जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वाळू माफियांचा धुमाकूळ सुरु असतांना महसूल अधिकारी आता ॲक्शन मोडवर येत मोठी कारवाई केल्याने वाळूमाफियांची मोठी धांदल उडाली आहे. महसूल अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून असणारे नेहमीच कारवाईपासून बचाव करणाऱ्या वाळू माफियांच्या रेकीला चकवा देत महसूल प्रशासनाने मोठा प्लान करीत गिरणा नदीपात्रातून अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या १२ वाहनांवर कारवाई केली. यामध्ये ७ डंपर व ५ ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल प्रशास गेल्या आठवडाभरात अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव तालुक्यातील खेडी या गावातून २०० ब्रास वाळूचा साठा जप्त केल्यानंतर सोमवारी रात्री १० वाजता महसूल प्रशासनाच्या पथकाने…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन प्रकाश चौधरी (वय २३) या तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण करून विषारी औषध पाजल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी तरूणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघही संशयितांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चेतन याला सचिन कैलास चव्हाण (२३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (२४), सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव (३६), कुंदन रवींद्र पाटील (३०, रा. रामेश्वर कॉलनी) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण केली होती. नंतर विषारी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्ताधारी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजप-शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात कळीचा मुद्दा ठरल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या मतभेद नसल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांचा कानाला इजा झाली आहे, त्यांना डॉक्टरांनी प्रवास करण्यास नकार दिल्याचे उत्तर दिले. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोल्हापुरात जाणार होते. मात्र, आजच्या…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील सावळे नगर परिसरातील एका तरुणाला गावठी पिस्तूल घेऊन फिरताना स्थानिक गुन्हे पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना माहिती मिळाली होती. भुसावळ शहरात सावळेनगरमध्ये संशयित सागर बबन हुसळे हा फेकरी शिवारात झेटीएस भागात गावठी पिस्तुल घेवून येणार आहे. पथकातील पोलीस अंमलदार यांनी भुसावळ शहरात फेकरी शिवारात झेटीएस भागात नमुद इसमाची माहीती काढता तो पाण्याचे टाकी जवळ असल्याची माहीती मिळाली. पथकाने संशयित इसमावर छापा टाकुन त्यास ताब्यात घेत नांव गाव विचारता त्याचे नांव सागर बबन हुसळे (वय २६, रा. भगवान सावळे नगर,…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकरला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्यात अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून अनेक वाहने आगीत भस्मसात झाली आहे. आज दि.१३ रोजी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केमिकलमुळे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुण्या मुंबई दरम्यानची तसेच कुणेगावकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले. यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दिवसाची व रागेचा लोट पडल्याने चौघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून तहसीलदार पद रिक्त होते. या पदावर आता महेद्र सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली असून दि.१२ जून २०२३ रोजी महसूल व वन विभागाच्या नागपूर विभागाने काढलेल्या पत्रात यांची बदली आता धरणगाव तहसीलदार पदी करण्यात आली आहे. त्यांना धरणगाव तहसीलदार पदाचा चार्ज येत्या १५ जूनच्या आत घेण्यात असल्याचे देखील या पत्रात उल्लेख आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण सरकारी नोकरी मिळणार यासाठी नेहमीच परीक्षेची तयारी करीत असतात त्यातच गेल्या काही महिन्या आधी राज्यातील सरकार मोठी भरती होणार असल्याचे आश्वासन देत असतांना नुकतेच राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागातील सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांच्या चार हजार ६४४ पदभरतीसाठी लवकरच परीक्षा…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील यावल रोडवरील म. गांधी कॉलेजच्या बाजूला असलेल्या बाजार समितीचे संचालक गोपाल श्रीराम पाटील यांच्या मालकीच्या समर्थ ट्रेडर्स या दुकानातून दिनांक ११ जून रोजी रात्री आठ वाजेपासून ते १२ जूनच्या पहाटे आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून कडीकोयंडा तोडून दुकानात प्रवेश करून सुमारे २ लाख ९२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे.. अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील मुख्य ड्रॉवरमध्ये ठेवलेली ही रोख रक्कम लांबवली आहे. या घटनेतील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून अज्ञात आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच यावल रोडवरील हिरा कॉटन या जिनिंगमध्ये…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बुर्हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर शहरा पासून अवघ्या दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मृत्यू झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.१२ जुन रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुर्हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ यावलहुन चाळीसगाव जाणार्या एसटी बस क्रमांक एमएच 14 बिटी 2144 या वाहनचालक राजेन्द्र सोनवणे यावल आगाराची बसचा आणी मोटरसायकल एम पी 09 क्युटी 3939 या वाहनांचा भिषण अपघात होवुन यात दयाराम बारेला (वय 19) राहणार जामुनझीरा तालुका यावल हा जण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जळके येथील बसस्थानक परिसरातील कृष्णा ज्वेलर्स रात्री १२ते२:१५च्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आली या घटनेची माहिती आज सकाळी ५:१५च्या सुमारास वसंतवाडी गावाचे सरपंच विनोद पाटील यांनी जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे यांना तसेच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील यांना दुरध्वनी द्वारे त्याचं दुकानाचे शटर व चॅनल उघडे असुन चोरी झाल्याचे दिसून येत आहे असे सांगितले माहिती मिळताच कृष्णा ज्वेलर्सचे मालक मनोज पाटील हे आपल्या दुकानावर आले त्यांनी दुकानावर येऊन दुकानाची स्थिती पाहिली त्यांना दुकानात चोरी झाल्याची खात्री झाली त्यांच्या दुकानातील लोखंडाच्या तिजोरीसह चोरट्यांनी सुमारे २४००ग्रॅम वजनाचे चांदी अंदाजीत किंमत २१५०००व १००००रुपये रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही…

