पुणे : वृत्तसंस्था ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दुर्गराज रायगडावर आयोजन करण्यात आले आहे पण यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. काही ठिकाणी तर विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही भाविकांना मात्र गडावर जाता आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे. दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख भाविक जमले आहेत. गडाच्या खाली जवळपास ५०- ७५ हजार…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या प्रकरणी आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात मजुरी करणाऱ्या पीडित मुलीच्या आईला बरे वाटत नसल्याने सलाइन लावण्यासाठी घरात जागा नव्हती, म्हणून दिराच्या घरी आईला सलाईन लावण्यात आली. त्यावेळी बापाने पीडित मुलीचे तोंड दाबून तिच्याशी जबरदस्तीने अतिप्रसंग केला. रविवारी रात्री ११ वाजता आई घरी आल्यावर घाबरलेल्या मुलीने हा प्रकार सांगितला. याबाबत पोलिसात ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस करीत…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील कंपनीतील कंत्राटी कर्मचार्यांनी गेल्या काही दिवसापासून आदोलन पुकारले आहे. या आंदोलनातील कर्मचारी शेखर गोकुळ पाटील (वय-50) रा.खेडी कढोली ता.एरंडोल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाच्या दबावामुळे व मानसिक त्रासामुळेच कर्मचार्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कामगार सहकारी व नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात एकच गर्दी केली होती. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथील शेखर गोकुळ पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून बांभोरी येथील हिताची कंपनीत कंत्राटी पध्दतीने नोकरीला होते. गेल्या दि. 23 मे पासून त्यांच्यासह इतर कामगारांनी हिताची…
यावल : प्रतिनिधी भरधाव दुचाकी वाहनासमोर अचानक मोकाट गुरे आल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना साकळी ता. यावलनजीक सोमवारी दुपारी घडली. डिगंबर संजय चौधरी (२५, रा. पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. मोकाट गुरांचा प्रश्न जीवघेणा ठरत असून गत अनेक वर्षांपासून पालिकांकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. लोकांमधून ओरड झाल्यांनतर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात येते. त्यानंतर संबंधित मालकही पुन्हा आपली जनावरे मोकळी सोडत असतात.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 19 जूनपूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यात आहे. दुसरीकडे सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे याच बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर देखील चर्चा झाली आहे. शिंदेंच्या दोन खासदारांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान? राज्यमंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या दोन खासदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावरही अमित शहा यांची या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाली. रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईत परतले, तर देवेंद्र फडणवीस नागपुरच्या दिशेने रवाना…
मुंबई : वृत्तसंस्था ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेतील शकुनि मामाची भूमिका साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांचे आज सोमवारी ५ जुन रोजी निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील अंधेरीत असलेल्या रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होता. तर त्यांचे सहकलाकारा सुरेंद्र पाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कारार होणार आहे. गूफी पेंटर यांची तब्येत जेव्हा खालावली तेव्हा ते फरीदाबाद येथे होते. सगळ्यात आधी त्यांनी फरीदाबादच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांना मुंबईत आणलं होतं. गुफी पेंटल यांच्या निधनाची बातमी ही फिल्मफेअरनं त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अकाऊंटवरून पोस्ट शेअर…
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आता उमेदवारीबाबत शिक्केमोर्तब केली आहे. यात डॉ.अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या उमेदवाराची प्रश्न सुटला आहे. शिरूर लाेकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी उमेदवारी काेणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या हाेत्या. विद्यमान खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी आपण पुन्हा लाेकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले हाेते. मात्र, भाेसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदर दाेघात चुरस निर्माण झाली हाेती. पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातल्या निर्सग मंगल कार्यालय येथे साेमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांचे उपस्थितीत पक्षातील महत्त्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी शिरूर लाेकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आढावा घेण्यात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून चोपडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बसने दुचाकीस्वाराला कट मारल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून काही अंतरावर असलेल्या ममुराबाद रोडवरील रेणुका माता मंदिराजवळ दि ४ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास प्रमोद रघुनाथ बोरसे (वय ३६) हे पांडूरंग पाटील यांच्यासोबत दुचाकीने ममुराबादकडे जात असतांना एस.टी.बस.क्र.एम.एच.१४.बी.टी.२३६३ ने भरधाव येत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत दुचाकीस्वारांना कट मारल्याने यात दुचाकीसह दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे या प्रकरणी प्रमोद बोरसे यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेत बसचालकाविरोधात…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २५ वर्षीय तरुणाने पळवून नेल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारावासोबत वास्तव्यास आहे. दि २८ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी सुनील शिंदे (वय २५) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घेवून गेल्या प्रकरणी संशयित आरोपी विरोधात पाचोरा पोलीस स्थानकात ४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणी एका विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला दि २१ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एका मुलाने तु मला जर भेटली नाही तर मी आत्महत्या करून घेईल असे धमकाविले असता, ती अल्पवयीन मुलगी घाबरून संबधित मुलाला भेटायला गेली असता. तिच्या सोबत चुकीचे फोटो काढून ते फोटो काही दिवसानंतर व्हायरल केल्या प्रकरणी एका विरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सपोनि. रोहिदास गभाले हे करीत…

