Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रसिका अडकणार लग्न बंधनात !
    राज्य

    रसिका अडकणार लग्न बंधनात !

    editor deskBy editor deskJune 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    गेल्या काही दिवसाआधी प्रत्येकच्या घरातील टीव्हीवर येणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील सर्वांचीच लाडकी बनली. तिला रसिका नाही तर शनाया नावानेच लोक ओळखू लागले.
    काहीशी खलनायिका भूमिका असली तरी प्रेक्षकांना तिचा वेडेपणा, साधेपणा भावला. अल्पावधीतच रसिका मराठी मनोरंजनसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून पुढे आली. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच रसिकाने 2021 मध्ये लग्न करत सर्वांना धक्का दिला. डान्सर आदित्य बिलागीसह तिने लग्नगाठ बांधली. मग आता रसिका पुन्हा लग्न करतीए अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया.

    रसिका आणि आदित्य बिलागी २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकले. २०१८ मध्ये त्यांची भेट लॉस एंजिलिस येथे भेट झाली होती. बरेच वर्ष ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. २०२१ मध्ये त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले. आदित्य हा अमेरिकेतच असून रसिका कधी अमेरिका तर कधी भारतात असते. पण आता ती पुन्हा लग्न करतेय अशी चर्चा सुरु आहे त्यामागे कारण आहे तिचं नवीन नाटक. होय रसिका रंगभूमीवर परतली आहे. ‘डाएट लग्न’ असं तिच्या नाटकाचं भन्नाट नाव आहे. नाटकात काम करायला रसिका खूपच उत्सुक असून तिचा नवरा आदित्यही खास नाटक बघण्यासाठी अमेरिकहून येणार आहे. ‘डाएट लग्न’ नाटकातून रसिका आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. विजय केंकरे यांनी हे नाटक दिग्दर्शित केलं असून हे त्यांचं १०१ वं नाटक आहे. ९ जून पासून नाटक रंगभूमीवर दाखल होतंय. पहिला प्रयोग दादरच्या शिवाजी मंदिरला होणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.