जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला एकाने भरदुपारच्या सुमारास पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरात दि ६ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एका १७ वर्षीय मुलगी रस्त्याने जात असतांना मयूर नामक तरुणाने तिला पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या भावाने जिल्हा पेठ पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि.किशोर पवार हे करीत आहेत.
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १० वर्षीय चिमुकलीवर एका ५६ वर्षीय इसमाने लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात १० वर्षीय चिमुकली आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. याच गावातील एका ५६ वर्षीय इसमाने दि १ मे रोजी रात्री ७.४० वाजेच्या सुमारास चिमुकलीला चॉकलेट देवून तिचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलिसात संशयित आरोपी प्रदीप कोळी (वय ५६) याच्या विरोधात पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोउनी.अनवर तडवी हे करीत आहेत.
सुरत : वृत्तसंस्था १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलासंह, काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीला दत्तक घेणारे वडिल आणि भावासह अन्य तीन जणांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलगी सहा महिन्यांची असताना तिला या कुटुंबाने अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते. तिच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. मात्र, जस जस तिचे वय वाढत गेले तसे तिच्या वडिलासंह, काका, दोन भाऊ आणि अन्य एका युवकाने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून ते…
धरणगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानकाजवळील संत शिरोमणी रविदास महाराज स्मारकाचे लोकार्पण व चौकाचे उद्घाटन चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी माजी आमदार दिलीप कानडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय गोतीसे, मुकुंद सपकाळे, डिगंबर महाले, पांडुरंग बाविस्कर, पांडुरंग सातपुते, नंदिनी सौंदाणकर, शोभा कानडे, आनंदा महाले, चर्मकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, माजी नगराध्यक्ष अंजली विसावे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चर्मकार समाजाचा मेळावा पी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात घेण्यात आला. प्रास्ताविक राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी सर्वच छोट्या-छोट्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न चर्मकार समाजाला…
दारुच्या नशेत आलेले देाघ एकमेकांना शिवीगाळ करीत असल्याने शेजारी राहणार्यांना विवाहितेने अशा लोकांना याठिकाणी थांबु देत नका जाऊ असे बोलल्याचा राग आल्याने विवाहितेच्या डोक्यात लाकडी दांडुका टाकून तिला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास हरिविठ्ठल नगरात घडली. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात ममता नागेश मेढे (वय २४) या परिवारासह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळी काही लोक त्यांच्या शेजारच्यांकडे आले होते. त्यांनी मेढे यांच्या घरासमोर दुचाकी उभ्या केल्या होत्या. दरम्यान, ते दारूच्या नशेत एकमेकांना शिवीगाळ करीत होते. त्यामुळे त्यांनी शेजारच्यांना सांगितले की, अशा लोकांना थांबू देत नका जाऊ. मात्र, याचा राग येऊन शेजारच्यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका गोडाऊनवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला साडेचार लाखांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत व परीविक्षाधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना शुक्रवारी रात्री जळगाव- भुसावळ रस्त्यावरील एका दुचाकी शोरूमच्या मागील भागातील गोडावूनमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि तंबाखूचा माल साठवून ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांविरुध्द कारवाई केल्यानंतर गोडाऊनची झडती घेतली. त्यामध्ये १ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे पानमसाले ११४० पाकिटे आणि सुंगधित तंबाखूचेही ११४० पाकिटे, १ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे विमल पान मसाल्याचे…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ७ तरुणांनी विनयभंग करीत तिच्यासोबत शारिरिक सबंध केल्याने अल्पवयीन तरुणीला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या ६५ वर्षीय आजीने पाचोरा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सात संशयित पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पाचोरा परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या वृद्ध आजीसोबत वास्तव्यास आहे. दि २७ एप्रिल २०२३ रोजी घरून काहीएक न सांगता निघुन गेली होती. त्यानंतर २८ एप्रिल रोजी तीच्या वृद्ध आजीने नात बेपत्ता झाल्याची माहीती पोलिसांना दिली. पोलिस उपनिरिक्षक…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील एका गावात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्यानंतर झालेल्या या अपघातात एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यात शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प समोर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन थेट महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टरवरील चालक पवन हिंमत पाटील (२०) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी तरुणास मृत घोषित करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवला. या अपघातात पवन हिंमत पाटील यांच्या डोक्याला व चेहर्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागीच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेहमीच सोशल मिडीयावर तुफान व्हायरल असलेली उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील असून फॅशन डिजायनर अमित अग्रवाल यांच्या स्टोर ओपनिंगचा आहे. या कार्यक्रमात अनेक मोठ्या स्टारने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात उर्फी जावेद ही देखील सहभागी झाली होती. या कार्यक्रमात जीनत अमान देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी जीनत अमान आणि उर्फी जावेद या सोबत दिसल्या. जीनत अमान यांना उर्फी जावेद ही काहीतरी बोलताना दिसत आहे. मात्र, जीनत अमान यांचे उर्फी जावेद हिच्या बोलण्यापेक्षा अधिक तिच्या कपड्यांवर नजर असून जीनत अमान या उर्फी जावेद हिच्याकडे रागात बघताना दिसत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेव्हा मी सांगतो की मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो आणि मी कसा येतो, हे सर्वांनाच माहिती आहे ‘, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर आता संपूर्ण राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावरून फडणवीसांवर खोचक शब्दात टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी,”देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या विधानाची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची भीती खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला हवी. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी द्यावं,…

