Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातले !
    क्राईम

    प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातले !

    editor deskBy editor deskJune 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठाणे : वृत्तसंस्था 

    जिल्ह्यातील मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय प्रियकराने ३२ वर्षीय प्रेयसीची हत्या करून तिचे कटरने लहान लहान तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. भाईंदर पूर्वेला गीतानगर फेज ७ आहे.

    येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले. सहानी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ४ जूनला साहनी याने सरस्वतीची हत्या करून तिचे कटरने तुकडे केले. त्याने कोणत्या कारणाने व कशा प्रकारे हत्या केली? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. सहानी याचे रेशनचे दुकान असून त्याचे व सरस्वतीचे १० वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.