Author: editor desk

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील वाडे शिवारात बिबटयाचा वावर कायम असून त्याने पुन्हा एका वासराचा फडशा पाडला आहे. १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे भयभीत शेतकरी व ग्रामस्थांनी पिंजरे वाढविण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. वाडे शिवारातील कैलास मोहन परदेशी यांच्या शेतात रामलाल नथ्थु बोरसे यांची जनावरे बांधलेली होती. यापैकी बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला. याआधीही बिबट्याने बोरसे यांच्या एका वासराचा फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. या पशुपालकास नुकसान भरपाई द्यावी, वाडे परीसरात पिंजरे लावावेत, बिबट्याला जेरबंद करत नागरिकांमध्ये असलेली भीती कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अमळनेर शहरात १६ रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा दौरा झाला यावेळी भव्य रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या रोडशोमध्ये जिल्ह्यातील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी चोरट्यांनी आपली चलाखी दाखवत अनेक कार्यकर्त्यांच्या खिश्यावर डल्ला मारला असल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या रोड शो आणि सभेत ४६ जणांचे पैसे, पाकीट, मोबाइल चोरीस गेले आहेत. पोलिसांनी चार जणांना चोरी करताना पकडले आहे. समीर शहा सलीम शहा (२२, रा. रामदेवबाबानगर, धुळे), हमीदअली मोहम्मद अली उमर (४२, रा. रोशनबाग, मालेगाव), उमर फारूख शेख लतीफ (२२, रा. आझादनगर,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील समता नगर परिसरात एका घरात मुलगा बाहेर ओट्यावर बसला असताना, पित्याने घरातील बाथरूममध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी रामकृष्ण निकम (वय ५८, रा. समता नगर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगर परिसरातील शिवाजी निकम हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पत्नी ज्योती निकम या कामावर निघून गेल्या. दुपारी शिवाजी निकम हे मुलगा राजेंद्र सोबत घरी होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगा हा घराबाहेर बसलेला असताना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात  धार्मिक कीर्तनातून समाज प्रबोधन करणारे राज्यातील कीर्तनकार इंदूरीकर महाराजांना आपले वक्तव्य करणे भोवणार आहे. त्यांना नुकताच औरंगाबाद खंडपीठाने दणका दिलाय. एका जुन्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल खंडपीठाने कायम ठेवला आहे. इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वादानंतर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. हायकोर्टाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी सम तिथीला स्त्री संग…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळाव्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. तेथे डॉ. मोरे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. राऊ मोरे व कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते पवार म्हणाले कि, राज्यातील सरकार शेतकरी, शेत मजूरांना नुसतेच आश्‍वासन देऊन पाणी दाखवीत आहेत. शेतकऱ्यांचा मालाला भाव नाही, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र भरपाई नाही. नोकरभरतीपासून तर विकास कामांच्या निधीतही भ्रष्टाचारच भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला. पवार म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही घणाघाती टिका केली आहे. पवार म्हणाले कि, अत्यंत लोकप्रिय म्हणून एका व्यक्तीचा नावलौकिक त्यांच्या संघटनेच्या की त्यांच्या हितचिंतकांनी कुणी दिला ते मला माहिती नाही. ते करुन प्रोजेक्ट केलं. जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा, आणि मोठी संख्या ही भाजपच्या आमदारांची आहे. पण ही जाहिरात बघून आमच्याच आमच्या ज्ञानात भर पडली की यात भाजपचं योगदान मोठं नाही अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं काम या जाहिरातीच्या माध्यमातून आम्हाला कळलंं, अशी सणसणीत टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाने निश्चित केलेला विवाह मोडण्यास भाग पाडून ब्लॅकमेल करीत या त्रासास कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यातील एका गावातील घडली होती. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकर जामनेर पोलीस ठाण्यात गोकुळ पारधी या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय मुलीचे संशयित गोकुळ पारधी सोबत प्रेमसंबंध होते. कुटूंबियांनी तरुणीचे अन्य तरुणासोबत लग्न निश्चित केल्याने आरोपीने पिडीतेला सांगून हे लग्न मोडण्यास सांगितले व लग्न न मोडल्यास होणार्‍या भावी पतीला प्रेमसंबंधाल कल्पना देईल, अशी धमकीही दिली. आई-वडिलांची बदनामी टाळण्यासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी थेट युतीत येण्याची ऑफर विरोधी पक्षनेते अजित पवारांना दिल्यानंतर त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, अशी मिश्कील टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्यानंतर आज प्रथमच सुप्रिया सुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर अनेक मुद्द्यांवरून तोफ डागली. अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसापासून देशात अनेक चित्रपट आले पण त्यात जास्तीत जास्त चर्चेत असलेला ‘आदिपुरुष’ सिनेमा आज नुकताच रिलीज झाला असून या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच चित्रपटगृहांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. हैदराबादच्या सुदर्शन थिएटरमध्ये सकाळपासून शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. गर्दी इतकी आहे की पाय ठेवायलाही जागा नाही. अनेक थिएटरमध्ये हनुमानजींसाठी एक आसनही सोडण्यात आले आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांनी थिएटर मालकांना चित्रपटादरम्यान हनुमानजीसाठी एक जागा सोडण्याचे आवाहन केले होते. अशी श्रद्धा आहे की जिथे रामकथा होते तिथे हनुमानजी नक्कीच असतात. आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये आदिपुरुषच्या स्क्रिनिंगदरम्यान एक माकड थिएटरमध्ये प्रवेश…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय मुलीला पळवून नेल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस दि. ३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने मुलीच्या राहत्या घरातून तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.गजानन महाजन हे करीत आहेत.

Read More