Author: editor desk

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) भूमिकेबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांनी हलक्या फुलक्या शब्दांत राजकीय विरोधकांवरही टीका केली, “कधी कधी मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, तेव्हा AI मदत करू शकते,” असे म्हणत विरोधकांना कोपरखळी लगावली. फडणवीस यांनी सांगितले की, हा AI समिट भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वेगाने बदलणाऱ्या AI क्षेत्रात भारताने साधलेली प्रगती जगासमोर मांडण्याची ही संधी आहे. विविध क्षेत्रांमध्ये क्रांती घडवणाऱ्या AI संदर्भात जागतिक नेते भारतात येऊन चर्चा करत आहेत, हे देशाच्या वाढत्या क्षमतेचे द्योतक आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील AI…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  स्थानिक महिला बचत गट, उद्योजक आणि स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खान्देश महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव २६ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत सागर पार्क येथे पार पडणार आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे, याबाबतची माहिती महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिली. महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये या महोत्सवात खान्देशातील संस्कृती, खाद्यपरंपरा आणि हस्तकलेचे दर्शन घडणार आहे. महोत्सवात एकूण १८० स्टॉल्स असणार असून, त्यामध्ये प्रामुख्याने विविध वस्तूंचा समावेश असेल. बचत गटांनी तयार केलेल्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था वाळूज महानगर परिसरात तिसगाव चौफुली येथे आज एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षात गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून रिक्षा थांबवली आणि तपासणी करताच मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक घरातील सामानासह गावाकडे जात होते. तिथे पोलिसांना या रिक्षाची हालचाल संशयास्पद वाटली. तपासणी करताच गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने पोलीसही चक्रावले. तपासात मुलीच्या सावत्र आईने धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बदनामी टाळण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आम्ही मृतदेह गुपचूप गावाकडे नेत होतो.” वाळूज एमआयडीसी पोलीस हा प्रकार आत्महत्येचा आहे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडीत जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही असताना, त्याच जागेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भिन्न भूमिका घेतल्याने आघाडीत तणावाची चिन्हे दिसू लागली आहेत. १६ मार्च रोजी १० राज्यांतील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे. याचवेळी राज्यात विधान परिषदेची निवडणूकही होणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार या दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक अशा दोन जागा येण्याची शक्यता आहे. आघाडीत सर्वाधिक संख्याबळ ठाकरे गटाकडे असल्याने त्यांनी दोन्ही जागांवर दावा सांगितल्याची माहिती आहे. राज्यसभेसाठी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान वाहन पार्किंगच्या कारणावरून शिवभक्त आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत सपोनि चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात शक्ती ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वाहन पार्किंगच्या कारणावरून काही शिवभक्त आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शिवभक्तांनी “तुम्ही दादागिरी करत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अमळनेर येथील भीमनगर, ताडेपुरा येथे १५ तारखेला रात्री ८ वाजता  उसनवार दिलेले पाच हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना  घडली. याप्रकरणी रोहित भरत फतरोड (फकिरवाडा, ताडेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सुमारे १५ दिवसांपूर्वी विकी सपकाळे याच्याकडून ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. या रकमेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. १५ रोजी वरणेश्वर महादेव मंदिर येथे कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रोहित गेला असता तेथे विकी सपकाळे याने ५ हजार रुपयांसह व्याजाची मागणी केली. त्यावर व्याजाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रोहितने सांगितले. त्यानंतर विकीने…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील तापी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतलेल्या तरुणाचा गुरुवारी (दि. १९) सायंकाळी उशिरापर्यंत शोध लागला नसल्याने शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षल सोनार (वय ३२, रा. काजी प्लॉट, मोती किराणा) असे तरुणाचे नाव असून, बुधवारी (दि. १८) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, हर्षल सोनार हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते. बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अचानक तापी नदीवरील पुलावरून नदी पात्रात उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाच्या मदतीने नदी पात्रात शोधमोहीम सुरू केली. बुधवार रात्री…

Read More

आजचे राशीभविष्य दि.२० फेब्रुवारी २०२६  मेष : आज तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. नोकरी व्यवसायात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. धनलाभाचे नवे मार्ग तुम्हाला मिळतील. तुम्ही आज एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकता. रखडलेली कामे आजच्या दिवसात पूर्ण होतील. कुटुंबात मतभेद झाल्याने मन निराश असेल. वृषभ : आज तुम्हाला तुमच्या घरात प्रेम आणि सामंजस्य पहायला मिळेल ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. आज तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर रिसर्च कराल ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. व्यापारी लोकांना प्रामाणिकपणे काम करावे लागेल अन्यथा मोठ्या विवादीत प्रकरणात सापडू शकता. प्रेमसंबंध दृढ होतील. ​ मिथुन : आज तुम्हाला तुमच्यासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. शिक्षण क्षेत्राशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला वीस दिवस पूर्ण झाले तरी अपघातामागील कारणांबाबतचे गूढ कायम आहे. या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सरकारकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ठोस प्रगती दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, अपघातामागील सत्य शोधण्यासाठी रोहित पवार सध्या दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत. विमान अपघातासंदर्भातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी ते वैमानिक, निवृत्त अधिकारी आणि हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी घेत आहेत. उड्डाणापूर्वीची तपासणी, हवामानस्थिती, यंत्रणांची कार्यक्षमता, वैमानिकांचा…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था भाजपला देशाचे संविधान बदलायचे असून महापुरुषांविषयी सातत्याने आक्षेप घेणे हे त्यांचे ठरलेले धोरण आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सोमवारी बुलढाणा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि ऐतिहासिक मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. विशेषतः भाजप आणि टिपू सुलतान यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. सपकाळ म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे टिपू सुलतानांविरोधात सातत्याने वक्तव्य करतात. मात्र राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या काळात काही ठिकाणी फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभांमध्ये व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानांचे चित्र लावलेले दिसले होते, असा दावा त्यांनी केला. राजकीय सोयीप्रमाणे भूमिका बदलण्याचे…

Read More