Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग कार्यालयांतर्गत शिवाजीनगर कक्षात कार्यरत एका कर्मचाऱ्यास असताना मारहाण झाली. हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्व कर्मचारी पोलिस ठाण्यात एकवटले होते. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार रोशन इंदुरकर व योगेश लासुरकर हे रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवाजीनगर भागात गेले होते तेथे विकी देवपुजे नामक तरुणाने वारंवार वीजपुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा केली. यावर कर्मचाऱ्यांनी फिडर ब्रेक डाऊन झाल्याने व्यत्यय आल्याचे सांगितले. यावेळी दुसऱ्या ठिकाणचा पुरवठा खंडित झाल्याचा निरोप आल्याने तेथे जाण्यास निघाल्याचा राग आल्याने देवपूजे याने लासुरकर यांना मारहाण केली. या घटनेचा महावितरण कंपनीच्या भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  चोपडा तालुक्यातील यावल रस्त्यावरील हिरा कॉटन जिनिंगमधून चोरट्यांनी साडेआठ लाखांची रोकड चोरून नेली. चोरीचा हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. पाच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी अंगावरचा शर्ट काढून चेहऱ्यावर बांधत आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले असल्याचे जिनिंगचे मालक सुनील जैन यांनी सांगितले. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीच्या सराफा दुकानातील चोरीचाही तपास अद्याप लागलेला नाही.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील अठरा वर्षीय तरुणीला पळवून नेण्याच्या प्लान तरुणीच्या सतर्कतेने व पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतल्याने त्या तरुणाचा प्लान फिस्कटला आहे.  त्यामुळे आता  पोलिसांच्या मदतीने तरुणी सुखरूप घरी असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या १८वर्षीय मुलगी दिनांक २ रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तरुणी एका झेरॉक्स दुकानात गेली असता त्या ठिकाणी २१ ते २२ वर्षीय इसम येत इथे कलर प्रिंट निघेल का अशी विचारणा केली असता तेथूनच तरुणीवर काहीतरी भुरड टाकून व काहीतरी कारणास्तव शहरातील एका ठिकाणी तरुणीला घेऊन जात तिचे हातपाय बांधून ठेवत तरुणीच्या जवळ कॉलेज बॅगमध्ये मोबाईल असल्याने…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील टाकळी प्र.चा.येथील तुळसाई नगरात भूखंडाच्या जागेवर सभा मंडपाचे काम सुरू आहे. या कामासाठी खडीने भरलेल्या डंपर (एम. एच. ४६ बीबी ८०६७) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सागर पुंजाराम पवार (गुजर) यांचा तीन वर्षांचा मुलगा समर्थ पवार याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर डंपरचे चाक गेल्याने त्यात त्याचा बळी गेला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनेनंतर चालक डंपर सोडून पळून गेला. संतापलेल्या लोकांनी डंपरची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे. रात्री उशिरा शहर पोलिसांत विनोद विठ्ठल गुजर यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा तपास करण्यात यावा, अशी मागणी…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील एका गावात आपल्या चुलत बहिणीशी रात्रीच्या सुमारास भावाने चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव या गावातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला शाळेच्या सुट्ट्या सुरू असल्याने अल्बम मुलगी आपल्या आजीच्या घरी आलेली असताना यावेळी अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ हा देखील या ठिकाणी होता त्या दिनांक पाच मे रोजी रात्रीच्या सुमारास या भावाने अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना तिच्यासोबत चुकीचे कृत्य करीत गळा दाबून जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनेकांचा प्रवेश करून घेत शिंदेच्या शिवसेनेचे वजन वाढविले आहे. शुक्रवारी ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील महापौर निवासाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती प्रवेश कांदिवली बीएमसी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक एकनाथ हुंडारे आणि मढचे माजी नगरसेवक गणेश भंडारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील खोटे नगर परिसरातील घराचा दरवाजा उघडा ठेऊन हॉलमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील रहिवासी असलेले संदीप श्रावण साबळे (वय ४१) २ रोजी घराचा दरवाजा उघड ठेऊन झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या उशीजवळ असलेला २० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला . याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला संदीप साबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपस पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. तर, 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे. तसेच, भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत 18 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. या संदर्भात बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील टॉवर चौकातील एका दुकानाच्या समोर लावलेले दुचाकी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील रिंग रोड परिसरातील शंकरवाडी येथील रहिवासी ललित भास्कर चौधरी (वय ५०) हे दिनांक २ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौक परिसरातील एका दुकानाच्या समोर दुचाकी क्रमांक एम.एच.१९.ए.पी.७९२५ हि गाडी पार्किंग करून आपल्या कामानिमित्त गेले असता या ठिकाणाहून अनोळखी चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली आहे. या प्रकरणी त्यांनी जळगाव शहर पोलीस स्थानकात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर हे करीत आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आता प्रत्येक गावासह तालुका स्तरीय बैठकीचे आयोजानाला सुरुवात केली असून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पुन्हा एकदा पालकमंत्री पाटील सज्ज झाले आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्राम गृहावर शिवसेनेच्या जळगाव तालुक्यातील पदाधिकारी यांचे महत्त्वाची आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. दि. ४ जुन रोजी अजिंठा विश्राम गृह येथे सकाळी १० वाजता ही बैठक सुरु होणार आहे. तरी जळगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Read More