Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते  अजित पवार यांच्या निधनानंतर विधानपरिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण अजितदादा कधीही खचले नाहीत. त्यांनी आरोपांना आपल्या कामातून उत्तर दिले. त्यामुळेच आरोप करणाऱ्यांनीही त्यांना सहकारी म्हणून स्वीकारले,” असे मत त्यांनी व्यक्त केले. विधानपरिषदेतील भाषणात ठाकरे म्हणाले की, “विधिमंडळाचे हे पहिले अधिवेशन अशा वेदनादायी परिस्थितीत सुरू होत आहे. नेहमी सभागृहात दिसणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही खंत प्रत्येकाच्या मनात आहे. माणूस असताना त्याचे महत्त्व कळत नाही; तो नसताना त्याची जाणीव तीव्र होते.” अजित पवारांच्या राजकीय आयुष्यातील “दोन सकाळी”ंचा उल्लेख करत ठाकरे…

Read More

आजचे राशिभविष्य दि. २३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या पालकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आज तुम्ही एक नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना आखाल, ज्याचा तुम्हाला दीर्घकाळात फायदा होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांचा यशाचा दर इतरांपेक्षा जास्त असेल. तुम्हाला अचानक एखाद्या स्रोताकडून पैसे मिळतील. आज अधिकारी तुमच्यावर खूश होतील. तुम्ही तुमचा वेळ आध्यात्मिक पुस्तके वाचण्यात घालवाल. वृषभ राशी आज, तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमचा जोडीदार तुमच्या एखाद्या कामाबद्दल तुमची प्रशंसा करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल.संध्याकाळी दूरच्या नातेवाईकाशी फोनवर बोलल्याने तुम्हाला बरं वाटेल. तुमच्या कामाशी संबंधित अनेक योजना आज वेळेवर…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी घडलेल्या भीषण कार अपघातात साखरपुड्यानंतर फक्त चार दिवसांनीच वाशी तालुक्यातील एका जोडप्याचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहिले. वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (२५) आणि इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (२३) यांचा गत रविवारी (१५ फेब्रुवारी) साखरपुडा संपन्न झाला होता. दोन्ही कुटुंबीयांनी उत्साहात लग्नाची तयारी सुरू केली होती. अपघाताचा प्रकार अत्यंत दुःखद आहे. नववधू अक्षया हिच्या महापरीक्षेसाठी लातूरला जात असताना सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ त्यांच्या कारवर नियंत्रण सुटले. कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. धडके इतकी भीषण होती की कारचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका होऊ शकल्या नसल्याने, ग्रामविकास विभागाने आदेश दिला आहे की, या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणुका होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्त केले जाईल. यामुळे जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवता येईल. या निर्णयाअंतर्गत, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलमान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यापूर्वी २३ जानेवारी २०२६ रोजी या संदर्भात निर्गमित पत्र रद्द करण्यात आले असून, आता नवीन…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (२१ फेब्रुवारी) सांगितले की, राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त असलेली ५०१२ सहायक प्राध्यापकांची आणि विद्यापीठांमधील ६० अशा एकूण ५६१२ पदांची भरती प्रक्रिया येत्या जूनमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी पूर्ण केली जाईल. पाटील यांनी माहिती दिली की, “अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थिसंख्या आणि प्राध्यापकांची आवश्यकता याचा सखोल अभ्यास पूर्ण झाला आहे. येत्या चार दिवसांत कोणत्या महाविद्यालयाला किती पदे मिळणार, हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी रोस्टरची प्रक्रिया राबवली जाईल. मार्चपूर्वी सर्व तांत्रिक बाबी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात भरदुपारी एका वकिलावर सुरी व कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे. जखमी वकील अॅड. समीर अफजल शेख (वय ४५, रा. नारायण वाडी, चाळीसगाव) यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. शेख हे नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजात व्यस्त असताना संशयित नाज उर्फ माज आरीफ खाटीक याने त्यांना फोन करून चौकशी केली. आपण न्यायालयात असल्याचे सांगितल्यानंतर काही वेळातच आरिफ रहेमतुल्ला खाटीक, दानीश आरीफ खाटीक व नाज उर्फ माज…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी क्रिप्टो करंसी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून नफ्याचे अमिष दाखवत डॉ. अनिल नथ्थू शिंदे (वय ७०, रा. अमळनेर) यांची १ कोटी ६५ लाख ५७ हजारात ऑनलाईन फसवणूक झाली. फेसबुकवर आलेली ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ स्वीकारल्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. ही घटना दि. २९ जानेवारी ते दि. १९ फेब्रुवारीदरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात झासी प्रवीण पाटील नामक महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथे एका वैद्यकीय फाउंडेशनमध्ये डॉक्टर असलेले अनिल शिंदे यांना दि. २९ जानेवारी रोजी झासी पाटील नामक महिलेची फेसबुकवर ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्यांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये साधारण बोलणे सुरू झाले.…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कळमडू (ता. चाळीसगाव) येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वडिलांच्या अकाली निधनाचे दुःख मनात दाटून आलेले असतानाही मुलगी नेहा निकम हिने बारावीचा गणिताचा पेपर देत धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. कळमडू येथील कृषी केंद्राचे चालक अंकलेश विठ्ठल निकम (वय ४८) हे गेल्या वीस वर्षांपासून काही मित्रांसह दररोज रेल्वेने चाळीसगाव ते राजमाने असा प्रवास करीत होते. शनिवारी, दि. २१ रोजी पहाटे सव्वासहा वाजता ते चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे पोहोचले. गाडी सुटण्यापूर्वीच त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती खालावत असल्याची जाणीव होताच त्यांनी तत्काळ घरी फोन करून मुलाला बोलावून घेतले. मुलगा स्थानकावर दाखल होताच वडिलांना…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२२ फेब्रुवारी २०२६   मेष राशी महत्वाच्या विषयावर तुम्ही तुमच्या भावंडांसोबत चर्चा कराल. आज कोणाशीही अनावश्यक वाद टाळावेत. कापड क्षेत्रातील लोकांना आज अचानक मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत राहील. चांगले आरोग्य राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगाचा समावेश करा. आज प्रेमी एकमेकांच्या भावनांची कदर करतील. तुमचा जोडीदार तुम्हाला आश्चर्यचकित करेल. मुलांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम आज पूर्ण होईल. आईसोबत धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने शांती मिळेल. कुटुंबासोबत संध्याकाळ चांगली जाईल. वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. तुमच्या चुकांमधून शिकल्याने तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आज तुम्ही तुमच्या भावंडांसोबत खेळ खेळण्याची…

Read More

भिवंडी : वृत्तसंस्था  राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे आधीचा जामीन रद्द झाल्याने आज नव्याने जामीन प्रक्रिया पार पडली. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत भारतीय दंड…

Read More