भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खडका ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंचांच्या मुलावर औद्योगिक वसाहती परिसरामध्ये रात्री चाकू हल्ला झाला. याप्रकरणात मुलगा जखमी असून त्यावर भुसावळ येथे हिदम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील खडका गावातील सरपंच यशोदाबाई देविदास तायडे यांचा मुलगा गिरीश याच्यावर चाकूहल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंच यशोदाबाई तायडे यांचा मुलगा गिरीश तायडे हा जखमी झाला आहे. रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान एमआयडीसी परिसरामध्ये हल्ला झाला आहे. जखमी गिरीश तायडे याच्यावर भुसावळ येथील हिदमा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश तायडे यांच्यावर पाच ते सहा ठिकाणी वार झाले आहेत.
Author: editor desk
ठाणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. भाईंदर पूर्वेला गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपवाटप करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.भारती रंधे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले. माननीय माजी महापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विनभाऊ सोनवणे, सौ सरिता ललित कोल्हे नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे ऍड.अभिजीत जितेंद्र रंधे नगरसेविका रेश्मा काळे कुंदन काळे शोभा चौधरी केशवराव म्हस्के माजी नगर सेविका सौ.कमलताई म्हस्के निशा पवार शांतनु नारखेडे हर्षल मावळे शुभांगी बिराडे संकेत कापसे नारखेडे साहेब उपस्थित होते त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले. शक्ती फाउंडेशनच्या…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसाआधी प्रत्येकच्या घरातील टीव्हीवर येणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील सर्वांचीच लाडकी बनली. तिला रसिका नाही तर शनाया नावानेच लोक ओळखू लागले. काहीशी खलनायिका भूमिका असली तरी प्रेक्षकांना तिचा वेडेपणा, साधेपणा भावला. अल्पावधीतच रसिका मराठी मनोरंजनसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून पुढे आली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिकाने 2021 मध्ये लग्न करत सर्वांना धक्का दिला. डान्सर आदित्य बिलागीसह तिने लग्नगाठ बांधली. मग आता रसिका पुन्हा लग्न करतीए अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया. रसिका आणि आदित्य बिलागी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१८ मध्ये त्यांची भेट लॉस…
मुंबई : वृत्तसंस्था शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापूर शहरात तीव्र आंदोलन झाले. आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूर आंदोलन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला आश्चर्य आणि गंमत वाटते की भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखाच दूषित होत आहे. राज्यामध्ये सारख्या दंगली होत राहिल्या तर राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे जनता घाबरली आणि बिथरली आहे.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमुळे जनता घाबरली आहे आणि हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देशातून भारतीय जनता पक्षाला विरोध होत आहे. हे आता भाजपच्या लक्षात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खोटे नगर परिसरात दुचाकीची चावी हरवल्यानंतर मित्रांमध्येच वाद उफाळल्याने मित्रानेच धारदार शस्त्र मारून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. सुरूवातीला हल्ल्यात तरुण अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र बुधवारी पहाटे तरुणाची प्राणज्योत मालवल्याने पोलिसांनी या प्रकरणी खुनाचे कलम वाढवत तिघांना अटक केली. अविनाश निंबा अहिरे (35, कुसूंबा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगराजवळील अंडाभूर्जीच्या गाडीवर अविनाश हा चारचाकी (एम.एच.19 ई.ए.0451) वरून मित्रासोबत आल्यानंतर संशयितदेखील आले. अविनाशची दुचाकी संशयित दीपककडे होती मात्र दुचाकीची चावी हरवल्याने अविनाशने त्याबाबत दीपकला विचारणा केल्यानंतर चावी शोधत आहे, असे संशयिताने सांगितल्यानंतर…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर शहरात काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेट्स ठेवल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, आक्षेपार्ह स्टेट्सविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज आंदोलन पुकारले. सकाळी 11 वाजेपासून शिवाजी चौक परिसरात हिंदूत्ववादी संघटनांनी एकत्र परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी घरे, दुकानांवर दगडफेक केल्याची घटना घडली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जमाव आक्रमक झाल्याने त्याला पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. सध्या कोल्हापूर शहरात एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. जमावाला…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा मिमित्त भव्य रक्तदान शिबीरांची सुरुवात शाररिक व्यंगाला न जुमानता विक्रमी दिव्यांग रक्तदाते मुकुंद गोसावी यांच्या स्वंयस्फूर्त रक्तदानाने करण्यात आली. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी याप्रसंगी सुरळीत रक्त साठा कमी झाला असून गंभीर पीडित रुग्ण, प्रसुती होणाऱ्या माता भगिनी यांना तसेच थेलेसिमिया हिमोफिलिया सिकलसेल रुग्णांना रक्ताची सदैव आवश्यकता असते याकरिता रुग्णांच्या नवजीवनसाठी रक्तदान केले पाहिजे. दिव्यांग रक्तदाते मुकुंद गोसावी यांच्या रक्तदान सेवा कार्याचे कौतुक करून रक्तदान कार्य ईश्वरीय सेवा असल्याचे सांगितले
मुंबई : वृत्तसंस्था ६ जून शिवराज्यभिषेक दिन म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सुद्धा एका कार्यक्रमात हजेरी लावलेली होती. यावेळी त्यांनी भाष्य करीत सल्ला देखील दिला आहे. देशात अनेक राजे होऊन गेले, पण त्यांचे राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालले. याला एकच अपवाद म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे भेदभाव न करता रयतेचे राज्य केले. त्यांनी कधी भोसल्यांचे राज्य केले नाही, तर त्यांनी उभे केले ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. छत्रपतींचा हाच आदर्श घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरातील मुख्य बाजारपेठेतून दुचाकी लंपास केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कानळदा रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी प्रशांत मोहन बडगुजर यांच्या मालकीची दुचाकी दिनांक २१ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात असलेल्या काँग्रेस भवन जवळ लावलेले असताना दुचाकी क्रमांक एम.एच.यु.१२ जे.टी ३४२२ या क्रमांकाची दुचाकी २० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रफुल धांडे हे करीत आहे.

