धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी आज शुक्रवार २८ रोजी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असतांनाच गोंधळी गोंधळ घालण्यासाठी तयारच असल्याचा अनुभव बहुतांश मतदान केंद्रावर दिसून आला. दरम्यान जळगाव शहरात नूतन मराठा महािवद्यालयातील मतदान केंद्रावर हमाल मापारी मतदार संघातून बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याचा संशयकल्लोळाने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया बंद करण्याची मागणी करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक स्तरावर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे मतदान प्रक्रिया पूर्ववत करीत जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ४० तर सायंकाळी मतदान संपेपर्यंतर सरासरी ०० टक्के…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन सारखी दिसणारी मॉडेल क्रिस्टीना एश्टनचे वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. हॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किम कार्दशियनला ओळखले जाते. संपूर्ण जगात तिचे कोट्यवधी फॅन्स आहेत. अनेक मुलींना तर तिच्यासारखे दिसण्याची देखील इच्छा असते. अशीच इच्छा होती मॉडेल क्रिस्टीना एश्टनची. तिची ही इच्छा खूपच मोठी होती आणि म्हणूनच तिने प्लस्टिक सर्जरीचा आधार घेतला. प्लस्टिक सर्जरीनंतर क्रिस्टीना किम कार्दशियनसारखी दिसत होती, मात्र पूर्ण किम नव्हती. यासाठी तिने जगभर फिरुन अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. या अनेक सर्जरी केल्यानंतर ती हुबेहुब…
अकुलखेडा : प्रतिनिधी दिनांक २३ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू एसएससी बॅच 2002 चे माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न झाला सदर मेळाव्याच्या कार्यक्रमाला श्री. अनिल रामदास पाटील अध्यक्ष तर डॉ. पराग पाटील उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली सदर बॅचचे विद्यार्थी तब्बल 21 वर्षानंतर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र जमले होते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद एकमेकांना भेटून गगनात मावत नव्हता अशी स्थिती झालेली होती . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिल रामदास पाटील (अध्यक्ष) , डॉ पराग पाटील( उपाध्यक्ष),श्री. हेमंतकुमार आत्माराम महाजन(चेअरमन), श्री. घनश्याम विश्वनाथ पाटील. (कार्यकारणी सदस्य ), श्री सुनिल दगडू महाजन(माजी सभापती), श्री. अतुल वासुदेव महाजन -…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून पवार भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या होत्या. त्यानंतर अनेक नेत्यांनी टीका टिपण्णी सुरु झाली आहे. यात आता राज्यमंत्री आठवले यांनी देखील मोठा दावा केला आहे. अनेक नेत्यांची इच्छा आहे कि आपण मुख्यमंत्री व्हावे, अजित पवारांचीही आहे; पण ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही. पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, तर राज ठाकरेंना सोबत घेणे भाजपला देशपातळीवर परवडणारे नाही. माझा पक्ष आहे, तोपर्यंत राज ठाकरेंची आवश्यकता नाही, असा टोलाही श्री. आठवले यांनी लगावला. सांगलीकडे जाताना मंत्री आठवले आज दुपारी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात अल्पवेळ थांबले होते.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता पुन्हा एकदा ठाकरे गट व शिंदे गट आमने समाने येत आरोप प्रत्यारोप करू लागल्याने राज्यातील जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. काम’गार’ करणारे हे सरकार आहे. राज्याचे काय होणार? मुख्यमंत्री असताना मला जे करता आले ते मी केले. परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले, त्याचा बदला मी घेणारच, जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गटाला गुरुवारी दिला. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवताहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेला ५६ वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेला ५५ वर्षे झाली तरीही…
मुंबई : वृत्तसंस्था जोडे पुसायची लायकी असणारी लोकं सध्या राज्य चालवत आहेत. महाराष्ट्राचं पुढे काय होणार? मी मुख्यमंत्री असताना जे मला करता आले ते मी केले. परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून माझे सरकार पाडले, त्यांचा बदला मी घेणारच, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेयांनी आज केला होता. मात्र उद्धव ठाकरे यांची त्यांची जोडे पुसणारी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खूपच जिव्हारी लागली आहे. त्यांनी यावर आपल्या ट्विटमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील हरिविठ्ल नगर परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठल नगर परिसरात परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १७ वर्षीय मुलीस दि २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाने घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने रामानंद नगर पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास मपोहेकॉ.उषा सोनवणे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील दांडेकर नगर परिसरातील सत्यम पार्कमधील बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सत्यम पार्क परिसरातील रहिवासी असलेले अशोक सुरेश जोहरे(वय ३१) हे खाजगी नोकरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि २३ रोजी दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले असतांना अनोळखी चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील राजाराणी कपाटाचे लॉकर तोडून ३२ हजारांचे सोन्याचे दागिने तर ४० हजराची रोकड लंपास केली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.संजय भालेराव हे करीत आहेत.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील एका २३ वर्षीय तरुणीला ५ वर्षापासून लग्नाचे आमिष देत तिच्यासोबत साखरपुडा करून लाखो रुपयाची मागणी करून साखरपुडा मोडला त्यानंतर पुन्हा तरुणीवर अत्यचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणीसोबत छत्रपती संभाजी नगरातील एका २६ वर्षीय तरुणाने सन २०१९ मध्ये तिच्यासोबत साखरपुडा करून तिच्यावर अत्याचार करीत एक लाख रुपयासोबत दुचाकीची मागणी करीत साखरपुडा रद्द केला. त्यानंतर तरुणीच्या परिवाराने दुसऱ्या मुलासोबत तरुणीचे विवाह केल्याने तरुणीच्या पतीला धमक्या देत फारकत द्यायव्यास लावली त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी तरुणाने तरुणीसोबत लग्न करून पुन्हा त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिला नांदायला…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणार्या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. २३ एप्रिल रविवार रोजी दुपारी चार वाजता महिला ही घरी असतांना तीन संशयित आरोपी अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी संशयीतांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रीयाज शेख करीत आहे.

