जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास तीन वर्षीय बालकाला उचलून त्याला घेवून जात असल्याच्या संशयावरुन ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने पब्लिक मार दिला. या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २३ रोजी रात्रीच्या सुमारास आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडली. या प्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा, खु, ता. जळगाव) हे वास्तव्यास आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ३० ते ३५…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील जारगाव चौफुली परिसरात एका तरुणाने लोखंडी तलवार हातात घेऊन दहशत माजविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पाचोरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणास अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना एक तरुण तलवार घेऊन जारगाव चौफुली परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. माहितीची गंभीर दखल घेत पो.नि. पवार यांनी तातडीने पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच संशयित सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमाननगर, पाचोरा) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. परिसरात अनावश्यक…
जामनेर : प्रतिनिधी जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. इंदूरहून हुबळीकडे औषधी माल घेऊन जाणारा ट्रक साईडपट्ट्यांना भराव नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून ट्रक व औषधी मालाचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरजे ०९ जीसी १९७५ क्रमांकाचा ट्रक ग्लुकोज पावडर, सलाईन व इतर औषधे घेऊन पहाटेच्या सुमारास वाकोद परिसरातून जात होता. महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांमध्ये खोदकाम करून भराव न टाकल्याने रस्त्याच्या कडेला मोठी खोल जागा निर्माण झाली आहे. वाहन चालविताना ट्रकचा ताबा सुटून तो या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. अपघातात चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली…
आजचे राशिभविष्य दि.२५ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज, घर, प्लॉट किंवा दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्यावर तुमचे पालक खूप आनंदी होतील. तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळेल. आज कोणाविरुद्धही द्वेष बाळगू नका. जसे विचार असतील तसे अनुभव येतील. आज हट्टीपणा टाळावा. तुम्ही मित्रांसोबत व्यवसाय सुरू करण्याची य़ोजना आखू शकता. वृषभ राशी आज, कामावर तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश होतील आणि तुमची प्रशंसा करतील. तुम्ही सर्व महत्त्वाची कामे सहजपणे पूर्ण कराल. तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे पूर्ण कराल. फर्निचर व्यवसायात असलेल्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकजण…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासकीय स्तरावर कार्यपद्धती (SOP) अद्याप निश्चित झालेली नाही, अशी कबुली सरकारने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशातून दिली आहे. सरकारच्या या कबुलीमुळे प्रशासकीय यंत्रणेतील ढिसाळ कारभार आणि आरक्षणाबाबतची उदासीनता उघड झाली आहे. SOP नसल्यामुळे अर्ज कमी येत आहेत आणि प्रमाणपत्र वाटपही संथ गतीने होत आहे. यावर उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कोणती कागदपत्रे ग्राह्य धरावीत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, विधानसभेत आणि विधानपरिषदेत मंगळवारी वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अनेक नेते भावनिक झाले, मात्र नंतर विरोधकांनी सरकारवर विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून त्याला धारेवर धरले. आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळल्याचा गंभीर आरोप केला. तसेच मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून त्यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना टोला लगावला. आदित्य ठाकरे म्हणाले, “पालिकेला अजून जाग आलेली नाही. शहरातील हवा गंभीर पातळीवर पोहोचली आहे. सरकारने फक्त छापील उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी.” त्यांनी मराठा आरक्षण आणि कर्जमाफीसारख्या निवडणूकपूर्व घोषणा अद्याप पूर्ण न झाल्याचा, तसेच लाडकी…
मुंबई : वृत्तसंस्था बारामती – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गत २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातानंतर आता प्रकरणाला नवे वळण लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अपघातावर संशय व्यक्त करत म्हटले आहे की, “अजित दादांचा अपघात हा अपघात नसून घातपात आहे.” रोहित पवारांनी सोशल मीडियावर वाचकांसमोर धक्कादायक माहिती मांडली आहे. त्यांच्या माहितीनुसार, अपघातातील विमानाचे रेकॉर्ड ठेवणारी VSR (VSR कंपनी) कंपनीच्या नोंदीमध्ये मोठी बनवाबनवी सुरू असल्याचा गंभीर संशय आहे. विमानाच्या एकूण ५००० तासांपैकी फक्त १८०० ते २००० तासांचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत; उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत. रोहित पवारांचा आरोप आहे की, या मिसिंग…
पुणे : वृत्तसंस्था शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने कारवाई केली. या वेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करून दोन दलालांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुलनाज रफिक शेख (वय 25), इस्माईल इबाहीम खान (वय 32, रा. दोघे भाग्योदयनगर कोंढवा) अशी त्या दलालांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांच्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला एका सोसायटीच्या सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा ₹1,500 चा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक क्रेडिटचे संदेश येऊ लागले आहेत. महिला व बालविकास विभागानेही हप्त्याचे वितरण अधिकृतपणे सुरू झाल्याची माहिती दिली आहे. जानेवारीचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 18 फेब्रुवारी रोजी महिला व बालविकास विभागाकडे सुमारे 98 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. निधी प्राप्त होताच सोमवारपासून प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील…
पुणे : वृत्तसंस्था मंगळवारी पहाटे सुमारे चार वाजता पुण्यातील कर्जत घाट परिसरात भीषण अपघात घडला. कात्रज बोगद्याकडून नवले पुलाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विशेषतः कर्जत न्यू टनेलपासून जांभुळवाडी दरी पुलादरम्यान ट्रकने समोरून येणाऱ्या बसला जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, लोखंडी पाईप आणि सळ्यांनी भरलेला ट्रक इतक्या वेगाने आला की धडक इतकी तीव्र होती की ट्रकचे केबिन पूर्णपणे चक्काचूर झाले. बसमधील चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला; उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. धडक झाली की ट्रकचा क्लीनर लोखंडी सळ्या…

