Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील खाजोळे येथे लागलेल्या आगीत पाच गुरे व गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा, शेतीचे साहित्य व शेड जळून खाक झाली. या आगीत तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. खाजोळे येथील वसंत परशुराम पाटील यांची खाजोळे-सार्वे रस्त्याला लागून शेड आहे. या शेडमध्ये दोन दुभत्या गायी व तीन वासरे होती. तसेच गुरांसाठी चारा साठवून ठेवला होता. तसेच शेती उपयोगी साहित्य ठेवले होते. १ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भर दुपारी लागलेल्या आगीत सर्वच जळून खाक झाले तसेच आगीत संपूर्ण शेड व पत्रे तसेच इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. अचानक लागलेल्या आगीत…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावरील बहिस्थ परीक्षकाला पाच हजारांची लाच घेताना नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. प्रताप महाविद्यालयाच्या केंद्रावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठाने विजय गुलाबराव पाटील यांची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. परीक्षा काळात परीक्षार्थीना विनाकारण त्रास देणे, कॉपीसाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करणे असे प्रकार चालू असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले होते. यात तक्रारदार यांच्या पत्नीचे व इतर सात विद्यार्थ्यांचे बॅचलर ऑफ लायब्ररी (बी. लिब) चे पेपर सुरू होते.विजय पाटील यांनी परीक्षक म्हणून पेपर सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच कॉपीला सहकार्य करण्यासाठी प्रत्येक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील २५ वर्षीय तरुणीस एकाने तिच्या घरी येत इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केल्या प्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २५ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. डिसेंबर २०२२ ते ११ मे २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंतच्या सुमारास तरुणीशी फेसबुकवर ओळख निर्माण करीत तरुणी घरी एकटी असल्याची संधी साधत तरुणीच्या घरी येत लग्नाचे आमिष दाखवून तर दुसऱ्या वेळेस तरुणी घरी एकटी असताना तिच्या राहत्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत असल्याने तरुणीने याला नकार दिला असता. त्याने तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणी…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी  शहरात दिनांक 31 मे रोजी राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या जल्लोशात साजरी करण्यात आली. यावेळी बस स्टँड परिसरात भूषण सोनवणे व महेश सोनवणे यांनी स्व: खर्चातून राजमाता आहिल्यदेवी होळकर यांची भव्यदिव्य अशी होर्डिंग् तयार करून प्रतिमा पूजन करून शरबत वाटप करण्यात आले. एका गरीब घराण्यातील हे दोन्ही बंधु हात मजुरी करुन आपल घर चालवत असतात पण त्यांच्या बद्दल बोलाव तितकच कमी आहे. त्यांनी सर्व समाज बांधवांना बोलवुन तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना बोलवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी गणेश हिवरे, प्रशांत धनके,आनंद प्रजापती,निखिल घुले,दुर्गेश धनगर, अजय कचरे यांनी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठीण परिश्रम घेतले.

Read More

नवऱ्याच्या त्याच्या व्हॉट्सॲपवर त्याच्या भावी पत्नीचे काही अंतरंगी आणि आक्षेपार्ह स्थितीतील फोटो होते. यानंतर, नवरा मुलगा आणि फोनवर पलीकडे असलेल्या व्यक्तीमध्ये फोनवर जोरदार वादावादी सुरू झाली. शेवटी, वर स्टेजवरून खाली उतरला आणि हे लग्न होऊ शकत नसल्याची घोषणा त्याने केली. हे प्रकरण शोहर्ताड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकडी या गावाशी संबंधित आहे जिथे सोमवारी रात्री लग्नाची वरात आली होती. नातेवाईकांसह संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नाच्या आनंदात व्यग्र होते, मात्र वराचा (लग्न मोडल्याचा) निरोप आल्यानंतरच संपूर्ण वातावरण बदलून गेले. या घटनेनंतर पोलीस व ग्रामस्थांसह ग्रामस्थ, प्रज्ञावंत, नातेवाईक यांनी वराची समजूत घालण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडिओ व फोटो पाठवणाऱ्या तरुणाला पकडण्यात आले. लोकांनी त्याला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात तीन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस आई-वडील घरी नसताना मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमळनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक ३१ मे रोजी सकाळी अल्पवयीन मुलीचे आई-वडील दोघेही मध्य प्रदेशातील एका गावात लग्नसमारंभासाठी गेले असता मुलगी व मुलगा घरीच होता. दिनांक ३१ मे रोजीच्या रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने १४ वर्षे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीस स्थानकात दिली आहे. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की मध्य प्रदेशात लग्नास गेले असताना त्यांच्या मालकाचा फोन आला त्यांनी सांगितले…

Read More

नशिराबाद : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहिवासास आहे. दिनांक २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास २६ वर्षीय महिलेचा एक इसम तिचा गेल्या एक महिन्यापासून लपून-छपून पाठलाग करीत होता महिलेने त्यास माझा पाठलाग करू नको असे सांगितल्यावर सुद्धा तिचा पाठलाग त्याने सुरूच ठेवला होता 23 रोजी या आरोपीने महिलेला बारीक दगड मारून फेकला याचे कारण विचारले असता त्याने तिचा हात पकडून माझे तुझ्यावर प्रेम आहे तुझा मोबाईल नंबर मला दे असे म्हणत अश्लील…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  हरवलेल्या किसान कार्डचा वापर करून अज्ञात आरोपीने बँकेच्या एटीएममधून ५१,७०० रुपये पैसे काढले आहे. ही घटना २६ ते २९ मे दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील पैलाड येथील सविता प्रल्हाद पाटील यांचे जिल्हा बँकेच्या जानवे शाखेचे किसान क्रेडिट कार्ड आहे. त्यांनी कार्डवरच पीन कोड लिहला होता. हे कार्ड दि. २६ रोजी हरवले.त्यांनंतर दि. 30 रोजी त्या बँकेत कार्ड बंद करून पैसे काढायला गेल्या. त्यावेळी बँकेकडून त्यांना ५१ हजार ७०० रुपये काढले गेल्याचे सांगण्यात आले. हे पैसे एका खासगी बँकेच्या एटीएमवरून काढले गेले. ही रक्कम लांबवल्याचे लक्षात येताच पाटील यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  शिरसोली ते जळगाव दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागून हनुमाननगरातील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड, जि.धुळे ह.मु. हनुमाननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघनगर हनुमाननगरात परिसरातील राजू पवार हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. ते सेंट्रिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी रात्री पिंप्राळा येथील काम आटोपून ते घरी येण्यासाठी निघाले होते. शिरसोली ते जळगाव दरम्यानच्या रेल्वे खांबा (क्रमांक ४१५- २५ ते २७) च्या दरम्यान रेल्वेरूळ क्रॉस करत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने…

Read More

जळगाव मिरर | २ जून २०२३ यावल तालुक्यातील अंजाळे येथे जाण्यासाठी बस चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले. त्यात ३५ हजारांचा मुद्देमाल एका महिलेकडे आढळून आला. फिर्यादी मंदाकिनी सोनवणे ( वय ६६, रा. अंजाळे ता. यावल) या भुसावळला जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी दोन महिला धक्काबुक्की करत होत्या. त्यावेळी एका महिलेने सहा ग्रॅम वजनाची मंगलपोत खेचली. त्यांनी क्षणातच महिलेचा हात धरला. आणि आरडाओरड केली. त्या महिलेला पकडून रावेर पोलीस ठाण्यात नेले. तिच्याकडे ही मंगलपोत आढळली. सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राधाबाई कैलास गाढे (वय ४५ रा. तांबापुरा, जळगाव) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास इस्माईल शेख करत…

Read More