मुंबई : वृत्तसंस्था गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. मंगळवारी रात्रीदेखील 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र, अजूनतरी खातेवाटपावर तोडगा निघालेला नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागत असल्याने आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अर्थ, सहकार, सांस्कृतिक, महिला व बालविकास, वस्त्र उद्योग, अन्न व पुरवठा, क्रीडा, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी कल्याण या खात्यांसाठी आग्रह धरला आहे. तर, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते अजित पवार यांना द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. मात्र,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी येथील ग्रामीण रुग्णालयाने सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेमधील नावे जाहीर केली आहेत. या अपघातात १६ भाविक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यात अकोला येथील गजानन पांडुरंग टपके (वय २५) अमळनेर तालुक्यातील मुडी येथील प्रमीलाबाई गुलाबराव बडगुजर (सुनिल गुलाबराव बडगुजर, मुलगा) वय ६५ , तर जळगाव तालुक्यातील भोकर येथील रघुनाथ बळीराम पाटील (वय ७०), बाळु भावलाल पाटील(वय ४८), गडावरील लक्ष्मीबाई काळू गव्हाणे (वय ४०), अमळनेर तालुक्यातील मुडी येथील संजय बाळीराम भोईर (वय ६०), सुशीलाबाई सोनू गुजर(वय २७), वच्छालाबाई साहेबराव पाटील(वय ६५), सुशिलबाई बबन नजान (वय ६४), निफाड तालुक्यातील पंचेश्वर येथील…
नाशिक : वृत्तसंस्था जिल्ह्यात असलेले वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये २३ प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पिडीत आणि त्रस्त नागरिकांनी छत्रपती संभाजी नगर क्रांती चौक येथे आंदोलन केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील कॅबिनेट कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी देखील मागणी केली आहे. शिंदे गटातील आमदार कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडूबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जीवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लु, कमलेश गोविंदराम कटारिया, विष्णू गंगाराम काटकर इत्यादी जवळपास 60 ते 70…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कंडारी येथून बेपत्ता असलेल्या व रायपूर येथे पाटचारीत मृतदेह आढळून आलेल्या राहुल उर्फ गोलू युवराज भिल या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील भूषण उर्फ भुरा पाटील (रा. वसीम, ता. भुसावळ) या होमागार्डला अटक करण्यात आली असून, दुसरा संशयित जयराम धोंडू कोळी याला यापूर्वीच दुसऱ्या एका गुन्ह्यात नशिराबाद पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव तालुक्यातील कंडारी येथील राहुल भिल येथून २ जुलैपासून बेपत्ता होता. ६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता राहुलचा मृतदेह रायपूर शिवारातील पाटचारीजवळ संशयास्पदरीत्या आढळून आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली व १० जुलै रोजी भूषण उर्फ…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव एरंडोल महामार्गावर दुपारच्या सुमारास इगतपुरी बसच्या अपघाताची घटना होत नाही तोच रात्री ८ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून एरंडोलकडे येणारी बस व पुढे चालणारी रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षामधील चार प्रवासी जखमी झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एरंडोलपासून पारोळ्याकडे तीन किलोमीटर अंतरावर हॉटेल फाउंटनपासून थोड्या अंतरावर मंगळवारी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास घडला. यात एकाच परिवारातील तीन वर्षांच्या बालकासह आई-वडील जखमी झाले. जखमींपैकी एकाचा रुग्णालयाच्या वाटेतच मृत्यू झाला. फारुख रमजान खाटीक (२६, फकीरवाडा, एरंडोल), मुस्कान फारुख खाटीक (२२), फयीजाआन फारुख खाटीक (३), गणेश शांताराम महाजन (४५, पारोळा) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी फारूख खाटीक याला रुग्णालयात नेत…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील महामार्ग क्र.६ वर नियमित अपघाताची संख्या वाढत असतांना आज दुपारी पुन्हा एकदा बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न यागावाजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न या गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी बस डेपोतील जळगाव शहरातील बस स्थानकावरून इगतपुरी जाणारी बस क्र.एम.एच.४०.एक्यू.६०१० या बसने भरधाव कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी लागलीच खाजगी रुग्णावाहिका पाठवून अपघातग्रस्ताना मदत मिळवून दिली. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवसी जखमी…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. अजित पवार व त्यांच्या समर्थकांसह शिंदे भाजप सरकारमध्ये सामिल झाले आहेत. तेव्हापासून अजित पवार गटाकडून शरद पवारांवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अजित पवार व शरद पवार यांच्यातील संबंध बिघडले आहेत. या सर्व फोडाफोडीला एक आठवडा झाला असून अद्याप दोन्ही नेते एकमेकांसमोर आलेले नाहीत. मात्र येत्या 1 ऑगस्टला पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात शरद पवार व अजित पवार हे पहिल्यांदाच एका मंचावर असणार आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी सत्तेत असतानाच या सरकारमधील दोन दिग्गज मंत्र्यांनी फोन वरून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे . पहिला फोन मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला होता याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील परळी या गावाच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. इतकच नाही तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाख रुपयांची मागणी देखील केली आहे. राज्यात सत्ता संघर्षादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर शरद पवार आणि खासदार…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर पुन्हा गाठीभेटी सुरू झाल्या. आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार पक्षाची बैठक बोलावली होती त्या बैठकीत किरण लहामाटे हे उपस्थित होते. आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता आले आहेत. अजित…

