Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !
    क्राईम

    नवरा झोपलेले बायकोचा सुरु होता प्रियकरासोबत खेळ अन नवरा उठताच !

    editor deskBy editor deskApril 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात होत असलेल्या गुन्हेगारीचे अनेक कारणे हे प्रेम प्रकरणावर आलेले नेहमीच दिसत असतात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश मर्डर केसबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा समोर आणला आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं उघड झाले. घटनेच्या पूर्वी महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला भरपूर दारू पाजली.
    त्यानंतर पती जेव्हा झोपी गेला तेव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. रात्री अचानक जेव्हा पती झोपेतून उठला तेव्हा त्याला पत्नी अन्य व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली.

    थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून दारू पाजली. जास्त नशा झाल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची पत्नी आणि प्रियकर दोघेही लैंगिक संबंधात आकंठ बुडाले. त्याचवेळी राजेशचा डोळा उघडला तेव्हा पत्नीची स्थिती पाहून त्याला राग अनावर झाला. त्याने याचा जाब विचारला तेव्हा प्रियकर आणि पत्नीने मिळून राजेशची हत्या केली. याबाबत अपर पोलीस अधीक्षक नवीन सिंह म्हणाले की, बछरावा पोलिसांना राजेशचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या टीमने तपास सुरू करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

    तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. त्याचवेळी पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला त्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. तपासात राजेशच्या पत्नीचे गावातील नान्हू महताबसोबत अनैतिक संबंध होते हे कळालं. पोलिसांनी राजेशच्या पत्नीची कसून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी राजेश, पत्नी रेश्मा आणि महताब यांनी दारू प्यायली होती. राजेशला जास्त नशा झाल्याने तो झोपी गेला. जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि महताब यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याने जाब विचारला. त्यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर महताब यांनी मिळून राजेशचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला हे समोर आले. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026

    धरणगाव तालुक्यात क्रूझर उलटून नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू, सहा जखमी

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.