मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्याभरापासून राजकीय क्षेत्रात चर्चेत असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे. सध्या तेच पत्र सोशल मिडीयावर व्हायरल होवू लागले आहे. अजित पवार यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी,अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे.” मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र दिनीच ही…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून दिवसेदिवस मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या वाढला आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यातील चांदवड शहरात घडला आहे. चांदवड शहरातील गाडगाव चौक भागात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दीपक रविंद्र गायकवाड असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक गायकवाड हा बालक बुधवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या अंगणात खेळत असतांना ही घटना घडली. पळत आलेल्या पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने त्यास चावा घेतला होता. कुटूंबियांनी बालकास तात्काळ चांदवड येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. चांदवड…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याचे राजकारण देशभर चर्चेत आहे. सध्या कधी राजकीय भूकंप होणार याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. रोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा झडत आहेत. आता तर ठाकरे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगत असताना उदय सामंत यांनी नव्या चर्चेबाबत विधान केल्याने येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार अशी चर्चा रंगली आहे. नवी मुंबईतील खारघर…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल/ प्रसंसानीय सेवे बद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक/ शौर्य पदक/ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र सन-२०२२ वर्षाकरिता राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी जाहीर केले व बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनीही पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक संजय हरीदास पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र हिरालाल कुमावत,…
मुंबई : वृत्तसंस्था विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या देखील बातम्या मोठ्या प्रमाणात येवू लागल्याने अजित पवार माध्यमासमोर येत खुलासा केला होता पण त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सूचक विधान करीत अनेकांना कोडे पाडले असून आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुणांना योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही.’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी…
जळगाव : प्रतिनिधी माझ्या आत्महत्येला चार लोक सर्वस्वी जबाबदार आहेत. मला वारंवार मानसिक त्रास देऊन मला जिवे मारण्याची धमकी देत असतात. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नसून मला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, अशी सुसाईड नोट लिहून उमेश एकनाथ ठाकूर (३७) यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता रामेश्वर कॉलनीमध्ये उघडकीला आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उमेश ठाकूर यांनी गळफास घेतल्याचा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मन हेलवणारा आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दीक्षितवाडी परिसरातील पीयूष नरेंद्र पाटील यांच्यासह त्यांच्या आईला गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात स्वतःच्या काकांसह ९ जणांनी मारहाण करून १२ लाख ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीयूष पाटील यांच्या फिर्यादीवरून बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अॅड. विजय पाटील यांच्यासह पीयूषच्या तिन्ही काकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षित वाडी परिसरतील माजी नगरसेवक स्व. नरेंद्र भास्करराव पाटील यांचे घर आहे. पहिल्या माळ्यावर मुलगा पीयूष नरेंद्र पाटील हा आई ज्योती यांच्यासह राहतो. तर तळ मजल्यावर काका विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील राहतात. नरेंद्र पाटील यांचे…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात एकाच रात्री आठ बंद घरांत चोरट्यांनी चोरी केली आहे हि घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात उघडकीस आली आहे. यात काही ठिकाणी रोख रक्कम लंपास केली, तर काही ठिकाणी नासधूस केली आहे. ही घटना २६ रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे. अभय धनगर यांच्या कपाटातील बचत गटाच्या हप्त्याचे ठेवलेले १६ हजार रुपयेही लंपास झाले. त्यानंतर डॉ. पंकज मराठे यांच्या दवाखान्यात नासधूस करण्यात आली आहे. कल्याणसिंग पाटील यांच्या घरातील पर्समधील २० हजार रुपये लंपास केले. अयोध्यानगरच्या आश्रमशाळेतील रामेश्वर आंधळे यांच्या घरात नासधूस करण्यात आली. आंधळे यांच्या घरात दुसऱ्यांदा घरफोडी करण्यात आली आहे. अनिल मनोरे यांच्या घराचासुद्धा कडी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यापासून सायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्या गुन्हाची उकल करीत असतांना रामानंद नगर पोलिसांना यश आले असून यातील एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ३१ सायकली देखील जप्त करण्यात आल्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश पार्क शिवकॉलनी परिसरातील गिरीश गोविंदा खैरकर (वय-२२) या तरूणाची सायकल २१ डिसेंबर २०२२ रोजी सायकल चोरी गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासह इतर ठिकठिकाणी सायकली चोरीचे गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, उपविभागीय पोलीस…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला झाला. या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, “आमच्याकडे अशी माहिती आली आहे. हे खूप दुःखदायक आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1651160037145067520?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1651160037145067520%7Ctwgr%5E8a95abf9f147ce19d3a7a81452c2e2883befe7d2%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2F11-jawans-died-in-naxal-attack-dantewada-chhattisgarh-many-injured-rak94 मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरणपूर भागात नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट केला. आज दंतेवाडा येथील अरनपूर भागात नक्षलवादी लपल्याची बातमी मिळाली होती. या माहितीवरून दंतेवाडा येथील डीआरजी दल नक्षलविरोधी अभियानासाठी अरणपूरला गेले होते. शोध मोहिमेनंतर सर्व जवान परतत असताना माओवाद्यांनी…

