Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या वाक्ययुद्धात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ आघाडीवर आहेत. यावेळी थेट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट आ.जितेद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांचा मेंदू सडका आणि कुजका आहे. वोट बँकेसाठी लव्ह जिहादचे निर्लज्ज समर्थन करणारे औरंगजेबाची वंशावळ चालवत आहेत, अशी टीका वाघ यांनी केली आहे. लव्ह जिहादविरोधी हिंदू जनजागरण सभा घेणाऱ्या निरंजन डावखरे ह्यांनी एका मुस्लीम भगिनीशी विवाह केला आहे. हे सामंजस्य वाढीला लागावे हीच इच्छा, असे खोचक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्याला चित्रा वाघ यांनी हे उत्तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  पती कामावर जायचा, प्रियकरी घरी यायचा. शेजाऱ्यांना सगळं माहिती पडायचं. पतीला पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. त्यामुळे तो आतल्या आत झुरत होता. एकेदिवशी पती घरी परतला तेव्हा त्याचा ३ वर्षाचा मुलगा रडत असल्याचे पाहिले. तर दुसरीकडे पत्नी तिच्या मोबाईलमध्ये चॅटिंग करण्यात गुंग होती. पतीने पत्नीचा मोबाईल हिसकावला आणि मेसेज वाचले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात त्याने कैची उचलली आणि पत्नीच्या डोक्यात वार केले. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पती बाहेर गेला आणि जोरजोरात ओरडत पत्नीच्या प्रियकराने तिच्यावर हल्ला केल्याचं बोलू लागला. हे कृत्य करून पती फरार झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी जखमी अवस्थेत पत्नीला सायन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील भिवंडी येथे अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीत वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलासह पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. अद्याप या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भिवंडीत वलपाडा परिसरातील ही इमारतीचे आहे. इमारतीच्या खालच्या भगत गोदाम होते यामध्ये 20 ते 30…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर व जळगाव तालुक्यात झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेत पिकांबरोबरच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावे. शासन नियमानुसार नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून जळगाव तालुक्यातील गावांमध्ये होत असलेल्या वादळी पावसाने केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा. नुकसानीचे सरसकट पंचनामे करून माहिती संकलित करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने जास्तीत जास्त मदत…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपसह शिंदे गट यांच्यात जोरदार लढत होत असतांना पारोळ्यातून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या बाजीमुळे आ.चिमणराव पाटील यांच्या होमस्पिचवरचा दारूण पराभव झाल्याचे चित्र दिसत आहे. पारोळा बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे १८ पैकी तब्बल १५ उमेदवार विजयी झाले आहेत. विकास सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे, या बाजार समितीवर गेल्या अकरा वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांची सत्ता होती, विशेष म्हणजे बिनविरोध निवडून येत होते. यावेळी प्रथमच निवडणूक झाली. यात त्यांना पराभवचा सामना करावा लागला आहे.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  राज्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना व भाजपचा जलवा आता भुसावळ बाजार समितीत दिसू लागला आहे. शिवसेनेच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर यश मिळालं आहे. हा निकालामुळे भाजपचे आ.संजय सावकारे यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंसह माजी आ.संतोष चौधरी यांना जोरदार धक्का दिला आहे. भुसावळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. भुसावळ बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे शेतकरी सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. दीड तासांतच याठिकाणची मतमोजणी संपली आहे. यामध्ये १८…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील वाकोदसह परिसरात जोरदार गारपीट झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार रोजी दुपारच्या वेळी अवकाळी स्वरूपाचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, काढणीला आलेली पिके नष्ट झाली आहेत. तसेच ऐन उन्हाळ्यात वाघूर नदीला पूर आला आहे. अजिंठा लेणी डोंगररांगेत शुक्रवार रोजी जोरदार अवकाळी सरी बरसल्याने संपूर्ण अजिंठा लेणी पावसात न्हाऊन निघाली. तसेच येथून उगम स्थान असलेल्या वाघूर नदीलादेखील मोठा पूर आला आहे. लेणी परिसरातील डोंगरातूनदेखील मोठमोठे ओहळ पाझरत होते. वरखेडी तांडा परिसरातदेखील विजेच्या जोरदार कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. येथील शेतकरी कृष्णा मगन जाधव यांच्या शेतात बांधलेली बैलजोडी सुमारे १ लाख ५५ हजारांची वीज पडून जागीच ठार झाले.…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधित तंबाखू यांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. यामध्ये २६ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा गुटखा व नऊ लाख रुपयांची दोन वाहने, असा एकूण ३५ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यात सुरू असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रस्त्यावर पूर्णा नदीच्या काठावर सापळा रचला होता. त्यावेळी प्रतिबंधित अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरून वाहन क्रमांक एमएच…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बहिणीसोबत २७ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आली असता अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला परंतु कुठेही तरुणी न आढळल्याने जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल वाटे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात ट्रॅफिक वॉर्डन तरुणाने शेजारचांच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली होती. या प्रकरणी शेजारच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश एकनाथ ठाकूर (वय ३७) या तरुणाने सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २६ एप्रिल बुधवार रोजी दुपारी घडल्यानंतर गुरूवारी रात्री उशीरा पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ उमेश ठाकूर हा आई, वडील पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. घराशेजारील किशोर रमेश तिरमल, गजानन रमेश तिरमल, श्यामसुंदर रमेश तिरमल, रूखमा रमेश तिरमल आणि माधुरी गजानन तिरमल (सर्व रा.…

Read More