Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात गत दीड वर्षांपासून रखडलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून दि. 27 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मंगळवारी सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या. यात जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान 12 पैकी 6 बाजार समित्यांसाठी 28 आणि उर्वरीत 6 बाजार समित्यांसाठी 30 रोजी मतदान होणार आहे. दि. 23 रोजी निवडणूक प्राधिकरणाची बैठक होणार असून त्यात बाजार समित्यांचे मतदानासाठी वर्गीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बाजार समित्यांची होणार निवडणूक जिल्ह्यातील जळगाव,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात अपघाताची मालिका कुठल्याही परिस्थितीत थांबायचे नाव घेत नाही आहे. तर नुकतेच पाचोर्‍याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणार्‍या कारने पुढे चालत असलेल्या दुचाकीला ओव्हटेक करीत होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार रमेश मदन राठोड (वय-45, रा. रामदेववाडी) यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास रामदेववाडीजवळील टेकडीजवळ घडली. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे रमेश राठोड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते आपल्या कुटुंबियांचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास ते दुचाकीने जळगावकडे…

Read More

बोदवड : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीचा प्रसाधनगृहात विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे चार वाजता घडली. या प्रकरणी सय्यद वाजीद सय्यद रशीद (वय २५) याच्याविरुद्ध बोदवड पोलिसात पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणी पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सय्यद वाजीद सय्यद रशीद (25) याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून भेटण्यास बोलावत प्रसाधनगृहात तिच्याशी अश्लील वर्तन केले. याबाबत त्यांनी त्याला अटकाव केला असता मारण्याची धमकी देत सय्यद त्या ठिकाणाहून पसार झाला. याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून सय्यदविरुद्ध पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत आहे. तशीच एक घटना मध्य प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात घडली आहे. इथे पत्नीसोबत बोलल्यामुळे पतीने 21 वर्षीय तरूणाचा प्रायवेट पार्टच कापून टाकला. आरोपीवर आरोपी आहे की, हे त्याने तेव्हा केंल जेव्हा तरूण रात्री एकटा शेतात जात होता. पीडित तरूणाच्या भावाने त्याला पाहिल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणं सुरू केलं आहे. बोरखेड़ी लड़ा गावात राहणारा 21 वर्षीय तरूण 20 मार्चला आपल्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. इथे त्याने एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितलं की, 19…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात दहावीसह बारावीची परीक्षा अंतिम टप्यात आलेली आहे. अशाच वेळी एका युवतीला परीक्षेचा पेपर खराब गेल्यानंतर काही जण कुटुंबाशी खोटं बोलण्याचं नाटक करतात. परंतु दिल्लीत असा प्रकार समोर आलाय जिथं १० वीच्या युवतीनं परीक्षा खराब झाली म्हणून स्वत:च्या अपहरण आणि विनयभंगाची बनावट कहानी रचली. घरच्यांसोबत तिने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु CCTV च्या मदतीनं पोलिसांनी तिने रचलेल्या बनावट कहानीचा पर्दाफाश केला. ही घटना दिल्लीच्या भजनपुरा परिसरातील आहे. जिथे १५ मार्च रोजी शाळेत जाणाऱ्या १० वीच्या विद्यार्थिनीने स्वत:चं अपहरण आणि विनयभंग झाल्याचा आरोप केला. तिने आई वडिलांना सांगितले की, जेव्हा मी शाळेतून घरी परतत होते तेव्हा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  शिंदे गटाचे मंत्री असलेले दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने विरोधकांनी आज वातावरण चांगलंच तापवलं. संतप्त अजित पवारांनी हा उल्लेख रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. दादा भुसे विधानसभेमध्ये संजय राऊतांसह ठाकरे गटावर टीका करत होते. संजय राऊत यांनी दादा भुसेंवर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. त्याला उत्तर देताना दादा भुसे राऊतांवर टीका करताना म्हणाले, “आम्हाला गद्दार म्हणणारे आमच्या मतांवर निवडून येणारे महागद्दार यांनी ट्वीट करुन लूट केल्याचा आरोप माझ्यावर केला आहे. कोणत्याही माध्यमातून या ट्वीटची चौकशी करावी. दादा भुसे पुढे म्हणाले, “या प्रकरणात मी दोषी आढळलो तर आमदारकीचा राजीनामा देईन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनमध्ये सोन्याच्या दरानं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यामुळे मध्यवर्गीयांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी सोन्याच्या भावांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली आहे परंतु आज सोन्याचे भाव उतरल्याचे दिसत आहेत. एमसीएक्सवर सोन्याचे दर कमी झालेले दिसत असून काही भागात स्थानिक बाजार सोन्याचे भाव जैसे थे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव विक्रमी पातळी गाठत आहेत. त्यानुसार आता सोन्याच्या दरांमध्ये दिवसागणिक मोठी वाढ झाल्याचे दिसले. आज म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याचे दर घटल्याचे दिसत आहेत. काल म्हणजे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कुणी कल्पनाही करु शकत नाही असे हैवानी कृत्य एका नराधमाने केले आहे. एका माथेफिरुने 100 पेक्षा अधिक मृतदेहांसोबत SEX केला आहे. त्याचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे एकच खबळ उडाली आहे. डेव्हिड फुलर (वय 68 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. डेव्हिड फुलर हा ब्रिटनच्या एका रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. त्याच्या रुग्णालयाच्या शवागराशी फारसा संबध यायचा नाही. मात्र, तो रुग्णालायात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शवागरात जायचा. पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती. यानंतर त्याचे हे धक्कादायक कृत्य उघडकीस आले. डेव्हिडवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातून मुक्ताईनगर मार्गाने दिल्लीतून पुणे येथे बंदी असलेला गुटखा वाहतूक करताना पहूर ते जामनेर रस्त्यावर नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाने सोमवारी पहाटे रंगेहाथ पकडला. यात मुद्देमालासह साठ लाख ऐंशी हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत दिल्लीतील मालकासह तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवाहतूक कंटेनरमधून (क्र. एचआर ४७ डी ९८५६) गुटख्याची वाहतूक पुणे व मुंबई येथील | व्यापाऱ्याकडे केली जात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोलिस निरीक्षक बापू, रोहम, सहायक फौजदार रवींद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पोलिस नाईक प्रमोद सोनू मंडलिक, मनोज अशोक दुसाने, पोलिस शिपाई नारायण कचरू लोहरे यांना मिळाली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील निमखेडी शिवारात घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीला त्याठिकाणी लोंबकळणार्‍या विद्युत ताराचा स्पर्श होवून विजेचा जोरदार धक्का बसल्याने धनवी महेंद्र बाविस्कर (रा. दत्त मंदिर निमखेडी शिवार) हीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. चिमुकलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता. हवामानतील बदलामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वारा सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये विद्युत तारा तुटलेल्या असून तर काही ठिकाणी तारा लोंबकलेल्या आहेत. शहरातील निमखेडी भागात देखील विद्युत तारा वादळी वार्‍यामुळे लोंबकलेल्या आहे. याच परिसरात रहणारी पाच वर्षीय धनवी ही सोमवारी गल्लीतील लहान मुलांसोबत खेळत होती.…

Read More