नवी दिल्ली : वृत्तसंस्था हमीरपूर जिल्ह्यातील बसेला या गावामध्ये पूजा नावाची 22 वर्षीय तरूणी राहत होती. त्याच गावामध्ये दीपक नावाचा तरूण राहत होता. दीपकचं पूजावर एकतर्फी प्रेम होतं. अनेकवेळ त्याने तिला विचारलं होतं. मात्र तिने वारंवार नकार दिला होता. नंतर त्याने अनेकवेळा विनयभंग केला. या त्राासाला कंटाळून तिने आपलं कॉलेज बंद केलं होतं. 2 मे ला पूजाचे कुटुंबीय एका लग्नाला गेले होते. त्यावेळी घरात फक्त पूजा आणि तिची आजी आणि आई हजर होत्या. याबाबत दीपकला माहिती मिळाली होती. दीपकने याचाच फायदा घेतला आणि घरात घुसला आणि टेरेसवर झोपलेल्या पूजाजवळ गेला. जबरदस्तीने पूजाचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तिने…
Author: editor desk
मालेगाव : वृत्तसंस्था तालुक्यातील एका ४२ वर्षीय शेतकरीने आपल्या ६ वर्षीय मुलाला घेत अजंग शिवारातील शेती शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी कि, मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी होती. विहिरीबाहेर चपलांचे दोन जोड होते. दीर्घकाळ पिकअप उभी असल्याने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणून भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी स्थापन केलेली समितीने त्यांना पक्षप्रमुखपदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीने शरद पवार यांच्या राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव आज मांडला. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांनी पुन्हा अध्यक्ष व्हावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील ज्ञानेश्वर रमेश कोळी (३५) या शेतमजुर अमळनेर येथून घरी परतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजता रहिवाशांना घरामागे कोळी यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर कोळी हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होते. शालकाच्या मुलीच्या लग्नानिमित्त कोळी हे कुटुंबीयांसह अमळनेर येथे गेले होते. बुधवारी रात्री ९ वाजता ते एकटेच खेडी-कढोली येथे परत आले. पत्नी आणि दोन्ही मुले अमळनेर येथे थांबले होते. मध्यरात्री कोळी यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती आत्ताच फाड म्हटल्यानंतर नकार दिल्याच्या कारणावरून एकाने शेख रफीक शेख हमीद मणियार (४०, रा. मासुमवाडी) या विक्रेत्याला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मासुमवाडी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हे हातगाडीवर कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ९ वाजता ते हातगाडी घेऊन व्यवसायासाठी घरातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांना मनपाची २० रुपयांची बाजार शुल्क पावती फाडणारा व्यक्ती भेटला. त्याने त्यांना पावती फाडण्यास सांगितली. पण, मी आत्ताच घरातून बाहेर निघालो असून पावती देऊन द्या, नंतर पैसे घेऊन जा…
भुसावळ : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महिलासह अल्पवयीन मुलीना प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या घटना दिवसेदिवस वाढ होत असतांना आता पुन्हा भुसावळ तालुक्यात एक संताजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात व लग्नाचे आमिष दाखवून तिथे शारीरिक शोषण करणाऱ्याविरुद्ध तालुका पोलिसात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. १४ वर्षांच्या या पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेने तालुका पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे,…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यात दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्या व विक्री करणार्या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या बांधल्या आहेत. भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. साकेगावातील संशयित आरोपी शाहरूख राजू पटेल (वय २५) व विकास पांडुरंग लोहार (वय ३०) व जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित (वय २६) अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यूपी एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. यूपी एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ…
इंदूर : वृत्तसंस्था गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह चेंबरमध्ये टाकला होता. त्याने मृतदेहावर मीठ टाकून तो ब्लँकेटने झाकला होता. तीन वर्षांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकणी हत्येशी संबंधित दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. मध्यप्रदेशातील इंदूर येथे पोलिसांनी एका भंयकर हत्याकांडाचं गुढ उकललं आहे. तीन मुलांचा बाप असेलला विशाल अर्चना नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर अर्चनाने विशालकडे लग्नासाठी तगादा लावला. याने त्रस्त झालेल्या विशालने एकदा अर्चनाला भेटायला बोलावलं. त्यानंतर विशालने अर्चानाचा तिच्याच ओढणीने गळा आवळून तिचा खून केला.…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यावेळी सगळ्यात जास्त पावसाचा तडाखा हा विदर्भाला बसणार आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर असेल. यावेळी मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात आज गारा पडण्याची…

