अमळनेर : प्रतिनिधी शहरात अल्पवयीन मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीतील एक आरोपीला न्यायालयीन कोठडीत उपचार सुरु असलेल्या माजी नगरसेवक पुत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (वय-३३) याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. दंगलीतील संशयीत तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधिकार्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. किरकोळ कारणावरुन अमळनेर शहरात दंगल झाल्याची घटना गेल्या चार दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवस संचारबंदी उठविल्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना अटक करण्यात आली होती. यामध्ये अमळनेरचे माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्यासह त्यांचा मुलगा अशपाक उर्फ पक्या सलीम शेख यालादेखील आरोपी करण्यात आले होते.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरातून अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी अब्दुल मुजिद शेख हबीब हे मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात दिनांक 12 जून रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करीत घरात ठेवलेला सुमारे सात हजार रुपये कंपनीचा मोबाईल लंबास केल्याप्रकरणी अनोळखी चोरटे विरोधात जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार बशीर तडवी हे करीत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात नियमित सुरु असलेल्या दुचाकी चोरीचे सत्र सुरूच होते. याचा तपास प्रत्येक पोलीस स्थानकात जरी असला तरी स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल २६ दुचाकीसह चोरट्याला आज ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रोड भडगाव येथील एका साई अँटो बजाज शो रुममधील तब्बल ३० दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्हाच तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आल्याने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त बातमी मिळाली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एरंडोलच्या शिक्षकांच्या बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारताना तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या एका शिक्षण संस्थेतून दुसर्या शिक्षण संस्थेत होणारी बदली थांबवण्यासाठी दोन शिक्षकांकडून चक्क धनादेशापोटी 75 हजारांची लाच मागून अॅडव्हान्समध्ये धनादेश स्वीकारणार्या एरंडोल शहरातील सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६), मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (वय-४२), लिपिक नरेंद्र उत्तम वाघ(वय-४४) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पकडल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. यांनी केली कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या काही परिसरातील नागरिकांनी सहाय्यक अभियंता यांना आज निवेदन देऊन आपली व्यथा मांडण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की जळगाव शहरातील सावखेडा शिवारात असलेल्या जाणता राजा नगर कोल्हे हिल्स परिसर या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून शिरसोली सब स्टेशन कडून वीज पुरवठा नियमित होत असतो त्यात वीजपुरवठा अत्यल्प मिळतो तर कधी व्होल्टेज कमी असते. पाण्याचे कनेक्शन सुरू होत नाही फ्रिज व पंखे नियमितपणे जळत असतात त्यामुळे हा विद्युत पुरवठा बंद करून गिरणा पंपिंग रोड सबस्टेशन येथून या परिसरात विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर देविदास जाधव, गोपाल कुलकर्णी, तुषार बोरसे, नैनेश्वर…
मुंबई: वृत्तसंस्था अवकाळी पावसामुळे राज्यात सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७ लाख ३६ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या सततचा पाऊस ही नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याचा निर्णय ५ एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने आणि निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ५०० रुपये प्रति हेक्टर अशी आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरु झाला असून यात झालेल्या गोळीबारात ९ जणाचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे. इम्फाळ पूर्वेकडील खमेनलोक भागात सकाळी झालेल्या ताज्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसपी शिवकांता सिंग यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार होण्याचे सत्र सुरुच आहे. अज्ञात हल्लेखोरांनी चर्चमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना सध्या इंफाळ येथील राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कुकी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्री 10 ते 10:30 च्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात २००१ मध्ये आलेल्या ‘गदर’ सिनेमानंतर २००१ तब्बल २२ वर्षांनी ‘गदर २’ मा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकिनाची आयकॉनिक लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर सनी देओल नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने देशभर चर्चेत देखील येत असतो. ‘गदर’मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासोबत त्यांच्या मुलाची भूमिका करणाऱ्या चिमुकल्यानेही लक्ष वेधलं होतं. गदर २ मध्ये आता त्यांचा मुलगा मोठा झाला असून तारा सिंग आणि सकिनाची सूनही दाखवण्यात आली आहे. ही सुनेची भूमिका साकारली आहे अभिनेत्री सिमरत कौर हिने. यावेळी सिनेमात सनी देओल सिमरतची सुटका करायला पाकिस्तानला जाणार असं बोललं जातंय. सिमरत कौरने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तीन ते चार दिवसापासून बिपरजॉय वादळ मोठ्या प्रमाणात दाखल झाले असतांना आता त्या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून याबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे. चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होईल की नाही याची माहिती मंगळवारी देण्यात आली. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढे जाण्यास मदत मिळाली आहे. आता मान्सूनच्या मार्गात चक्रीवादळाचा अडथळा नाही किंवा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता नाही. अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र किनारी 10 ते 14 मीटर उंच लाटा उसळतील तर 25 सेंटीमीटरहून…
भडगाव : प्रतिनिधी चाळीसगाव रोडवरील साई ऑटो सेंटर येथून ३० नव्या दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना शोरुममधील स्टॉक रजिस्टर तपासल्यानंतर उघडकीस आली असून एकूण २३ लाख रुपये किंमतीच्या मोटारसायकल चोरी झालेल्या आहेत. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑटो सेंटरचे संचालक रावसाहेब केशव पाटील (भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नेहमीप्रमाणे दररोज सकाळी १० वाजता शोरुमला जावून कामावर देखरेख तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीबाबत तपशिलाची माहिती घेतली जाते. दि. ११ जून रोजी दुपारी ३ वाजेनंतर शोरुमचे व्यवस्थापक महेश लोटन पाटील तसेच रविकांत पाटील यांनी शोरुममधील दुचाकी वाहनांच्या स्टॉकची पडताळणी केली असता काही दुचाकी कमी असल्याचे…

