Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सुरु असलेले गुन्हेगारी कृत्य कुठेही थांबायचे नाव घेत नाही आहे नुकतेच बेपत्ता झालेला मुलगा 8 वर्षांनतर सापडला आहे. मात्र, हा मुलगा आठ वर्षे कुटे गायब झाला होता हे समजल्यावर पोलिसांना देखील धक्का बसला आहे. कारण, या मुलाचे अपहरण त्याच्या जन्मदात्या आईनेच केले होते. जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाला लैंगिक गुलाम बनवले होते. लैंगिक गरज भागवण्यासाठी आईने मुलाला कैद करुन ठेवले होते. टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. 8 वर्षांपूर्वी एक 25 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. तो आपल्या दोन कुत्र्यांना फिरायला घराबाहेर पडला आणि अचानक गायब झाला. 2015 मध्ये तो बेपत्ता झाला होता. आता तो सापडला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना आता त्यांच्या पाठोपाठ राज ठाकरे देखील बाहेर पडले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात केली असून आज चिपळूणमध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. येत्या पंधरा दिवसांमध्ये राज ठाकरे पक्षाचा मेळावा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यामध्ये जो व्यभिचार सुरु आहे तो मी कधीही करणार नाही. तडजोड करावी लागली तर घरात बसेन परंतु तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांनी मनाने एकत्र येऊन काम करणं आवश्यक असल्याचं राज यांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आजपासून कोकण दौऱ्याला सुरुवात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दुचाकी चोरीचा आरोप करीत पुणे येथे कंपनीत असलेल्या नितीन दत्तू पाटील या तरुणाला ताब्यात घेत त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह पाच कर्मचान्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. तरुणाच्या आईने नशिराबाद पोलिस ठाण्यासह पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला. अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत संबंधितांवर कारवाई करण्यासह पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मूळ नाचणखेडा, ता. जामनेर येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई दत्तू पाटील या सध्या शिवकॉलनीत राहतात. त्यांचा मुलगा नितीन हा पुणे येथे कंपनीत कामाला असताना त्याला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असलेले नुकतेच दिल्ली दौऱ्यावरून राज्यात परत आले असून दिल्लीत ठरल्याप्रमाणे आज राज्यातील खाते वाटप होणार असून मात्र मंत्रीमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनानंतर होणार असल्याची बातमी बाहेर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन जवळपास १० दिवसांचा काळ उलटला. मात्र, अद्यापही नवीन सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. मंत्रीपदावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून रस्सीखेच सुरू आहे. अशातच खातेवाटप आणि राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता मावळली आहे. सगळ्यात पक्षातील नेते विस्ताराकडे लक्ष लावून बसले आहेत यावेळी पण आमदार पदरी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज पहाटेच्या सुमारास कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आंबेगाव तालुक्यातील गीरवली येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. येथील स्मशानभूमी जवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून वीस फूट खोल ओढ्यात बस कोसळून अपघात झाला असून या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची माहीती आहे. सदर गाडीमध्ये एकूण 35 प्रवासी होते. त्यापैकी दोघांना थोडीशी दुखापत झाली असून बाकी सर्व सुखरूप आहेत. घटनास्थळी पाच रूग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील कोळवद शिवारात बैलगाडीला विद्युत तारांचा धक्का लागल्याने बैलजोडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बैलगाडीतील सहा 1 जणांचा जीव वाचल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी मंगळवारी शेतमजुरांसोबत बैलगाडी घेऊन कामाला गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील पेरणीचे काम आटोपून परत येत असताना रस्त्यावर वीज खांबांच्या तणावासाठी लावलेली चिनीप्लेट तुटली होती. यात विद्युत प्रवाह उतरला होता. यास बैलगाडीचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखत सर्वांनी तत्काळ बैलगाडीतून उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. एक लाख रुपये किमतीची ही बैलजोडी होती. शासनाकडून शेतकऱ्याला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात अवैध वाळूमाफियांना लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठी मोहीम हाती घेतली असून आता तालुका पोलिसांनी भर दिवसा सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर खोटे नगर स्टॉप जवळून पकडले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून अनेक वाळूमाफिया खोटे नगर परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळताच मंगळवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलीसांनी जप्त केले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना ट्रॅक्टर चालक मुकेश पेरकाश सपकाळे (वय-३३) रा. निमखेडी ता.जि.जळगाव…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यात एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा एकाने दारूच्या नशेत असतांना हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहिवासास आहे. दि.११ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास याच गावातील संशयित आरोपी जितेंद्र तायडे हा दारूच्या नशेत येऊन महिला घरी एकटी असल्याची संधी सांधत त्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे केल्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केला घडलेला प्रकार विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र तायडे यांच्या विरोधात फैजपूर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  नाशिक जिल्ह्यातील वनी गडाहून येत असताना एका घाटात महामंडळाची बस ४०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात एक महिलेचा मृत्यू झाला असून तर १५ जण जखमी झाल्याची माहिती करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांची काळजी घेण्याचे सांगत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देऊ असं देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तब्बल 15 भाविक या अपघातग्रस्त बस मध्ये प्रवास करीत असताना त्यांना देखील जखमी झाले असून त्यांची विचारपूस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फोन द्वारे करीत प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले असल्याचे समजते.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) या बसचा नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात झाल्याची घटना पहाटे समोर आली होती. या अपघातात एकूण २१ प्रवासी असून यातील १ महिला प्रवासीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हि महिला भाविक जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वणी गडावरील घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यतील १६ भाविक जखमी असून त्यातील आशा राजेद्र पाटील या महिला भाविकाचा मृत्यू झाला असल्याची बातमी मिळाली…

Read More