हल्ला करून जखमी करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दिनेश सुरेश कोळी (कठोरा) असे या जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ‘ड्राय डे’ असतानासुद्धा काही अल्पवयीन मुले नागेश्वर मंदिरात बिअर पिऊन धिंगाणा घालत होते. त्यावेळी एकाने दिनेश कोळी (कठोरा) याच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडली. दिनेश याने या घटनेची माहिती आपला मावसभाऊ सागर रवींद्र कोळी (२२, रा. फुलगाव) यास कळविली. तो तेथे आला असता त्याच्यावरसुद्धा चौघांनी हल्ला चढवून हात फ्रॅक्चर केला. याबाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आपल्या देशात आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्ती दादा किंवा ताई म्हणतात. विशेष म्हणजे मोठ्या भावाला दादा किंवा भैय्या हा शब्द अधिक प्रचलित आहे. ताई किंवा दीदी हा शब्द मोठ्या बहिणीसाठी अधिक वापरला जातो. आता तुमच्या मनात एक शंका आली असेल की आम्ही आज हे तुम्हाला का सांगतोय. त्या संबंधिक एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाली आहे आणि त्यावर लोकं कमेंट करीत आहेत. ऑनलाईन व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये एक तरुणीने अशा व्यक्तीसोबत लग्न केलं आहे की, ती त्या व्यक्तीला भाऊ म्हणत होती. त्या तरुणीचं नाव विनी आहे. विनी आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या पती जय याला भैया…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना अमळनेर शहर व परीसरात काही अज्ञात आरोपी है आगामी काळात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याबाबात खात्रीशिर गोपनिय बातमी मिळाली होती त्यावरुन त्यांनी त्यांचे अधिनिस्थ पोलीस अधिकारी व अमलदार यांना अधिक सतर्क व सक्त गस्त करणे परीसरात सतत गस्त करणे, पोलीस स्टेशन हद्दतील हॉटेल, ढाबे, लॉजेस इ. वारंवार चेक करुन तेथे येणा-या जाणा-या इसमांची माहीती ठेवणेबाबत व अशा इतर अनेक उपयुक्त सुचना दिल्या होत्या. वरील सुचनाप्रमाणे दि. १०/०४/२०२३ रोजीच्या रात्रगस्त अंमलदार पोहेकॉ संजय पाटील, पोहेकॉ / अरुण बागुल, पोहेकॉ / किशोर पाटील, पोहेका / कपिल पाटील, पोहेकॉ / सुनिल पाटील,…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभास्थळाची पाहणी केली. या सभेला जवळपास लाखभर लोक गर्दी करतील, असा दावा यावेळी त्यांनी केला. नागपुरातल्या सभेसाठी जागा कमी आहे, लोकांचा विरोध आहे, अशा अफवा पसरवल्या. मात्र, या सभेला भाजपचा विरोध असल्याचे दिसते. जवळपास पन्नास ते साठ हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथे केली आहे. बाजूच्या जागा आहेत. एक लाखाच्या वर याठिकाणी लोक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सगळी भीती लक्षात घेता भाजपने रणनीती थेट कोर्टापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मनामध्ये असलेली या धास्तीतून ते या सभेला विरोध करत होते. या सभेत एका पक्षातून दोन लोक बोलणार असल्याचे ते म्हणाले.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्याा घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबविल्याची घटना बुधवार १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि,  साकेगावातील रहिवासी असलेले नरसिंग काकडीया वसावे (वय २५) हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकिच्या घरात भाडेकरू आहेत. शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडे तत्वाने राहतात. बुधवारी रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाजाची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्याने घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, 18 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस दरीत कोसळली असून यात १३ जणांचा मृत्यू झाले असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 42 प्रवासी होते. 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जणाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. तर, या दुर्घटनेत 29 प्रवासी…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  महिलेच्या मोबाईलमधे काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहित महिलेचे फोटो स्टेट्सला ठेवल्याने विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  भुसावळ तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. या घटनेतील संशयित आरोपी कैलास तायडे याने विवाहीतेकडून वेळोवेळी काही रक्कम उधार घेतली होती. दरम्यानच्या कालावधीत त्याने आपल्या मोबाईलमधे तिचे फोटो काढले होते. विवाहीतेने आपल्याला वेळोवेळी उधार दिलेली रक्कम पुन्हा मागू नये यासाठी त्याने मोबाईलमधे काढलेल्या फोटोचा आधार घेतला असे विवाहीतेचे म्हणणे आहे. ते फोटो आपल्या पतीला दाखवण्याची धमकी कैलासने दिली असा विवाहीतेचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  धावत्या रेल्वेतून म्हसावद ते बोरनार रेल्वे लाइनवर पडून शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाइकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी म्हसावद ते बोरनार अप रेल्वे लाइनवरील खांबा क्रमांक ३९५/२४-२२ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. ही घटना स्टेशन प्रबंधकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अंगझडती घेतली, मात्र ओळख पटेल असे काहीही मिळून आलेले नाही. अखेर मृतदेह जिल्हा…

Read More