भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातून व शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून गेल्या एका वर्षात अनेकांच्या मोटासायकल चोरीला गेल्याचे अनेक घटना शहरात घडल्या असून या याचा तंतोतंत छडा भडगाव पोलीसांनी लावला असून मुद्देमाल हस्तगत करुन व आरोपींना अटक करण्यात आली आली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यात भडगाव शहरातून होंडा शाइन व बजाज प्लॅटिना अश्या दोन मोटासायकल चोरी गेल्याची घटना घडली होती. या बाबत भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. 89/2023 भादवि कलम 379 गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर आरोपी नामे प्रकाश रामसिंग बागुल रा. वरखेडा ता. चाळीसगाव ह. मु. येवला रोड, नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक याचे बाबत गुप्त…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवीत पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील सात युवकांची २० लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पाचोरा पोलिसात भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. प्रकाश हरचंद सोनवणे (५०, रा. भुसावळ) असे फसवणूक करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोनवणे याची मुलगी लोहटार येथे राहत असल्याने त्याचा गावातील युवकांशी संपर्क आला. रेल्वेत नोकरीस लावून देतो, यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून युवकांकडून गेल्यावर्षी रक्कम घेतली. यात मोहन फकिरा चौधरी, मोतीलाल सुखदेव चौधरी, आत्माराम दोधा चौधरी, नीलेश दौलत चौधरी रावसाहेब दिलीप पाटील, पंकज राजेंद्र पाटील यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाचा साप चावल्याने, तर दुसऱ्याचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील नीलेश युवराज पाटील (१५) याला ९ रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र देविदास पाटील यांच्या घराबाहेर पायाच्या बोटाला साप चावला. त्याला तातडीने उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गडखांब येथील पंकज पाटील व विश्वासराव पाटील हे गडखांब शिवारातील त्यांच्या गट नंबर २११/१ च्या शेतातील विहिरीच्या पाइपची जोडणी करत असताना, मांजर्डी येथील सोनू अशोकगीर गोसावी (वय २३) हा मतिमंद तरुण १० रोजी दुपारी ३:४५ वाजता तिकडून आला. त्याचा तोल जाऊन विहिरीत पडन मृत्यू…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील हातेड-लासूर रस्त्यावर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सराईत गुन्हेगार श्याम नामदेव चव्हाण व समीर शुभान सय्यद यांच्याकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना दि. १० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे, हातेड-लासूर रस्त्यावर एका दुचाकीवरून (एमएच १९ / बीवाय ३४१३) मध्य प्रदेशातील पारउमर्टी येथून चाळीसगावला जात असताना श्याम नामदेव चव्हाण उर्फ सॅम (२४), समीर शुभान सय्यद (२३, दोघे हिरापूर, ता. चाळीसगाव) यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ५ हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, ३ हजार किमतीचे सहा जिवंत काडतुसे, पन्नास…
मुंबई : वृत्तसंस्था देशात अनेक उच्चशिक्षित तरुणांना लग्न करण्यासाठी मुली भेट नसल्याच्या अनेक ठिकाणी घटना घडल्या आहे तर एका ३५ वर्षीय युवकाने १५ मुलींसोबत लग्न केले हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. स्वत:ला डॉक्टर, इंजिनिअर असल्याचे सांगून हा युवक मुलींना जाळ्यात ओढायचा. विशेष म्हणजे या युवकाने जितक्या मुलींशी लग्न केले त्या शिक्षित आणि स्वावलंबी होत्या. त्यात डॉक्टर आणि इंजिनिअर मुलींचाही समावेश आहे. कुणी सरकारी नोकरी करते तर कुणी मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पगारावर आहे. या युवकाला धड इंग्लिश बोलता येत नाही. जर बोलता आले असते तर यापेक्षाही जास्त मुलींना त्याने फसवले असते. युवकाच्या १५ लग्नाची पोलखोल तेव्हा झाली ज्यावेळी एका महिलेने त्याच्याविरोधात…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील वृद्ध दाम्पत्यांनी संसाराला कंटाळल्याने येथून पुढे जगण्याची इच्छा नाही, असा फोन पाचोरा पोलिसांना करीत लोहटारच्या वृध्द दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. यात ईश्वर नामदेव पाटील (७८) व प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. हि घटना शनिवारी घडल्यानतंर दोघांना उपचारार्थ हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील एस.टी.महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (७८) व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) हे दाम्पत्य अध्यात्मिक मार्गावर होते. शनिवार, 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसात ईश्वर पाटील यांनी संसाराला कंटाळून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री खाते असल्याने ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याची तक्रार करीत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फुट पाडली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांना राज्यमंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप खाते दिलं नाही. अजितदादांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अजितदादांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे. तर महसूलमंत्रीपद देऊन भाजपला राधाकृष्ण विखेपाटील यांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीये. त्यामुळे भाजप कात्रीत सापडला आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांदेड येथील शेकडो युवा कार्यकर्ते व जेष्ठ नागरिकांनी केला पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत नांदेड ते घुरखेडा रस्त्यासाठी नागरिकांकडून निवेदन देखील देण्यात आले आहे. जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आज नांदेड ते बोरखेडा चार किलोमीटर रस्त्यासाठी युवा सेना व नांदेड गावातील नागरिकांनी निवेदन दिले रस्ता पूर्वी कधीच झालेला नाही आणि गावातील दिन दलित दुबळे आदिवासी मागास असे ५० टक्के लोकांचे वहिवाट रस्त्याने आहेत रस्त्याभावी ते लोक शेती करण्याचा समर्थ आहे बेरोजगारीचे प्रमाण वाढले लोकांना रोजगार नाही जर हा रस्ता झाला तर नांदेड गावाच्या अर्ध्या लोकांचे रोजगाराचे प्रश्न कायमची सुटतील म्हणून आज…
नागपूर : वृत्तसंस्था प्रथम शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने या पक्षांचे प्रमुख शरद पवार व उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहे. शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवातही झाली असून त्यांनी येवला येथून रणशिंग फुंकले. तर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. आता पक्ष फोडणे नाही तर पळवून नेणाऱ्यांची गॅंग आलेली आहे. खोक्यांचे आमिष दाखवून त्यांनी आमदार, खासदारांना नेले. पण माझ्यासोबत लाखमोलाचा शिवसैनिक आहे. ते बाळासाहेबांचा फोटो देखील चोरत आहे. कारण त्यांना माहित आहे की, आता महाराष्ट्रात मोदींचं नाणं चालणार नाही. एवढच काय भाजप तर आता बाजारबुणग्यांचा पक्ष बनला आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील ५१ वर्षांच्या व्यक्तीला पिसाळलेल्या पाळीव कुत्र्याने आठ महिन्यांपूर्वी चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यांना रेबीजची लक्षणे जाणवल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ८ जुलै रोजी दुपारी धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ईश्वर दगडू बडगुजर (वय ५१, रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शनिवारी ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक दीपक पाटील करीत आहेत. काय घडली घटना धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ईश्वर दगडू बडगुजर…

