पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत काल ठाकरे गटाचे नेते देसाई यांचे सुपुत्र शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय तर आज दुसऱ्या दिवशी भाजपने पुण्यात पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केली आहे. मे महिन्यात उद्धव ठाकरे खुद्द पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा महाविकास आघाडीच्या वतीने असणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशपांडे हे पुणे महापालिकेचे…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रेम प्रकरणातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होत असताना नेहमी दिसून येत आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून चार मुलांची आई असलेली महिला आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. त्यानंतर पतीने तिला परत मिळवण्यासाठी कोर्टाकडे मदत मागितली. ज्यानंतर पोलिसांनी महिलेला शोधलं. घटनेबाबत महिलेचा पती रंजीत कुमार महतो याने कोर्टात दिलेल्या अर्जात सांगितलं की, ‘माझं लग्न 2010 मध्ये जवळच्या गावातील तरूणीसोबत झालं होतं. ज्यानंतर आम्हाला चार मुले झालीत ज्यात दोन मुलं आणि दोन मुली आहेत. पतीने पुढे लिहिलं की, घरातील सगळेच लोक पंजाबमध्ये मजुरीचं काम करतात. याचाच फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नीतीश कुमार महतोने त्याच्या 20 वर्षीय पत्नीला वहिनी-वहिनी म्हणून आपल्या प्रेमाच्या…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक पक्षातून नेत्यासह कार्यकर्ते प्रवेश घेत असतानाच जळगाव जिल्ह्यात हि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत अनेक गावात तरुण कार्यकर्ते प्रवेश करीत आहे. याचाच प्रत्यय आज पाळधी जिल्हा परिषद गटात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील दौऱ्यावर असतांना अनेकांनी प्रवेश करून घेतला. जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्या उपस्थितीत कवठळ येथील शेकडो तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला. पाळधी जिल्हा परिषद गटात जिल्हा प्रमुख आपल्या गावी हा दौरा सुरू होता या वेळी कवठळ येथील तरुणांनि प्रेवश केला लवकर युवासेना शाखेचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच बोलबाला मानला जात…
जळगाव : प्रतिनिधी धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या चार जिल्ह्यांत विस्तारलेल्या जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत ऍड. गुणरत्ने सदावर्तेच्या यांची एसटी कष्टकरी जनसंघ परिवर्तन पॅनलने कर्मचारी विकास आघाडीचा धुव्वा उडवीत १७ च्या १७ जागांवर विजय मिळवीला. विजया नंतर मतमोजणी ठिकाणी परविर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला होता. तसेच बस स्थानकाबाहेर देखील जल्लोष पॅनलतर्फे करण्यात आला. जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत ऍड. गुणरत्ने सदावर्ते यांची एसटी कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनलने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच पारंपरिक विरोधक असलेल्या इंटक, कामगार संघटना व कामगार सेना या तीन भिन्न विचारांच्या संघटना या एकत्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक पती आणि दोन पत्नींमध्ये झालेली डील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हरयाणाच्या गुरुग्राममध्ये नोकर करत असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर विवाहित असूनही सोबत काम करणाऱ्या एका तरूणीच्या प्रेमात पडला. अविवाहित असल्याचं सांगत त्याने सोबत काम करणाऱ्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. काही महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने लग्न केलं. इकडे माहेरी असलेली त्याची पत्नी त्याचा शोध घेत गुरुग्राममध्ये पोहोचली. तेव्हा त्याच्या दुसऱ्या पत्नीबाबत खुलासा झाला. पत्नी ग्वाल्हेरला येऊन फॅमिली कोर्टात केस दाखल करणार होती. पण काउन्सेलर हरीश दिवाण यांनी दोन महिला आणि पतीला बोलवून काउन्सेलिंगच्या माध्यमातून त्यांच्यात एक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहून एका पित्याला राग अनावर झाला. त्याने दोघांवर गोळीबार सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडाचं आहे. ४४ वर्षीय आरोपीचं नाव डेने व्हिक्टर मिलर आहे. त्याने आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन लोकांना पाहिलं होतं. त्यात एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत होती. हे पाहून तो संतप्त झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन केला आणि मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 8 मार्च रोजी ज्या दोन व्यक्तींवर गोळीबार करण्यात आला ते मिलरचे रूममेट होते आणि ते…
जळगाव : प्रतिनिधी मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशन तर्फे भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कर सोहळा संपन्न झाला. सामाजिक,शैक्षणिक क्रीडा व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यचे प्रस्तव घेउन सर्व पळताळणी करून हा पुरस्कर प्रदान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी समर्थ ट्रस्टचे मनोज अण्णा पाटील,आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, प्रतिक्षाताई पाटील,करीम सालार सर, जिल्हा महिल व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी,मराठी प्रतिष्ठान चे जमील देशपांडे,समुपदेशक भारतीताई रंधे,नोबल स्कूल चे संचालक अर्चना सूर्यवंशी मॅडम, निवेदिताताई ताठे,तसेच संस्थेचे अध्येक्ष फिरोजभाई शेख सर व आदी मान्यवर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका तरुणाला प्रेयसीने घड्याळ गिफ्ट दिल्याची कुणकुण तरुणाच्या पतीला लागल्याने तिने हे घड्याळ फोडले असता पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत घडली. याप्रकरणी रविवारी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत, म्हणून जखमी महिला ही माहेरी निघून गेली होती. शनिवारी सायंकाळी ६ वाजता महिला ही सासरी परतली. तेव्हा पतीला त्याच्या प्रेयसीने दिलेली घड्याळ या महिलेला घरामध्ये दिसले. ही घड्याळ तिने फोडली. हा प्रकार पतीच्या लक्षात आल्याने त्याने महिलेला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील लोखंडी रॉड…
यावल : प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून संशयिताने महिलेचा रस्ता अडवला. तसेच प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महिलेने तत्काळ येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली.त्यानंतर पोलीस ठाण्यात संबधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार अजिज शेख काम करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी भरधाव एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात १३ सोमवार रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वरणगावजवळील सुसरी शिवारात घडला. या अपघाताने बोदवड तालुक्यातील मनेर बु.॥ गावात मोठी शोककळा पसरली आहे. सचिन राजेंद्र शेळके (२६), भागवत प्रल्हाद शेळके (४३) व जितेंद्र कैलास चावरे (३२, तिघे रा.मनुर बु.॥, ता.बोदवड) अशी मयतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनुर बु.॥ येथील तरुणाचा वरणगावजवळील पिंपळगाव येथे सोमवारी विवाह असल्याने वर्हाडी जमले होते तर मनुर गावातील तिघे भावकीतील तरुणही लग्नस्थळी आले होते व लग्नाला दुपारी अवकाश असल्याने वरणगावातील नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जातो म्हणून सचिन…

