जळगाव : प्रतिनिधी येत्या २३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर उद्धव ठाकरे येणार आहेत. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ आर ओ तात्यांचे माझ्यावर उपकार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत येत असतील तर त्यांचे स्वागत मात्र त्यांनी चौकटीत बोलावं. तसं पत्र मी एसपींना देणार आहे. संजय राऊत सारखा माणूस माझ्याविषयी बोलणार असेल तर सभेत घुसेल असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे. मार्च महिन्यात मालेगाव येथील सभेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सणकून टीका केली होती. संजय राऊत हे राज्यसभेवर आमच्यामुळे निवडून गेले असं गुलाबराव पाटील म्हणाले…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवी पेठ परिसरातून एका कामगाराची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी शहर पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कुसुंबा शिवारातील सुरेशदादा जैन नगरातील राहिवासी शांताराम शालीग्राम वाघ (वय ४६) हे हातमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. ते दि १४ एप्रिल रोजी गावात कामानिमित आले असता त्यांनी आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.सीएच.४०१६ हि नवी पेठ परिसरात असलेल्या एका दुकानाच्या बाजूच्या गल्लीत लावलेली होती. आपले काम आटोपून आल्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांना दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात कोरोना कंट्रोलमध्ये आला असं म्हणता म्हणता आता पुन्हा एकदा देशात वेगानं पसरायला लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मास्कच्या गाइलाइन्स पुन्हा आल्या आहेत. कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण आता 28 टक्क्यांपर्यंत पोहोचवं आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत असल्याने केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासात, कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 1767 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. २४ तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने बुधवारी शेअर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली. आरोग्य विभागाकडून आलेल्या बुलेटिननुसार, दिल्लीतील संसर्गाचा दर २८ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षी 14 जानेवारी…
धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील महिलासह अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. त्यात पुन्हा एकदा धरणगाव तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात महिलेसह एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दि १५ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी समाधान संतोष जाधव हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तू माझ्याशी बोलण्या चालण्याचे संबध ठेव असे बोलला. त्यावर पिडीतेने मी तुझ्याशी कशाला बोलू व तू पण माझ्याशी बोलुन नको असे बोलली. याचा राग आल्याने समाधान याने पिडीतेचे हात आणि केस पकडून चापटाबुक्कयांनी मारहान केली. तसेच संशयित आरोपीच्या नातेवाईक महिलेने देखील अल्पवयीन…
जळगाव : प्रतिनिधी घरात लग्नाची धामधूम सुरू, त्यात लग्नाच्या पत्रिका छापून आता लग्नघटिकेची वाट पाहत असलेल्या तरुणावर अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांसाठी हद्दपारीचे कारवाईचे आदेश काढले आहेत. संबंधित युवकावर आधी असलेल्या विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून आलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील साने गुरुजी वसाहत या भागातील रहिवासी असलेल्या आकाश भोई असे कारवाई झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाशचे ३ मे रोजी चोपडा येथे लग्न आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच, त्याच्या आधी मात्र, लग्नाच्या काही दिवसांआधीच आकाशवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच आकाशवर हद्दपारीची ‘हथकडी’ घालण्याची वेळ आली आहे. आकाशवर याआधी चोपडा पोलिस…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो आहे. प्रेमात कधी धोका मिळाला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा काहीच नेम नाही. दरम्यान असेच एक प्रकरण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून `समोर आले आहे. प्रेयसीने लग्न केल्याने प्रियकर थेट मुलीच्या घरी प्रेयसीला भेटायला गेला. यावेळी प्रेयसीने सोबत येण्यास नकार दिल्याने तिच्याच घरात थेट गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. डेहराडूनच्या प्रेमनगर भागातील ही घटना आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे घर जवळच होते. परंतु मागच्या दोन महिन्यांपासून प्रेयसी आपल्या सोबत बोलत नसल्याने नाराज प्रियकर तिच्या घरी कोण…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारच्या आजच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. फडणवीस म्हणाले, “सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी जमीनी घेण्यात येतील तीस वर्षानंतर त्यांची जमीन त्यांना परत मिळेल, दरवर्षी यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ होईल. जो काही फीडर आहे त्याच्या पाच किमीच्या भागातील कुठलीही खासगी जमीन यासाठी घेणार आहोत. तसेच सरकारी जमीन असेल तर पाच-दहा किमी क्षेत्रातील जमीन आम्ही घेणार आहोत. यामुळं मोठ्या प्रमाणावर…
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर महावितरणच्या कार्यालयातील टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव एसीबीने दिड हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे वीज कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात करण्यात आली. सिनी.टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार व खाजगी ईसम कलीम तडवी अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. जळगावातील तक्रारदाराचे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे पत्र्याच्या शेडमध्ये घर असून तेथे वीज मीटर देण्यासाठी संशयितांनी यापूर्वीच दोन हजार रुपये डिमांड नोटसाठी घेतले होते मात्र मीटर लावून देण्यासाठी दिड हजार मागितल्यानंतर बुधवारी एसीबीकडे तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. खाजगी इसमासह टेक्नीशीयने लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. हा…
जळगाव : प्रतिनिधी रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव हददीत पिंप्राळा आठवडा बाजार परीसरातुन तसेच महाबळ परीसरातील छत्रपती संभाजी महाराज नाटयगृह जवळील बाजार परीसरातुन दि. ०७/०४/२०२३ व दि.१३/०४/२०२३ रोजी अज्ञात चोरटयांनी मोबाईल जबरीने हिसकल्यावरुन रामानंद नगर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुरनं ११० / २०२३ भादवि ३९४, ३४ व गुरनं ११८ / २३ भादवि ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची आरोपींची सखोल चौकशी केली असता. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, जळगाव भाग जळगाव यांचे मागर्दशन व आदेशाप्रमाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील नेम स्थागुशा जळगाव यांचे मदतीने पोलीस…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढले आहे. आता मात्र चोरट्यांनी देवाला सुद्धा सोडले नसून देवाचे सुद्धा दागिने लंपास करण्यात चोरटे मागचा पुढचा विचार करीत नाही. अशीच एक घटना नाशिकमध्ये रविवार कारंजा येथील प्रसिध्द चांदीचा गणपती मंदिरातून चोरी करून सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करणा-या परप्रांतीय चोरट्यास सरकारवाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. हा चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सराफ बाजार पोलिस चौकीतील कर्मचा-यांच्या नजरेत आला. पण, या चोराने रात्रीच्या वेळी गोदापात्रात उडी घेतली. पण, पोलिस पथकाने त्यास हुडकून काढत त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहाल उदयभान यादव (२१ मुळ रा. मध्यप्रदेश, हल्ली अमृत दुग्धालय…

