Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक भागातील महिलासह तरुणीना सोशल मिडीयाच्या माध्यमातून फसविण्याचे अनेक प्रकार बाहेर येऊ लागले आहेत. त्यातच एक प्रकार समोर आला आहे. मुंबईमधील सायन परिसरात राहणाऱ्या तरुणीची फेसबुकवरून एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. तिने त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. लग्नाची तारीखही ठरली. मात्र, लग्नाच्या तारखेलाच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. सायन परिसरात तक्रारदार २५ वर्षीय तरुणी आजीसोबत राहते. २०१९ मध्ये तिची आसिफ नावाच्या तरुणासोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांमध्ये संवाद वाढला. त्याने तिला प्रेमाची गळ घातली. तरुणीनेही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला, हा राजीनामा पवार साहेबांनी तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तीनी मागणी केली होती तरी आज दी. ५ मे  रोजी शरद पवार यांनी  तमाम कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्ष्यात घेऊन तत्काळ दिलेला राजीनामा मागे घेतला व यापुढेही पवार साहेबच राष्ट्रस्वादी कांग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहणार अशी घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे फटके फोडून व पेढे वाटप करूज जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी माजी कृषी व परिवहन मंत्री गुलाबरावजी देवकर व प्रदेश सरचिटणीस नामदेव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात असलेल्या मंदिराचा लाईट सुरु न झाल्याच्या शुल्लक कारणावरून एकाने लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून दुखापत केल्याची घटना घडली असून या याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी रोड परिसरातील हर्षवर्धन कॉलनीत वास्तव्यास असलेले दिलीप रामदास शिंपी (वय ६६) हे मजुरी करीत आपला उदरनिर्वाह करतात. दि २ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी लक्ष्मण बंडू मराठे रा.हर्षवर्धन कॉलनी याने फिर्यादी दिलीप शिंपी यांना मंदिराचा लाईट सुरु न झाल्याने मंदिराची अशी कशी इलेकट्रीक फिटिंग केली असा जाब विचारून फिर्यादीला मंदिर आवारात पडलेल्या लोखंडी पट्टीने डोक्यात डाव्या बाजूला मारून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शनिपेठ परिसरातून एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्याक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरात एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने ४ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजे दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.

Read More

पुणे : वृत्तसंस्था  शहरातील वाघोली परिसरातील एका गोडाऊनला शुक्रवारी लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. शहरातील वाघोली भागात काल (शुक्रवारी) रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आगीची घटना घडली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत ४ सिलेंडर फुटलेत. आगीची घटना समजताच त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. या घटनेत तीन तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसत एकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २ मे रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी शेख आरिफ शेख जाबीर हा महिलेच्या घरात कुणीही नसताना व महिला झोपलेली असतांना घरात घुसून तुने अगर चील्लाया या किसको बुलाया तो मै सबको बोल दुंगा कि, तेरा और मेरा लफडा है, असे म्हणत महिलेसोबत अश्लील कृत्य केले या प्रकरणी लागलीच महिलेने फैजपूर पोलीसात धाव घेत संशयित आरोपी शेख आरिफ शेख जलील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवर धावत्या रेल्वेतून पडून बाबूभाई माणखाँ पठाण (६९, रा. नगरसूल, ता. येवला, जि. नाशिक) या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रसूल येथील बाबूभाई पठाण हे शुक्रवारी रेल्वेतून प्रवास करीत होते. आसोदा शिवारातील डाउन रेल्वेलाइनवरील खांबा क्रमांक ४२६/१ ते ३ च्या दरम्यान ते धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलिस ठाण्यातील विलास शिंदे व माणिक सपकाळे यांना कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतल्यानंतर खिश्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड मिळून आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. शिंदे यांनी लागलीच येवला…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात अवैध लिंबाची वृक्षतोड करून ते ट्रॉलीत भरून रात्री लाईट बंद ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात रस्त्याच्या विरुद्ध साईडने चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन लाकडांचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यावर पलटी झाले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात कृष्णापूर(ता.चोपडा) येथील ३५वर्षीय आदिवासी तरुण दुचाकी चालक जागीच ठार झाला तर दुचाकीवरील मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर घडली. अपघातानंतर मयत झालेला व गंभीर जखमी तरुणांना नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगावला हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात जिवंत लिंबाची अवैध वृक्षतोड करून संध्याकाळी ट्रॅक्टर क्रमांक-MH-18 N 4438…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या २ मे पासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यापासून कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज शरद पवार यांनी यावर मौन सोडत पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” “देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षाचे नेते आणि सहकारी, मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी विनंती केली. लोक माझे सांगाती,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर आज झालेल्या बैठकीनंतर मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. थोड्याच वेळात शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव सुरु केला आहे. २ मे रोजी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला होता. आज साडेपाच वाजता शरद पवार हे पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र आता त्यापूर्वीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव सुरु झाला आहे. मुंबईतल्या वाय.बी. सेंटरबाहेर नेते नाचत आहेत. ढोल-ताशांचा गजर सुरु आहे. त्यामुळे पवार आपला निर्णय मागे घेणार, हे जवळपास स्पष्ट होत आहे. त्याची अधिकृत घोषणा…

Read More