Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वरणगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार !
    क्राईम

    वरणगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूण जागीच ठार !

    editor deskBy editor deskMarch 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील महामार्ग क्रमांक सहावर कपिलवस्तु नगरजवळ भुसावळहुन वरणगावकडे मोटर सायकलने येणार्‍या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २३ गुरुवारी रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. याबाबत वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, कपिल वास्तू नगर जवळ अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवित रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करीत मिलींद भागवत राणे (वय 40, रा. होळी मैदान, तळवेल) हा युवक भुसावळ येथुन दुपारी 1.30 वाजेदरम्यान मोटरसायकल क्र. एमएच 19 एल 7171ने घराकडे जात असतांना त्याच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मिलिंदचा महामार्गावरील दुभाजकाजवळ जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचे काका विलास जनार्दन राणे (वय 58) यांनी वरणगाव पोलिस स्टेशनल फिर्याद दिली असून तपास सपोनि आशिष कुमार आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी, हेकाँ मुकेश जाधव करीत आहे. मयत मिलिंद राणे हा भुसावळ नगर परीषदेत काँट्रक्टमध्ये पाणीपुरवठा विभागात कामाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. मिलिंदच्या अपघाती मृत्यूने तळवेळ गावात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.