मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वेगवेगळे वक्तव्य केल्याने त्यांना आता जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘तुमचा देखील दाभोळकर करू’ अशी धमकी देण्यात आली आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचं’ या नावाच्या खात्यावरुन अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलभरो आंदोलन आहे. याच दरम्यान ही धमकी आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील कोर्ट परिसरातून ५० वर्षीय व्यक्तीची दुचाकी अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भाटीया गल्लीतील शेतकरी श्यामसुन्दर रमेश काबरा(वय ५०) हे दि. ०३ जून रोजी शहरातील कोर्ट बाजार परिसरात आले असता. त्यांची दुचाकी क्र.एम.एच.१९.सी.क्यू.०८९३ हि सुमारे ५० हजार रुपये किमतीची अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी धरणगाव पोलिसात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.उमेश पाटील हे करीत आहेत.
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यात एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुला विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. याच परिसरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा देखील राहतो. त्याने दि.८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास त्याच्या मित्राच्या गच्चीवर अल्पवयीन मुलीस बोलवून तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्या प्रकरणी त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जळगाव, धुळे,नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रमुख 2024 या पदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. ना.गिरीषजी महाजन यांच्या आदेशानुसार जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक 2024 प्रमुख पदी दादासो चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड करून खऱ्या अर्थाने त्यांना पक्षाने न्याय दिल्याचे बोलले जात आहे कारण भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे 2024 मधील निवडणूक त्यांना लढविता येणार नाही म्हणूनच पक्षनेतृवाने त्यांना ही जबाबदारी दिली असावी.मागील विधानसभा निवडणूक त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष लढविली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. चंद्रशेखर अत्तरदे यांना मिळालेल्या जवाबदारी मुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील आनंदी आहेत.
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे आठवडी बाजाराच्या परिसरात सुरू असलेल्या सुलभ शौचालयाचे बांधकाम करत असताना 33 वर्षीय मजुराला मुख्य वाहिनीचा धक्का बसल्याने बांधकाम करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडी बाजाराच्या परिसरात सुलभ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. शौचालयाच्या वरूनच उच्च लघुदाब विद्युत वाहिनी गेली आहे. अशातच दि. ८ रोजी दोघे जण या शौचालयाचे बांधकाम करीत होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास रहेमान गफ्फार मन्यार (33, अमळगाव, ता. अमळनेर, ह. मु. अडावद, ता. चोपडा) या मजुराचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता गेल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला…
जळगाव : प्रतिनिधी बनावट फेसबुक खाते उघडून पैशांची मागणी होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, सायबर चोरांनी चक्क अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने दोन वेळा बनावट खाते उघडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात सायबर ठगाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्यांदा २८ मार्च रोजी ठगाने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविल्या होत्या. त्यातील ज्यांनी या रिक्वेस्ट स्वीकारल्या त्यांना पैशांची मागणी झाल्याने, त्यांनी याबाबत अपर पोलिस अधीक्षकांना माहिती दिली होती. गवळी यांनी पोलिस कर्मचारी अजय पाटील यांना बनावट खाते बंद करण्याच्या सूचना केल्यानंतर सायबर…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ जामडी येथे गुरुवारी दुपारी तरुणाचा खून झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील ४५ वर्षीय राजेंद्र सुकदेव पाटील आणि जामडी येथील २५ वर्षीय तरूण तरबेज शहा याकूब शहा अशी खून झालेल्या इसमांची नावे आहेत. बुधवारी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे झोपण्यासाठी शेतात गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी त्यांचा गळा दोरीने आवळून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार मारले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी दोरी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे. जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे.…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात महिलासह तरुणीवर अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असताना नागपुरात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या बहिणीवर तरुणाची नजर पडली. नात्याचा विचार न करता त्याने आपल्याच चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणेच्या ३ महिन्यांनंतर ही स्थिती उघड झाली. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या तरुणाविरुद्ध उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी उमरेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात राहते. ती इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी आहे. तिचा चुलत काका तिच्या घराशेजारी राहतो. ती सतत त्यांचा घरी ये-जा करत…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील खूबचंद साहित्या नगरातील सराईत गुन्हेगार किरण शंकर खर्चे (वय ३०) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात एका वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण खर्चे याच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये १६ गुन्हे तर ५ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. शिवाय जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुध्दा गुन्हा दाखल असून तो शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होता. त्यामुळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्याचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला होता. नंतर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अतुल…

