Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माळी समाजात शिवसेनेचा मोठा डाव; शालिग्राम मालकर यांची माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड !
    जळगाव

    माळी समाजात शिवसेनेचा मोठा डाव; शालिग्राम मालकर यांची माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड !

    editor deskBy editor deskJanuary 1, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी
    पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील सामाजिक कार्यकर्ते शालिग्राम ओंकार मालकर यांची शिवसेनेच्या माळी क्रांती सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे. माळी समाजासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

    शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारशीवरून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी माळी क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर उपस्थित होते. ठाणे येथे अधिकृत नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली.

    निवडीनंतर बोलताना शालिग्राम मालकर यांनी सांगितले की, आगामी काळात माळी समाजात जनजागृती करून जास्तीत जास्त समाजबांधवांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेत सामावून घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले जातील. या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026

    प्रभाग क्र. ९ मध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची भव्य महासभा

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.