Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी  महिला बचत गटाची ६७ हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग अज्ञात दोन जणांनी मिरची पूड फेकून मारहाण करीत लांबविल्याची घटना आटेवाडा ते मोरगाव मार्गे रावेर रस्त्यावर ८ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनाला अज्ञात दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील आडगाव कासार खेडा येथील रहिवाशी आकाश अनिल पाटील वय ३० हे महिला बचत गटाचे जमविलेतेल ६७ हजार १४३ रुपये असलेली बॅग घेऊन जात असताना अज्ञात दोन व्यक्ती मोटारसायकलवर येऊन त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून डोळ्यात मिरची टाकून जबरदस्तीने बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना आटेवाडा ते मोरगाव रावेर रस्त्यावर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृतीची घोषणा घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्यानंतर नाट्य घडले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून कारने परतणाऱ्या पाटील परिवार काळाने घाला घातला. त्यांची कार पुलाखाली कोसळून दहा वर्षाच्या मुलासह तिघे ठार झाले. तर चार जण जखमी झाले. शुक्रवार हा त्यांच्यासाठी घातवार ठरला. हा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास नवलनगरजवळ घडला. हा अपघात एवढा भीषण होता की अनेकांच्या अंगाचे थरकाप उडाला. या अपघातात सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला. नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होता. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण हाेते. वेगाने येणारी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाल्यानंतर अमळनेर शहरात संचार बंदीचे आदेश उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी रात्री उशिरा काढले आहे. त्यामुळे आता शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराफ बाजार परिसर व्यापाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय राकेशसिंग परदेशी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. लहान मुलांच्या भांडणातून दंगल झाल्याचा अंदाज आहे दगडफेकीचे कारण समजू शकले नाही पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. पोलिस दंगलीमागील संशयितांचा शोध घेत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असतांना अडावद पोलिसांनी केलल्या कारवाईत 4 संशयित आरोपीसह तब्बल 14 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसारए जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या अडावदचे सपोनि गणेश बुवा व स्टाफ यांनी पेट्रोलींग दरम्यान चार संशयित ईसमाना दोन विना क्रमांकाचे मो.सा.सह पकडले असता त्यांची शाहानिशा केली असता त्यांचे ताब्यातील युनिकॉर्न गाडी ही अडावद येथील पुष्पा रेसिडेंसी येथुन चोरी केले बाबत कबुल केले त्यावरून सदर युनिकॉर्नचा चेसेच नंबर व इंजिन नंबर पाहुन खात्री करता ती अडावद पो.स्टे. गु.र.न.33 / 2023 भा.द.वि.क. 379 प्रमाणे दाखल गुन्हयातील असले बाबत खात्री केली तद्नंतर सदर आरोपीतांना…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  प्रत्येक मुलीचे ज्यावेळेस लग्न ठरते त्यावेळेस ती स्वप्नातील राजकुमारासोबत स्वप्न रंगवत असते असेच एका मुलीचा लग्न ठरलं तेव्हा स्वप्नातला राजकुमार इंजिनिअर असल्याचं तिला सांगण्यात आलं. यानंतर लग्नही धुमधडाक्यात झालं आणि मुलगी माहेरहून सासरी गेली, पण सासरी आल्यानंतर या मुलीला धक्का बसला आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. हे प्रकरण हरदोई जिल्ह्यातील आहे. हरदोईच्या कोतवाली भागातील मुलीचं लग्न 4 महिनेआधी शाहजहांपूरच्या शुभम त्रिपाठीसोबत झालं. हे लग्न हिंदू रितिरिवाजानुसार झालं, तसंच मुलीच्या वडिलांनी आयपतीप्रमाणे खर्चही केला एवढच नाही तर मुलाला हुंडाही दिला, असा दावा मुलीने आणि तिच्या माहेरच्यांनी केला आहे. लग्न झाल्यानंतर मुलगी शाहजहांपूरला सासरी आली तेव्हा हनिमूनच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या आठ दिवसापासून बदलत्या हवामानामुळे राज्यात शुक्रवारी उन्हाची तीव्रता वाढलेली असून त्याचप्रमाणे अार्द्रता वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा अाणि विदर्भात ढगाळ वातावरण हाेते. विदर्भ अाणि काेकणातही १५ जूनपर्यंत उष्णता व दमटपणा वाढलेला राहील. १६ जूननंतर मान्सून गाेवा व त्यापाठाेपाठ सिंधुदुर्गमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला. ‘बिपाेरजाॅय’ चक्रीवादळाच्या बाह्य परिघातून निघालेल्या वाऱ्यांमुळे नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत ताशी २५ ते ३० किलाेमीटर वेगाने वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात अाली. अति उष्णता म्हणजे अति आर्द्रता हे हवामान शास्त्रीय सूत्र आहे. सूर्यकिरणांमुळे जमिनीवर निर्माण झालेल्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात वाढ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका व्यावसायिकाला त्याच्याच भावाचे अश्लिल फोटो बदनामी करण्याच्या उद्देशाने पाठविल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.१ जून गुरुवार रोजी व्यावसायिक हा व्हॉट्स अॅप बघत असताना त्यांना एका क्रमांकावरून काही फोटो आले. ते फोटो डाउनलोड केल्यानंतर ते त्यांच्या भावाचे होते तर अश्लिल बनवून पाठवून आले होते. ते फोटो त्यांनी लागलीच डिलीट केले. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या मुलाच्या व्हॉटस्अॅपवर देखील तेच फोटो आले. बदनामी करण्याच्या उद्देशाने फोटो पाठविले म्हणून व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून एकाविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  येथील बसस्थानकात चाकूचा धाक दाखवून खिशातील ५० हजारांची रोकड हिसकावून चोरटा पोबारा झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एकनाथ बाबूराव निळे निवृत्त कर्मचारी आहेत. ओझरखेडा येथे शेती असल्याने ये- जा करतात. बुधवारी निळे दाम्पत्य भुसावळ बसस्थानकात बसची वाट पाहत होते. दुपारी कमरेला चाकू लावून किती पैसे आहेत ते दे, अशी धमकी देत, खिशातील ५० हजार काढून चोरटा पसार झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत नोंद करण्यात आली असून, तपास एपीआय सुदर्शन वाघमारे करीत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात अनेक चित्रपट येतात आणि जातात देखील पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे खूप कमी चित्रपट आहे. जे केव्हाही लावलते तरी पाहावेसे वाटतात त्यातील एक म्हणजे ‘गदर’ हा चित्रपट जर तुम्ही कधीही पाहिला तरी तुम्हाला बोर होणार नाही पण आता ‘गदर -२’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट ‘गदर 2′ बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.’गदर: एक प्रेम कथा’ रिलीज होऊन जवळपास 17 वर्षांनंतर निर्माते ‘गदर 2’ लोकांसमोर आणत आहेत. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट…

Read More