जळगाव : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यानंतर त्यातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील तरुणाला तब्बल १५ लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात शुभम सावंत व जॅस्मीन नाव सांगणार्या संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील देविदास कॉलनीत पवन बळीराम सोनवणे (२५) हा तरुण वास्तव्यास आहेत. 12 ते 22 एप्रिल 2023 दरम्यान पवन यास व्हॉटसअॅप 9626727480 वरून कॉल केलेल्या संशयीताने शुभम सावंत तर 009 +639366469803 क्रमांकावरून कॉल करणार्या संशयीताने जॅस्मीन नाव सांगून सोशल मिडीया तसेच टेलिग्रामवरून वारंवार संपर्क साधला. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, अशी भूरळ तरुणाला घालण्यात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र सुरूच आहे. भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्यामुळे तब्बल २२ जण जखमी झाले आहेत, तर अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली आहे. या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. दिप्तेश मोरेश्वर टेमघर (३१, रा. अष्टमी, ता. रोहा) असं अपघातात मृत प्रवाशाचं नाव आहे. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पनवेलवरुन महाडकडे निघालेल्या भरधाव वेगाने शिवशाही बसचा कर्नाळा खिंडीत आल्यानंतर अपघात झाला. अपघाताची…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर अनेक रस्त्यावर रोडरोमिओ दिसत असतात पण त्यावर कुठलाही अंकुश न बसत असल्याने एका मुलीने या मुलांना अद्दल घडविण्यासाठी एक सापळा रचला व ते मुल त्या सापळ्यात सापडले देखील हि घटना मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका तरुणीने त्रास देणाऱ्या रोडरोमिओला भेटायला बोलावले आणि चांगलीच अद्दल घडवली. माहितीनुसार, विद्यापीठ पोलिस स्टेशन परिसरातील रहिवासी तरुणी आणि तिच्या बहिणीला टवाळखोर तरुण फोन आणि मेसेज करून सतत त्रास देत होता. दोघींनी त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. अखेर त्याला धडा शिकवण्याचे दोघींनी ठरवले. तू ऐकायला तयार नाही तर भेटते, असे म्हणत एका तरुणीने त्याला आकाशवाणी समोरील झलकारी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि २३ रोजी दुपारच्या सुमारास घरी असतांना अनोळखी इसमाने तिच्या घरी येवून काही तरी फूस लावीत तिला पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी थेट एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी.रामकृष्ण मोताळे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी दुकान बंद करून पायी घरी निघालेल्या महेंद्र रामलाल कोंडे (३८, रा. धनगरवाडा, पिंप्राळा) या तरुणाला सात जणांनी रस्त्यात अडवून मारहाण करत सोन्याची अंगठी व एक हजार रुपये रोख चोरून नेल्याचा प्रकार पिंप्राळ्यातील मढी चौके येथे सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिराकडून मढी चौकमार्गे पायी घरी जात होते. मढी चौकात आल्यानंतर त्यांना सात जणांनी रस्त्यात अडवून एकाने त्यांना तुझ्या खिशात किती पैसे आहे, ते सगळे काढ, असे धमकावले. पण कोंडे यांनी त्याचा विरोध…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहिलं लग्न त्याने अरेंज मॅरेज केलं आणि चार दिवसांनी आपल्या प्रेयसीसोबत लव्ह मॅरेज केलं. इतकंच नाही तर तरूणाने आपल्या दोन्ही पत्नींना केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या घरात ठेवलं. यूपीच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूण महिन्यातील 15 दिवस आपल्या पहिल्या पत्नी राहत होता आणि दुसरे 15 दिवस आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. हे साधारण 1 वर्ष चालू होतं. हळूहळू पहिल्या पत्नीला पतीवर संशय येऊ लागला होता. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी तरूणाला अटक करण्यात आली आहे. मुजफ्फरपूरच्या दामूचक भागात राहणाऱ्या विकास कुमारने गेल्यावर्षी 25 एप्रिलला एका तरूणीसोबत अरेंज मॅरेज केलं…
अमळनेर : प्रतिनिधी शहरासह तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या खुनानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत अमळनेरात स्पीकरचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या करण्यात आली तर दुसर्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात तरूणाची कुर्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना सोमवार २४ एप्रिल रोजीच्या रात्री घडली. अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रमात सुरू असलेला लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (21) या तरुणावर सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली.…
कोल्हापूर : वृत्तसंस्था पार्टटाइम जॉबच्या नादात सॉफ्टवेअर इंजिनीअर प्रशांत शहापुरे (२९) यांची तब्बल २० लाखांहून अधिक रकमेने ऑनलाइन फसवणूक झाली. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ते मूळचे कोल्हापुरातील आहेत. शहापुरेंना फेब्रुवारीमध्ये टेलिग्रामवर प्राजना जानकी नामक महिलेचा मेसेज आला. चित्रपटांचे घरबसल्या रेटिंग करण्याचा पार्टटाइम जॉब असल्याचे तिने सांगितले. इंटरनेट प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून शहापुरेंना रेटिंगचे टास्क दिले. त्यांना ‘सिनेस्तान ऑनलाइन अर्निंग’ या टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडले. पुढच्या टास्कसाठी त्यांना ११ हजार जमा करण्यास सांगितले व येथूनच ते फसत गेले. त्यांच्या व्हर्चुअल खात्यातील रक्कम ‘निगेटिव्ह’मध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी ते पैसे भरले व खात्यात नफ्यासह रक्कम दिसू लागली. शहापुरेंनी ५ मार्च…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात उन्हाळ्याचा जरी महिना सुरु असला तरी अनेक भागांत गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर राज्यातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अशात मराठवाड्यात आज पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 27 एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे गारपिटीचा जोर अधिक असण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात 25 आणि 26 एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दीड महिन्यापासून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात शिंदे व ठाकरे गटाच्या महत्वपूर्ण निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या सत्तासंघर्षाची सुनावणी १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली, मात्र अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते निकालाचे अंदाज लावत आहेत. सरकारला धोका नसल्याचे शिंदे सेना व भाजपचे नेते सांगत आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळेल, असा दावा उद्धव सेना, काँग्रेसकडून केला जातोय. राष्ट्रवादीकडून मात्र सरकार पडणार नसल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकरांचे मात्र ‘राजकीय भूकंपा’चे दावे आहेत. सर्वपक्षीय नेते ‘ज्योतिषी’ बनले असले तरी राज्याचे राजकीय भविष्य…

