जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एकाच रात्री दोन वाईन शॉप फोडून खळबळ उडवून देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अवघ्या १२ तासांत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश मिळाले आहे. रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने जिल्हापेठ हद्दीतील ‘प्रिन्स वाईन शॉप’ तसेच एमआयडीसी परिसरातील ‘राज वाईन्स’ या दोन दुकानांचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केली होती. सलग दोन ठिकाणी झालेल्या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार म्हणाले की, तेदेपा आणि व्हीएसआर कंपनीचे अतिशय घनिष्ठ आर्थिक संबंध असून, त्या पक्षाचा खासदार देशाचा उड्डयण मंत्री असल्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी पारदर्शक होईल का, याबाबत गंभीर शंका आहे. मंत्री डीजीसीएच्या माध्यमातून कागदपत्रांत फेरफार करू शकतात, असा आरोपही त्यांनी केला. तेदेपाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या वित्तीय…
‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’चा उपक्रम जळगाव : प्रतिनिधी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज जळगाव जिल्ह्यात गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सामाजिक प्रबोधनासाठी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने, गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज संघटनेच्या कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी,…
बीड : वृत्तसंस्था बीड तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे गोंधळ उडाला. वर्गखोल्या अपुऱ्या पडल्याने तब्बल १०० विद्यार्थ्यांना शाळेच्या गच्चीवर उभारलेल्या मंडपात बसून परीक्षा द्यावी लागली. या प्रकारामुळे शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शिक्षण विभागाने केंद्र संचालकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत विद्यालयात एकूण १२ वर्गखोल्या आहेत. मात्र यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने उपलब्ध खोल्या अपुऱ्या ठरल्या. ही बाब शाळा प्रशासनाच्या गुरुवारी रात्री लक्षात आली. त्यानंतर घाईगडबडीत शाळेच्या गच्चीवर मंडप उभारून चार तात्पुरते हॉल तयार करण्यात आले. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १०० विद्यार्थ्यांनी या मंडपात बसून प्रश्नपत्रिका सोडवली. उन्हाची…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील न्यायालय परिसरात दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेत प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. समीर शेख यांच्यावर पाच ते सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अॅड. शेख जखमी झाले असून त्यांच्यावर बापजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण हे प्लॉट व्यवहाराशी संबंधित असून सुमारे ३ लाख रुपये टोकन रक्कम देण्यात आली होती. तर, पुढील खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर थेट न्यायालय परिसरातच ५ ते ६ जणांनी अॅड. समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती. तर वकिलांनी तीव्र संताप व्यक्त करत न्यायालय परिसरातच सुरक्षितता नसेल तर…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील श्रीरंग कॉलनीजवळ चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी घडली होती. याप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अमळनेरातील समर्थ नगरमध्ये राहणारा चंद्रकांत धनराज पाटील (मूळ रा. अमळगाव, वय ४४) याने फिर्याद दिली आहे. दरम्यान, ११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चंद्रकांत पाटील हे दुचाकी (एमएच १९, सीई ७९४७) ने विजय मारुती मंदिराकडे जात असताना श्रीरंग कॉलनीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी (एमएच १९, इए ५३४९) ने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रकांत पाटील याचा डावा हात, डावा पाय, चेहरा व कपाळाला गंभीर इजा झाली असून अनेक…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील नायगाव येथून बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह गुरुवारी शेतातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी दगडू लोटन पाटील (वय ५३) हे मंगळवारी घरातून कुणालाही न सांगता बाहेर गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोध सुरू असतानाच गुरुवारी नायगाव शिवारातील गट क्रमांक ७४ मधील विहिरीत एक मृतदेह दिसून आला. शेतमजुरांनी ही बाब लक्षात येताच पोलिस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, यावल येथे आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह…
आजचे राशिभविष्य दि.२१ फेब्रुवारी २०२६ मेष राशी दुपारपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमचे विरोधक आज तुमच्याबद्दल अफवा पसरवण्यास तयार आहेत, म्हणून त्यांना संधी देऊ नका. तुमची प्रतिभा तुमची प्रतिष्ठा वाढवण्यात प्रभावी ठरू शकते. तुम्हाला काही कामे दिली जातील जी तुम्ही सहजपणे पूर्ण कराल. विज्ञानाशी संबंधित या राशीच्या लोकांना आज नवीन शोधात मोठे यश मिळू शकते. वृषभ राशी आज तुम्ही सरकारी कामात किंवा कोर्टाशी संबंधित बाबींमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल; त्यांना परीक्षेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. आज तुमचा जोडीदार तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला साथ देईल. तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील, अचानक धनलाभ होऊ…
परभणी : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाला विरोध करत शुक्रवारी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. “आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सहजपूर जवळा गावाची लोकसंख्या सुमारे ३६५ इतकी आहे. मात्र सध्या गावात ६०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होत आहे. पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री आंदोलनात सहभागी झालेल्या काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यांना ताडकळस व दैठणा पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत…
बीड : वृत्तसंस्था परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी (ऐपत) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच एसीबीने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचत कारवाई केली. तक्रारीनुसार, सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पुढे तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सापळ्याच्या कारवाईवेळी तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे संकलित केले असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल…

