अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मारवाड गावातील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील भाडे तत्वावरील शिव जनरल अॅण्ड किराणा दुकानाला रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आग लागल्याने सुमारे सात लाखांहून अधिक नुकसान झाले. पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीनंतर आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मारवाड गावातील रहिवासी राजेंद्र भगवान पाटील यांचे मारवड ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी संकुलात शिव जनरल स्टोअर्स अॅण्ड किराणा नावाचे दुकान आहे. दुकानाचे मालक राजेंद्र पाटील हे रात्री लघूशंकेला उठले असता आपल्या दुकानाचे दिशेने मोठा धूर निघताना दिसल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. किराणा दुकानाचे शटर उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याचे दिसून आल्यानंतर दुकानातील बादलीने पाणी टाकुन आग विजवण्याचा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील एटीएमच्या जवळून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील एका बँकेच्या एटीएमच्या बाहेरून दि.१० जून रोजी दुपारी १.१० वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलास अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.तुषार जावरे हे करीत आहेत.
अमळनेर : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन दिवसाआधी अल्पवयीन मुलामध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. यानंतर प्रशासनाने दोन दिवसाची संचार बंदी लागू करण्यात आली होती. ओट्यावर व्हिडिओ पाहणार्या तरुणांना हटकल्याच्या वादातून दोन गटात शहरात मोठी दंगल उसळली होती. दोन्ही गटांकडून तुफान दगडफेक करण्यात आल्यानंतर ईरफान जहुर बेलदार या संशयिताने तलवारीने सहा.निरीक्षक राकेशसिंग परदेशी यांच्यावर वार केला मात्र सुदैवाने वार चुकण्यात यश आले असलेतरी पायाला तलवार लागल्याने परदेशी यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील 61 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गटातील 29 जणांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना शनिवार, 10 रोजी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्या.यलमाने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिपरजॉय चक्रीवादाळ सुरु असतांना वाऱ्याचा वेग ताशी १७५ किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळाने रुद्र अवतार धारण केले आहे. तर या वादळाचा फटका पाकिस्तानला बसला आहे. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने पाकिस्तानात कहर केला. त्यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 80 घरांचेही नुकसान झाले आहे. खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू, डेरा इस्माईल खान, करक आणि लक्की मारवत येथे मोठे नुकसान झाल्याची माहिती पाकिस्तान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वच सरकार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. असे असतांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात (एमओईएफसीसी) विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. अधिकृत भरती अधिसूचनेत नमूद केल्यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना गलेलठ्ठ पगारासह विविध सोयीसुविधा मिळतील. निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांसाठी नियुक्त केले जाईल. हा कालावधी उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. एपीसीसीएफचे प्रधान खासगी सचिव, विभाग अधिकारी आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 2,08,700 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. या भरती प्रक्रियेद्वारे तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक म्हणजेच एकूण तीन…
चोपडा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नेहमी चर्चेचा विषय असलेल्या वाळूमाफियांनी पुन्हा एकदा पायी जाणाऱ्या तरुणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. हि घटना चोपडा तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणार्या ३० वर्षीय तरुणास धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. हा अपघात रविवारी सकाळी 11 च्या सुमारास अडावद कृषी विद्यालयाजवळ घडला. या अपघातात चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील राजेंद्र झिंगा धनगर या तरुणाचा मृत्यू ओढवला. रााजेंद हा तरुण अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी चालत असताना वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात सर्वात मोठा महामार्ग असलेल्या समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असून आता पुन्ह्या एकदा मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत हि घटना दि ११ रविवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले आहेत. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विनयभंग केल्या प्रकरणी महिलेच्या जेठाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि ११ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास विवाहिता घराच्या मागील रूममध्ये झोपलेली असतांना तिचा जेथ मागील रूममध्ये येत महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले तर त्याला विवाहितेने विरोध केला असता त्यावर विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करीत मी तुझ्या सोबत बळजबरी करेल अशी धमकी सुद्धा यावेळी दिली. या प्रकरणी विवाहितेने धरणगाव पोलिसात धाव घेत जेठ विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत…
जळगाव : प्रतिनिधी शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेल्या होस्टेलवर राहत असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील तरुणी जळगाव शहरातील एका मुलीच्या होस्टेल येथे असतांना दि.१० रोजी संद्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर फोन करून तिला उद्या तु मला एका हॉटेल येथे भेटायला ये असे वाईट बोलला तर दि ११ रोजी मध्यरात्री २ ते ३.३० वाजेच्या सुमारास तरुणीला तब्बल ३१ वेळा काही एक काम नसताना फोन करून तरुणीचा बुलेट दुचाकीने पाठलाग करीत विनयभंग केल्याने तरुणीने रामानंद…
जळगाव ; प्रतिनिधी एमआयडिसीतील एका बंद घराच्या दरवाजाच्या काडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दोन मोबाईल लांबविल्याची घटना ८ जून ते ९ जून दरम्यान घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि , एमआयडिसीतील फौजी ढाब्यासमोर पद्मिनी एन्टरप्राइजेस एन -६६ येथे रे श्रीराम दगडू पाटील वय ६२ हे राहत असून त्यांच्या बंद घराचे दरवाजाचे काडी कोयंडा तोडून घरातील २९ हजार रुपयांची रोकड, रेडमी कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लांबविलाच प्रकार उघडकीस आला . याबाबत श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध…

