जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय तरुणी पाणी घेण्यासाठी जात असतांना एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि. १४ जून रोजी संध्यकाळच्या सुमारास तरुणी गावात पाणी घेण्यासाठी जात असतांना याच गावातील एक तरूणाने तिचा पाठलाग करीत मोबाईल गाणे वाजवत आय लव्ह यु म्हणत तु सुंदर दिसते असे म्हणत हात पकडून तिला दुखापत करीत शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी आकाश खरात(वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील २० वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देत व तिचे व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरूणाविरोधात चाळीसगाव शहर पोलीसास्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणीस तब्बल २०१९ पासून नियमित लग्नाचे आमिष देत विश्वास संपादन करून व तु जर आली नाही तर माझ्या मोबाईल मधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून तुझी बदनामी होणार असल्याची धमकी देत तरुणीवर शहरातील एका पडलेल्या खोल्यामध्ये अत्याचार केला यावेळी तरुणीने लग्नाची विचारणा केली असता तिला नकार देत मारहाण देखील संशयीत आरोपी विष्णू पवार याच्या विरोधात चाळीसगाव…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ममुराबाद शिवारातील म्हाळसा देवी मंदिराजवळील विहिरीत १० वर्षांच्या मुलासमोरच पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी ९:३० वाजता घडली. वडील येतील या अपेक्षेने भांबावलेला मुलगा विहिरीच्या ठिकाणी ५-१० मिनिटे उभा राहिला, मात्र वडील येत नसल्याने शेजारील शेतातील शेतकऱ्यांना मुलाने माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. समाधान भास्कर कुंभार (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील पटेलवाडा परिसरात समाधान कुंभार हे पत्नी ज्योती, मुलगा वैभव व मुलगी राणी सोबत वास्तव्याला होते. समाधान कुंभार हे ममुराबाद शिवारात वीटभट्टीचा व्यवसाय करत होते. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करत होते. त्यांच्या आत्महत्येचे…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील छायादेवी राकानगर साकरी फाटा या भागातून घरासमोरून चोरट्याने कार लंपास केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छायादेवी राकानगर, साकरी फाटा येथील किशोर प्रभुदास निकम यांनी पंधरा दिवसांपूर्वी मित्र मकसूद शरीफ अहेमद शरीफ याच्याकडून मारुती इको (एमएच ४० केआर ७३६२) विकत घेतली. घराच्या संरक्षक भिंतीजवळ कार उभी केली होती. बुधवारी सकाळी झोपेतून उठून पाहिले असता कार कार घरासमोर नव्हती. त्यांनी कारचा इतर ठिकाणी तपास केला. कार कुठेच मिळून आली नाही. कार चोरीला गेल्याने त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील भडगाव रोडवर असणार्या अंधशाळेजवळ शतपावली करणार्या एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आई हॉस्पिटलशेजारी असणार्या बाप्पा पॉईंट जवळ राहणार्या रीटा भूपेंद्र मेहता (57) या घरकाम करतात. त्या सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गीता दिनेशभाई पटेल यांच्या सोबत निघाल्यानंतर अंधशाळेजवळ अज्ञात दोघे भामटे दुचाकीवर आले व त्यांनी रीटा मेहता यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची सोन्याची चैन बळजबरी काढून घेत पोबारा केला. महिलेने आरडा-ओरडा केला मात्र तो पर्यंत चोरटे पसार…
मुंबई : वृत्तसंस्था आम्ही कालही सोबत होतो, आजही सोबत आहोत आणि उद्याही सोबत राहणार, असे जाहीर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत बिनसल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. एका जाहिरातीमुळे काही होईल एवढी शिंदे गट व भाजपची युती तकलादू नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिंदे गट व भाजप यांच्यात जाहिरातीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असून युतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. अशात आज पालघरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात काय…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील ढेकू रोडवरील परिसरातील नोकरदाराचे बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील नारायणवाडी भागात प्लॅट क्रमांक एकमध्ये राजेंद्र शांताराम शिंदे (46) हे नोकरदार कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 8 ते 9 जूनदरम्यान शिंदे कुटूंब बाहेर गेल्याची संधी चोरट्यांनी साधत फ्रेंच दरवाजाची काच तोडून घरात प्रवेश करीत 35 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, चार हजारांचे चांदीचे दागिने तसेच पाच हजार रुपये किंमतीचे टायटन कंपनीचे मनगडी घड्याळ असा एकूण 64 हजारांचा ऐवज लांबवला. शिंदे…
अमळनेर : प्रतिनिधी शहरात दुचाकीच्या मागून येत डंपरने जोरदार धडक दिल्याने शनी मंदिरावरील पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील शनी मंदिराचे पुजारी मनोज वासुदेव उपासनी (वय ४७) हे आपल्या दुचाकी एम.एच.०३, बी जी ०९१२ ने दि. १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना मागाहून येणाऱ्या एम एच ११, ए एल ५७८३ या डम्परने धडक दिल्याने उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकून तो ५० ते ६० मीटर फरफटत ओढला गेला, आणि पुलावरील फुटपाथच्या दगडाचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. उपासनी याच्या पुतण्याने अमळनेर…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिनाभरापासून बंद असलेल्या शाळा उन्हाळी सुटीनंतर गुरुवारपासून सुरू होत आहेत. शिक्षण विभाग पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात ट्रॅक्टर- बैलगाडीतून स्वागत करणार आहे, तर शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या बालवर्गातील बच्चे कंपनीच्या पाऊलखुणांचे जतन केले जाणार असून भिंतीवरही हातांचे ठसे उमटवणार आहेत. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी पहिली-बालवाडीतील विद्यार्थ्यांचे ढोल-ताशे, लेझीम पथकांच्या गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या प्रवेशोत्सवात पहिल्याच दिवशी पोषण आहारात गोड शिरा, बुंदीचा लाडू मुलांना देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती …
भुसावळ : प्रतिनिधी येथील नाहाटा महाविद्यालय चौफुलीजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोटारसायकल व मोबाइल असा ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला. ही घटना रविवारी भरदिवसा घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील पांडवडा विजासन रोड येथील ३० वर्षीय मंगेश भरत बेलखुले हा दिनांक ११ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळ उभा होता दरम्यान, चाकूचा धाक दाखवून व मोबाइल हिसकावून चोरट्याने एमएच ३४.बीई ०९४५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी मंगेश बेलखुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सत्तार एम.शेख करीत आहेत.

