जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका मुख्य रस्त्यावरील हॉटेलच्या मागील बाजूस असल्याचा चोरट्यांनी फायदा घेत खिडकीतून आत प्रवेश करून २५ हजारांची रोकड लंपास केल्या प्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थ कॉलनीतील रहिवासी असलेले विवेकानंद पाटील यांच्या मालकीचे जळगाव – यावल रस्त्यावर असलेले विदगाव येथे तापी गार्डन नावाने हॉटेल असून दि.५ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी हॉटेलच्या मागील बाजूने प्रवेश करून ड्रॉवरमधील २४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंदे करीत आहे.
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पीएम इमरान खान यांना इस्लामाबाद हाय कोर्टाच्या बाहेर अटक करण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट केसमध्ये करण्यात आले आहे. पीटीआयचे नेते इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पीटीआयने इम्रान खान यांच्या अटकेचा निषेध केला आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद पोलिसांनीही एक निवेदन जारी केले आहे. इस्लामाबादच्या आयजीनी माध्यमांना सांगितले की, इम्रान यांना कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सामान्य आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसात राजीनामा माघारी घेतल्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून राष्ट्रवादीचे वाभाडे काढले होते. त्यावर आता शरद पवार यांनी राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. लोकांनी मला थांबू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही. पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही…
इंदौर : वृत्तसंस्था मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली पडली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा 20 पर्यंत वाढू शकतो. या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खरगोनमध्ये झालेल्या बस अपघातावर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातून एक १७ वर्षीय तर एक १६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी तर जळगाव तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या धानवड परिसरातील एका १७ वर्षीय मुलीला दि ८ मे २०२३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास मुलगी परिवारासोबत गच्चीवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नांद्र गावातील परिसरातून एका १६ वर्षीय मुलीस दि ८…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकातील निवडणूकित भाजपने सर्वच शक्ती पणाला लावलेली असतांना सोमवारी ८ मे संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र, भाजप मध्यरात्रीसुद्धा सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाला एक दिवस बाकी असतानाच भाजपनं केलेलं मध्यरात्रीचे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे. प्रचार थांबल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी काल रात्री १२.२१ वाजता कर्नाटकच्या जनतेसाठी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजपच्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे. ‘कर्नाटकला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी दुहेरी इंजिन सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुमची स्वप्ने, ही माझी स्वप्ने आहे ती आपण…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यात बाजारात बोगस कंपन्या, परवाना नसलेली अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी, आर- आरबीटी व बीटीबीजी-३ या नावाने संबोधतात. या अवैध बियाणांना शासनाची मान्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नये. तसेच एचटीबीटी बियाण्यांची खरेदी व शेतात लागवड करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी , धरणगाव पी.जे.चव्हाण यांनी केले आहे. अवैध बियाणांची विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे लागवड केलेल्या कापूस पिकाच्या पानांचे नमुने यांची एचटीबीटी जनुके तपासणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत आहे. नमुना तपासणीअंती एचटीबीटी जनुके…
जळगाव : प्रतिनिधी अजिंठा चौफुली येथे एका महिलेने धिंगाणा घालत पुरुषावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला होता. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिलेला महाबळ कॉलनीतून ताब्यात घेतले आहे. माधुरी सागर राजगिरे (३२, रा. रामेश्वर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेनंतर कुणीही तक्रार देण्यास न आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी महिला व पुरुषाचा शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना त्या महिलेचे माधुरी राजगिरे तर पुरुषाचे सागर भिकन राजगिरे (रा. रामेश्वर कॉलनी) असे नाव निष्पन्न झाले तर दोन्ही पती-पत्नी असून कौटुंबिक…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील मलाकली गल्ली,बेलदार गल्ली, पिल्लू मजिंद या भागासह धरणगाव शहरात गेले 22 दिवसापासून नागरिक पाण्या विणा हैराण झाले आहेत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलाचा हळदीकुंकू चा कार्यक्रमात १ एप्रिल पासून दोन दिवसा आड पाणी देवू असे म्हटले होते परंतु मे येऊन गेला तरी 22दिवसापासून पाणी नाही, तर तो एप्रिल फुलं होता का ? २४ साल चा एप्रिल महिणा होता हे तरी लोकांना सांगा?महिला मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करीत आहे. आज अचानक या गल्लीतील महिलांनी नगरपालिकेला धडक दिली व मुख्याधिकारी व संबंधित कोणी भेटले नसता त्यांनी थेट शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना फोन केला व…
अमळनेर : प्रतिनिधी अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त करताच वाळू माफियांनी ते पथकाच्या तावडीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील भरवस गावाजवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याने तलाठी विकास परदेशी यांनी रविवारी सकाळी साडेसहा वाजता भरवस ते एकलहरे दरम्यानच्या रस्त्यावरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले होते. ट्रॅक्टर चालक गणेश मोतीलाल पाटील (सबगव्हाण, ता.अमळनेर) याला वाळूने भरलेले ट्रॅक्टर मारवड पोलीस ठाण्यात लावण्याचे सांगितले. त्यानुसार महसूल पथक सोबत असतांना ट्रॅक्टर चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून बाजूच्या शेतातून पळ काढला. या प्रकरणी तलाठी विकास परदेशी यांनी…

