जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ ड मधून अपक्ष उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचार फेरीदरम्यान देवकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या भूमिकेला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुकीत त्यांना विजयी करण्याची हमी दिली आहे. प्रभागातील नागरिकांनी गेल्या काही वर्षांतील अपूर्ण राहिलेल्या विकासकामांचा मुद्दा मांडला असून, देवकर यांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार प्रतिनिधित्व हेच आपले ध्येय असल्याचे देवकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रभाग…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ मध्ये भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–रिपाई महायुतीकडून अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर महायुतीचे कमळ, धनुष्यबाण व घड्याळ चिन्हावरील सर्व अधिकृत उमेदवार जाहीर झाले असून, मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये भारतीय जनता पक्षाचे १३-अ गटातून नितीन प्रभाकर सपके, १३-ब गटातून सौ. सुरेखा नितीन तायडे हे अधिकृत उमेदवार असून १३-क गटातून सौ. वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १३-ड गटातून देवकर प्रफुल्ल गुलाबराव हे अधिकृत उमेदवार आहेत. दरम्यान,…
जळगाव : प्रवीण पाटील जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडीत माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सन 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करूनही भाजपाने त्यांना मध्यरात्री प्रवेश दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे निष्ठावंतांना पुन्हा एक धक्का दिला जात आहे या प्रवेशामुळे. या प्रवेशप्रसंगी राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मा. ना. गिरीष भाऊ महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार राजुमामा भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या राजकीय इतिहास…
जळगाव : प्रतिनिधी हट्टा येथील एस व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य प्रा. डॉ. उमेश जाधव यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण शाखेतून ‘डेव्हलपमेंट अँड इव्हाल्युएशन ऑफ हर्बल इथोझोम्स ऑफ पॅसिफ्लोरा फोइटिडा लिन फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस’ या विषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी २ पुस्तके, १०५ शोधनिबंध आणि २ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.…
जळगाव : प्रतिनिधी कळंब येथील जगदंबा इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च चे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल बिजवार यांना नुकतीच इंदोर येथील ओरिएंटल विद्यापीठातर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. त्यांनी औषधनिर्माण या शाखेतून ‘फॉर्मुलेशन अँड इव्हाल्युएशन ऑफ पोलीमेरिक ड्रग डिलिव्हरी सिस्टिम ऑफ अँटी-मलेरिअल ड्रग फॉर पेडियाट्रीक यूझ’ याविषयावर आपले शोधप्रबंध सादर केले. त्यांना जळगाव येथील प्रा. डॉ. हर्षल तारे यांचे मार्गदर्शन लाभले. पीएच.डी पदवी प्रदान झाल्याने त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. आपल्या संशोधन कार्यकाळात त्यांनी ७ पुस्तके, ७० शोधनिबंध आणि ११ पेटंट्स प्रकाशित केले. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. पीएच.डी कार्यकाळात केलेल्या सखोल संशोधनाबद्दल ओरिएंटल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.…
जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०३ (ब) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनुसूचित जमाती महिला राखीव गटातील उमेदवार सौ. चैताली राहुल (मोगली बाबा) ठाकरे यांच्या प्रचाराने मोठी गती घेतली आहे. ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या चैताली ठाकरे यांनी प्रभागातील घराघरांत पोहोचून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली असून, त्यांना नागरिकांचा, विशेषतः तरुणांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. ’मोगली बाबां’च्या जनसंपर्काचा फायदा प्रभागात ‘मोगली बाबा’ म्हणून परिचित असलेले राहुल ठाकरे यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा सौ. चैताली ठाकरे यांना होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाने सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार आणि स्थानिकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मतदारांमध्ये…
पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव रोटरी क्लब च्या वतीने आज दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकार आणि पोलिस बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन धरणगांव पोलिस स्थानक येथे करण्यात आले. या विशेष उपक्रमात ब्लड प्रेशर, व शुगरची तपासणी, थायरॉईड तपासणी, ईसीजी व हृदयरोग तपासणी, दंत तपासणी इत्यादी आरोग्य तपासण्या करण्यात आल्यात. शिबिरात डॉ. धीरल महाजन (MD Medicine): संचालक, फोर्टिस हॉस्पिटल, जळगाव, डॉ. अतुल शिंदे: संचालक, शिंदे क्लिनिक, धरणगाव, डॉ. मनोज अमृतकर: संचालक, सिद्धी क्लिनिक, धरणगाव, डॉ. सचिन पेंढारे: वेदांत दंत क्लिनिक, धरणगाव, डॉ. अभिजीत पाटील: श्री दंत क्लिनिक, धरणगाव…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रभाग क्रमांक १६ मधील नागरी समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार करत, अपक्ष उमेदवार इच्छा दीपक अत्तरदे यांनी प्रभाग १६ (क) मधून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. ‘ट्रक’ हे निवडणूक चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेल्या इच्छा अत्तरदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ अत्यंत जलोषात झाला असून, ठिकठिकाणी त्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. महिलांकडून औक्षण, फुलांची उधळण प्रचारादरम्यान प्रभागातील गल्लोगल्ली इच्छा अत्तरदे यांचे जंगी स्वागत केले जात आहे. विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांच्याबद्दल मोठा उत्साह दिसून येत असून, ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून आणि फुलांची उधळण करून स्वागत केले जात आहे. त्यांना मिळणारा हा वाढता जनसामान्यांचा प्रतिसाद पाहून विरोधकांचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धडाकेबाज सुरुवात झाली असून प्रभाग ७ ‘ड’ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचारासाठी आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. गणेश कॉलनीसह परिसरातील विविध भागांतून काढण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवडणुकीचे वारे वाहू लागताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचारादरम्यान उमेदवारांनी विविध भागांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर भर देत भाजपच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या रॅलीत प्रभाग ७ मधील भाजपचे उमेदवार दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे, चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासह…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ चा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ६ मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शाहू महाराज नगरातील तपस्वी हनुमान मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या औक्षणाने स्वागत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या कडकडाटात प्रचाराला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी उमेदवारांनी छत्रपती शाहू महाराज नगर, हौसिंग सोसायटी, दत्त कॉलनी, इंदिरा नगर आणि खान्देश मील कॉलनी परिसरात झंझावाती पदयात्रा काढली. यावेळी परिसरात चैतन्याचे वातावरण दिसून आले. अनेक…

