जळगाव : प्रतिनिधी धावत्या बस मध्ये बसलेल्या महिलेचे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रहिवासी असलेल्या निर्मला संजय कोणी या दिनांक सहा जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक परिसरातून ममुराबाद जाण्यासाठी बस मध्ये बसल्या होत्या या दरम्यान ममुराबाद बस स्टॅन्ड पर्यंत अनोळखी चोरट्यांनी त्यांची सोन्याची चैन 20 ग्राम वजनाची सुमारे 60 हजार रुपये किमतीची लांबविल्या प्रकरणी अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका मुख्य बाजारपेठेत एका ४८ वर्षीय महिलेचा सकाळच्या सुमारास एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील परिसरात एक 48 वर्षीय महिला दिनांक पाच जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपले दुकान लावले असताना या ठिकाणी एक इसम येत त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करीत महिलेसोबत चुकीचे वर्तन केल्याप्रकरणी एका इसमाविरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहे
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटेनगरजवळ तीन ते चार जणांनी एका कारवर दगडफेक करून कारमधील अविनाश निंबा अहिरे (३५, रा. कुसूंबा) या तरुणावर धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. जखमीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील अविनाश अहिरे हा मित्र राम सुभाष कुकडे याच्यासोबत खोटेनगरजवळ कार (एमएच. १९.ईए.०४५१) उभी करून त्यामध्ये बसला होता. अचानक तीन ते चार तरूण त्याठिकाणी आले. त्यांनी जून्या वादातून अहिरे व कुकडे यांना मारहाण करून त्यांच्या कारच्या काचेवर दगडफेक केली. यामध्ये कारचे पुढील काच फुटले. नंतर एकाने…
जळगाव : प्रतिनिधी देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव शहरतर्फे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर भाजपा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेध सुधीर मुनगंटीवार व पडळकर यांच्या फोटोला जोडे मारून व्यक्त करण्यात आला, मंगळसूत्रचोर गोप्याचा निषेध असो गली गली मे शोर है गोप्या पाडळकर चोर है, सुध्या गोपयाचा निषेध असो अश्या घोषणा या वेळी सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांचा विरोधात देण्यात आल्या तसेच असे बेताल वक्तव्य करणे बंद न केल्यास सुधीर मुनगंटीवार व गोपीचंद पाडळकर यांना जळगाव जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळेस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका महिलेशी नंदुरबार येथील तरुणाने ओळख निर्माण करून तिच्याशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण आणि पैशांची मागणी करून अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील दीपक देवानंद टाक (नंदुरबार) या तरुणाविरुद्ध रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात ३२ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासोबत रहायला आहे. तर नंदुरबार येथील दीपक देवानंद टाक हा विवाहितेच्या संपर्कात आल्यानंतर त्याने जवळीक वाढवून प्रेमसंबंध ठेवले व नंतर विवाहितेच्या घरी येत शारीरीक संबंध ठेवले. नंतर पीडीतेने संबंधास ठेवण्यास नकार दिल्यानंतर संशयित…
मुंबई : वृत्तसंस्था सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शेकडो कोटी रुपये खर्च करून खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, पण शेतकऱ्यांना काही मदत मिळत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. शिंदे गटाने विरोधी पक्षनेते अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी किती खोके जमवले ते सांगावे असे खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एकाकडून जरी मी पैसे घेतले असतील तर राजकारण सोडून घरी बसेल, माझ्यावर आरोप करत असाल ते…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरातील श्री संत मुक्ताई मंदिरामागील रस्त्याच्या कडेला तरुणाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शहरातील श्री संत मुक्ताई मंदिरामागील रस्त्याच्या कडेला तरुणाचा खून करून मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. मयत तरुण रावेर तालुक्यातील असल्याची माहिती आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मुक्ताईनगर शहराजवळील श्री संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच मंगळवारी सकाळी एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती…
जळगाव : प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी आरोग्यस्नेही उपक्रमातून साजरा करण्यात आला, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनने जळगाव ग्रामिण मतदारसंघात आरोग्यसप्ताहाचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन हे पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करून ग्रामिण भागात आरोग्यसप्ताहाला सुरूवात करण्यात आली. आरोग्य शिबीराचे आयोजन हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते. आरोग्यसप्ताहाची सुरूवात ही पाळधी येथून झालेली असून यामध्ये भव्यआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर व मोफत आयुष्यमान भारत (हेल्तकार्ड) नोंदणी शिबीर, तालूक्यातील…
धरणगाव : प्रतिनिधी शहरात भारतीय जनता पार्टीने 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील महिला व तरुण मुलींकरीता “द केरला स्टोरी” या चित्रपटाचा शो मोफत आयोजित केलेला आहे. सदरील चित्रपटास भरपूर प्रमाणात प्रतिसाद महिला व मुलींकडून मिळत आहेत प्रत्येक शो-हाऊस फुल राहत असुन आता पर्यंत 1800 ते 2000 महिला व मुलींनी चित्रपट बघण्याचा लाभ घेतलेला आहे.अजून भारतीय जनता पार्टीचा शहरातील घराघरातील महिला व मुलींना चित्रपट दाखविण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन यांनी व्यक्त केला आहे. सदर चित्रपट कुमार टॉकीज येथे प्रदर्शित केला जात आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील महावितरणचे कार्यकारी अभियंता पवार यांना खंडित वीजपुरठा व भारनियमाबाबत व तहसीलदार सातपुते यांना पिक विमा नुकसान भरपाई, अतिवृष्टी अनुदान, विविध प्रलंबित अनुदान बाबत निवेदन देण्यात आले. हे निवेदन माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर महाजन मा.नगरध्याक्ष, पुष्पाताई महाजन, मा. रविंद्र पाटील जि.प.सदस्य, तालुकाध्यक्ष धनराज माळि, दिपक वाघमारे मा.उपनगराध्यक्ष, , मोहन नाना जेष्ठ नेते, देवरे आबा कार्योध्याक्ष, रघुनाथ पाटील मार्केट कमिटी संचालक, दिलीप अण्णा धनगर मार्केट कमिटी संचालक, नाटेश्वर पवार माजी युवक अध्यक्ष, मनोज पाटील युवक अध्यक्ष, सुरेखा ताई पाटील महिला अध्यक्ष, ओंकार माळी, संजय पाटील पिंपळे, शरद आबा,, दिनानाथ चव्हाण…

